शेती आणि शेतकरी : एक आकलन असेही
शेती आणि शेतकरी : एक आकलन असेही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या गेल्या कित्येक पिढ्या शेती आणि शेतीची मशागत/नोकरी(?) करण्यातच मशगूल होत्या. (माझ्या वयाच्या 22-23 वर्षापर्यंत मी सुद्धा छोटे-मोठे शेतीकाम केले आहे.) शासकीय नोकरीत जाणारा मी कुटूंबातील पहिलाच. माझा मुलगा B.Com.; LL.B.; M.B.A.(Fin.&HR); S.A.P. असूनही तो मात्र शेती करतोय.(त्यानेही काही काळ जाॅब केलाय.) तर सांगायचा उद्देश असा की, मला शेती आणि शेतकरी याबद्दल बोलायचा अधिकार(??) आहे असे मला वाटते.
2014 मधील अचाट आणि अफाट सत्ताबदल कसा काय होऊ शकला, याबद्दल मोठमोठ्या विद्वानांनी व मीमांसकांनी लाखो पाने भरतील अशा कारणमीमांसा दिलेल्या आहेत. माझ्या अल्पबुद्धीला त्यापैकी कोणतीही कारणमीमांसा 100% पटत नाही.(माझे अज्ञान म्हणा किंवा दुर्दैव!) 1947 नंतरच्या सर्वच सरकारांनी शेतक-यांना लुबाडणे हा मुख्य एजेंडा कधीही सोडलेला नव्हता. याला वाजपेयी सरकार सुद्धा मला अपवाद वाटत नाही.(अपवाद फक्त शास्त्री सरकार). "शेतकरी" ही "शिवी" ठरू लागली होती. सिलिंगचा कायदा, शेतक-याला बेइज्जत करून राबविलेला लेव्ही चा कायदा(?), काम(?) न करताही भरपूर(!) मजूरी देणारी व श्रमिकांच्या श्रमाचे अवमूल्यन करणारी रोहयो, फूकट अन्नधान्य वाटपाची ऐतखाऊ निर्मितीची अनैसर्गिक योजना, लेबर अधिका-यांनी कारवाई करण्याची धमकी देऊन शेतक-यांची भरदिवसा(!) केलेली लूट, लेव्हीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली/येत असलेली त्याच्याच मालकीच्या अन्नधान्याची विधीमान्य लूट, जीवनावश्यक वस्तूचा संविधान-विरोधी/एकतर्फी कायदा(दे), इत्यादी, कायद्यांनी शेतक-याला चोर ठरविणारे शासकीय धोरण व यंत्रणा यांनी शेतकरी त्रस्त(?) होऊन आत्महत्येच्या पर्यायापर्यंत पोचला होता/आहे.
अशा असमंजस परिस्थितीत मोदीजींनी शेतक-यांना गाजर दाखविले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणी शेतकरी हिताविषयी इतक्या पोटतिडकीने व आत्मविश्वासाने(?) बोलणारा भेटला शेतक-यांना! शेतक-यांचा विश्वास बसला व चमत्कार घडला. या चमत्काराच्या मागे आणखी काही दुसरे/तिसरे वगैरे घटकही आहेतच, ते नाकारता येत नाही. पण 60-65% असलेल्या शेतक-यांच्या दृष्टीने पाहिले असता ही एक महत्वाची कारणमीमांसा नाकारता येणार नाही असे माझे नम्र आकलन आहे.
परंतु ही कारणमीमांसा "लाट" या फसव्या राजनितीच्या संकल्पनेत स्पष्ट करण्यात येऊ लागली व सर्वश्री माधव भंडारी, गणेश हाके, केशव उपाध्ये, रावसाहेब दानवे, संदीप बात्रा, सारखे मृगजलीय मीमांसक बेफाम झालेत/होऊ लागलेत. मी रास्वसं चा अधिकृत स्वयंसेवक(!)/ओटीसी वगैरे केलेला नाही किंवा भाजप चा कोणताही मेंबर सुद्धा नाही, (तसेच तथाकथित काँग्रेसी, हिमनगपृष्ठवादी साम्यवादी,... वगैरेंचा सुद्धा मेंबर वगैरे नाही!)
तथापि मी ज्या विचारधारेचा (DISSENT : THE VOICE OF PROGRESS) पाईक आहे, त्यानुसार मी विश्वासपूर्वक म्हणू शकतो की, आज विवेकानंद, गांधी, आंबेडकर, शास्त्री, जयप्रकाश, बाळासाहेब देवरस असायला हवे होते, चरणसिंग, दत्तोपंत ठेंगडी, नानाजी देशमुख, बिंदुमाधव जोशी, का.भा.लिमये, ना.ग.गोरे, ... सुद्धा असायला हवे होते असे आवर्जून वाटते. असो.
फेसबुक वर इतकेच पुरेसे व्हावे, तसे हे अपूर्णच नव्हे तर भयंकर गैरसमज पसरविणारेही ठरू शकते, याची मला जाणीव असली तरी आता थांबणे अनिवार्य(?) आहे. असो.
जय किसान, जय किसान, जय किसान!!!
@लखनसिंह कटरे,
बोरकन्हार.(10.06.2017)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment