इ.स.2030 मधील एका वाॅचमनच्या डायरीतील काही पाने...

 *इ.स.2030 मधील एका वाॅचमनच्या डायरीतील काही पाने...*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
       @ॲड.लखनसिंह कटरे
    --------------------------------
       मी एका अपार्टमेंटचा वाॅचमन. शरद पवार ज्या शहराला मिनी मुंबई म्हणून एकेकाळी नावाजायचे, त्या पूर्व विदर्भातील झाडीपट्टीतील एका बहुभाषिक व बहुसांस्कृतिक अशा गोंदिया शहरातील विश्वकर्मा अपार्टमेंटचा मी वाॅचमन. आमच्या या अपार्टमेंटमध्ये एकूण 106 फ्लॅट्स आहेत. गोंदिया शहरातील हा सर्वात मोठा अपार्टमेंट असावा. त्यामुळेच आम्ही एकूण सहा वाॅचमन आहोत. प्रत्येकी दोन-दोन वाॅचमन्सची आठ-आठ तासाची ड्युटी असते. मी जाणूनबुजून रात्रीची ड्युटी मागून घेतो. माझा दुसरा सहकारी नेहमी बदलत असतो पण मी मात्र नियमित रात्रपाळीचीच ड्युटी मागून घेतो. आणि विशेष हे की रात्रपाळीतील माझा सहकारी झोपतो पण मी मात्र रात्रभर जागाच असतो. कारण रात्रीची मजा काही औरच असते. रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते पहाटेच्या चार-पाच वाजेपर्यंत अपाईंटमेंटमधून कोण-कोण, कसे बाहेर पडतात व कोण-कोण कसे आत येतात हा एक मजेदार कादंबरीचाच विषय म्हणता येईल. रात्रपाळीत जागताना मी हिंदी-मराठीतील उपन्यास-कादंबऱ्यांचेच तर वाचन करीत असतो. त्यामुळेच माझ्या रात्रपाळीत मी पाहिलेले व पाहत असलेले "आवागमनातील व्यक्ती" मला त्या उपन्यास-कादंबरीतील पात्रेच वाटू व भासू लागतात. प्रत्येकाची तऱ्हा वेगळीच असली तरी बहुतेकांची आवागमनाची वेळ मात्र रात्री बारापासून ते पहाटे चार-पाच वाजेपर्यंतच असते. त्यातील काही वेचक पात्रांबद्दल मी सांगू इच्छित आहे. कारण या सर्व रात्रकालीन आणि काही दिवसाढवळ्याच्या आवागमनातील पात्रांनी माझ्या वाचनात आलेल्या उपन्यास-कादंबरीतील काल्पनिक पात्रांना जीवदान देऊन माझ्या अनुभवाकलनात भरच घातली आहे. 

          फ्लॅट नंबर 85 मध्ये एक नवविवाहित जोडपे भाडेकरू म्हणून राहायला आले आणि महिन्यानंतरच त्यापैकी पुरुष रात्रकालीन आवागमनात सामील झाला. तो बाहेर पडल्यावर अर्ध्या-पाऊण तासातच दुसराच एक व्यक्ती आत यायचा. सुरुवातीस मी त्याला अटकाव केला असता त्याने जगप्रसिद्ध व जगमान्य अशा दान-दक्षिणेचा विपर्यास असलेल्या सफल व सुफल अस्त्राचा माझ्यावर सफल प्रयोग केला. मी काही असामान्य व्यक्ती नसून इतर सर्व सानथोर, सज्जन-दुर्जन, जनता-जनप्रतिनिधी व्यक्तींपैकीच एक असल्याने व अशी दान-दक्षिणेची विपर्यास पद्धत देशभर सर्रास व बिनबोभाट आचरली जात असल्याने मला सुद्धा ती पद्धत सहज आचरता आली. तर असे हे आवागमन नित्याचेच झाल्याने माझ्यातील उपन्यास-कादंबरीच्या वाचकाचे कुतूहल जागृत झाले. माझ्या सहकाऱ्याला मला मिळणाऱ्या/मिळालेल्या दान-दक्षिणेच्या विपर्यासातील थोडासा अंश प्रदान करून, वाॅचमनशीप त्याच्या एकट्यावर सोपवून, मी त्या येणाऱ्याचा लपतछपत पाठलाग केला असता तो त्या फ्लॅट नंबर 85 मध्येच दोनेक तास घालवून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. व त्यानंतर काही वेळाने त्या फ्लॅटमधील तो बाहेर गेलेला व्यक्तीही परतत असे. म्हणजे ते नवविवाहित जोडपे माझ्या वाचनातील कुठल्यातरी उपन्यास-कादंबरीतील जीतेजागते पात्रच असल्याचे जाणून मला त्या उपन्यास-कादंबरीच्या लेखकाच्या लिखाणाची महत्ता व दार्शनिक(?)ता अनायासेच पटली. 

          अगदी वरच्या मजल्यावरील शेवटच्या फ्लॅट नंबर 106 मध्ये चार महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी भाड्याने राहायचे. दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी एकत्र एकाच फ्लॅटमध्ये राहू शकतात याचे आता आमच्या गोंदिया शहराला अप्रूप राहिले नव्हते. शरद पवारांनी मिनी मुंबई म्हणून नावाजलेले आमचे गोंदिया हे शहर खरोखरच आता याबाबतीत तरी मुंबईची बरोबरी करू लागले होते. एके रात्री उशिरा दोनेक वाजता त्या फ्लॅटमधील एक विद्यार्थी खाली येऊन मला माझ्या केबिनमध्ये भेटला. माझा सहकारी ढाराढूर झोपला आहे याची खात्री करून त्याने मला दान-दक्षिणेच्या विपर्यासाचा मोठा दाखला व डगला देऊन म्हणाला, 'तुला व्हिडिओ चित्रीकरण करता येते काय? नसल्यास मी शिकवतो. तू आमचे काही शॉट्स चित्रीकरण करून दे.' म्हणजे माझी दान-दक्षिणाविषयक विपर्यासाची महती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचली होती याचे सुरुवातीला मला आश्चर्यच वाटले. पण लगेच आठवले की We are residents of Mini Mumbai. आणि मी सावध होत त्याची ती ऑफर स्वीकारली. तो विद्यार्थी निघून गेला व अर्ध्या तासानंतर त्यांच्या फ्लॅटवर यायला सांगून गेला. माझ्या सहकाऱ्याला झोपेतून उठवून व माझ्या दान-दक्षिणेच्या विपर्यासातील एक अंश प्रदान करून, त्या एकट्यावर वाॅचमनशीप सोपवून, मी त्या विद्यार्थ्यांच्या फ्लॅटवर पोचलो. माझी प्रतीक्षा करीत त्यांनी दार लोटूनच ठेवले असावे. माझी चाहूल लागताच एका विद्यार्थ्याने दार उघडून मला आत घेतले व दार लाॅक करून घेतले. उर्वरित तिन्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी तोवर मला दिसले नाहीत. ते आतील बेडरूम मध्ये अर्धनग्न पडून असल्याचे लवकरच माझ्या निदर्शनास(?) आले. त्या विद्यार्थ्याने मला माझे चित्रीकरणाचे काम व कॅमेरा हाताळायचे कामापुरते ज्ञान समजावून दिले. आता चौघेही पूर्ण नग्न झाले व त्यांची क्राॅस कामक्रीडा सुरू झाली. मी चित्रीकरण करू लागलो. पंधरा-वीस मिनिटातच संपले सगळे चित्रीकरण. पण यादरम्यान माझा चड्डीतल्या चड्डीतच आपोआपच वीर्यपात होऊन गेला होता. मी माझ्या ड्युटीवर परतलो व माझी ड्युटी संपून कधी घरी जाऊन आंघोळ करतो याची प्रतीक्षा करू लागलो. यानंतर सुद्धा काही प्रसंग असेच घडले पण त्यावेळेस, त्यानंतर मात्र चित्रीकरण करताना माझा वीर्यपात झाला नाही. 

      फ्लॅट नंबर 65 व 66 हे दोन्ही फ्लॅट एका ट्युशन क्लासच्या चालकाने खरेदी केले होते व दोन्ही फ्लॅट्स ला जोडणारा एक जोडदार आतूनच करून घेतला होता. एका फ्लॅट मध्ये ट्युशन क्लासचा चालक त्याच्या पत्नी दोन बालकांसह राहायचा आणि दुसर्‍या फ्लॅट मध्ये ट्युशन क्लास चालायचा. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतही ट्युशन क्लासला सुट्टी राहत नसली तरी ट्युशन क्लासच्या चालकाची पत्नी व मुले मात्र आठ-दिवसासाठी तरी, सुट्टी घालवायला हमखास बाहेर गावी गेलेली असायची. अशा सुट्ट्यांच्या कालावधीत दर सुट्टीत किमान एकदा तरी एखादी ट्युशन-बालिका, क्लासच्या नियमित वेळेव्यतिरिक्त दुपारी एकटीच क्लासला यायची व तासाभरात परत जायची. मी उपन्यास-कादंबऱ्यांचा वाचक असल्याने मला या सर्वाचा सरळ अर्थ सहजच कळायचा. वस्तूतः ही बाब बहुतेक फ्लॅटधारकांना कळत असूनही वळत मात्र नसल्याचे माझ्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. मग एकेदिवशी मी त्या ट्युशन क्लासच्या चालकाला एकट्यात गाठून माझा अनुमान साग्रसंगीत त्याच्या कानी घालून ही बाब त्याच्या पत्नीला कळविणार असल्याची फालतूच धमकी दिली. त्यानंतर माझ्या दान-दक्षिणेच्या विपर्यासातील रकमेत आपोआपच वाढ झाली. 

      फ्लॅट नंबर 38 मध्ये एक प्रौढवयीन जोडपे दोघेच राहत होते. त्यांना एक मुलगा व एकच मुलगी होती. पण मुलगा सहकुटुंब बेंगळुरू येथे राहत होता. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होता तर सूनबाई एका इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षिका होत्या. वर्ष सहा महिन्यातून एकदा ते आपल्या आईवडिलांना भेटायला येत असत. मुलगी व जावई दोघेही अमेरिकेत व्यवसाय करीत होते. ते सुद्धा वर्ष दोन वर्षातून भेटायला येऊन जात असत. आईवडिलांना सोबत ठेवायला मुला-मुलींची ना नव्हती, उलट त्यांचा तसा आग्रह असायचा. पण दोन-चार महिन्यापेक्षा अधिक काळ ते जोडपे मुला-मुलींकडे राहत नसत. त्यांच्या या फ्लॅटला लागूनच असलेल्या फ्लॅट नंबर 39 मध्ये एक दुसरे कुटुंब राहत होते. या कुटुंबात मध्यमवयीन आईवडील व त्यांची एकुलती एक काॅलेज कन्यका असे तिघेच होते. ही कन्यका जरा जास्तच आधुनिकोत्तर स्वभावाची असल्याने कमीतकमी वस्त्रप्रावरणात वावरणे हा तिचा स्वभावच झाला होता. बाजूच्याच फ्लॅट नंबर 38 मधील प्रौढवयीन कुटुंबाकडे या कन्यकेचे जरा जास्तच जाणेयेणे होते. या प्रौढवयीन कुटुंबातील पुरुष जरा बाहेरख्याली असल्याचे माझ्या, एका उपन्यास-कादंबरीच्या पाठकाच्या, नजरेतून सुटण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्या प्रौढवयीन कुटुंबातील महिला बाजारहाटाकरिता बाहेर गेली की दुसऱ्या फ्लॅटमधील ती कन्यका घरी असली तर हमखास त्या प्रौढवयीन कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये जायची व ती महिला परत येण्यापूर्वीच तेथून बाहेर पडायची. प्रौढ पुरुष व नवतरुणी यांच्यातील अनाकलनीय आकर्षणाचे, संबंधांचे वर्णन असलेल्या उपन्यास-कादंबरीतील काही प्रसंग मला ज्ञात होतेच. एकेदिवशी मी प्लॅनिंग करून ती महिला बाहेर गेली असताना ती तरुणी आत गेल्यावर त्या फ्लॅटची बेल वाजवली. पण काही केल्या दार उघडले गेले नाही. मला तेथे जास्तवेळ थांबता येत नसल्याने थोड्याच वेळात मी तेथून काढता पाय घेतला. तोवर दार उघडले नव्हतेच. काही वेळाने बाहेर गेलेली महिला परत आली. परंतु तोवर नित्याप्रमाणे फ्लॅट नंबर 38 च्या दाराची उघड-बंद अवस्था निपटून गेली असावी. अखेर माझ्यातील खुटीउपाड व लोभी वाचक जागा झाला आणि त्या फ्लॅट नंबर 38 मधील प्रौढ सायंकाळी फिरायला बाहेर पडत असताना मी त्यांना गेटवरच पकडले व दुपारच्या घटनेबद्दल साद्यंत बोललो असता त्यांना घामच फुटला. … आणि … अशाप्रकारे माझ्या दान-दक्षिणाविषयक विपर्यासातील रकमेची आवक आणखी वाढली. (#1120)





Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन