कवी आणि कविता, मी आणि......

*कवी आणि कविता, मी आणि ...*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> विदर्भ साहित्य संघ, शाखा भंडारा / युगसंवाद, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संस्था, भंडारा / मैफल, लाखनी द्वारा संयुक्तरित्या आयोजित *कवी आणि कविता* या विशेष उपक्रमाच्या श्रृंखलेत दि.30 एप्रिल 2016 (शनिवार) रोजी आयोजित दुसऱ्या कडीचा *निमंत्रित कवी* मी होतो. आयोजक डाॅ.अनिल नितनवरे, गझलकार श्री.प्रल्हाद सोनवणे, कवी-चित्रकार श्री.प्रमोदकुमार अणेराव, डाॅ.सुरेश खोब्रागडे, डाॅ.नरेश अंबिलकर आणि काही मोजक्याच रसिक स्नेही मंडळींच्या उपस्थितीत रामटेकचे डाॅ.गिरीश सपाटे यांनी माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. (या मुलाखतीचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे.) 

>> त्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात मी स्पष्टपणे व ठामपणे सांगितले होते की, "मी अजूनही कोणत्याही विचारवाद वा विचारसरणीच्या चक्रव्यूहाला शरण गेलेलो नाही." आजही माझे ते विचार कायमच आहेत. कारण विचारवाद व/वा विचारसरणी यांना मी अजूनही अंतिम मानू शकलेलो नाही. 'मते कालाच्या पोटात विलय पावतात', असे, ह.ना.आपटे यांचे एक विधान, मी माझ्या माध्यमिक शाळेत सारस्वत पाठमाला या क्रमिक पुस्तकात वाचले/अभ्यासले होते/आहे. आणि माझ्या आजवरच्या अल्पबुद्धि-अभ्यास-आकलनानुसार विचारवाद व/वा विचारसरणी या बाबी मला त्या 'मता'च्याच पुढची पायरी/Extensions आहेत, असे आढळून येऊ लागले. त्यामुळे 'मते' ही शाश्वत व/वा अढळ नसतात, याविषयीचे माझे अल्पबुद्धि-आकलन विचारवाद व/वा विचारसरणी यांच्यापुढेही तसेच प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. पर्यायस्वरूप या जगात/विश्वात काही शाश्वत/कायम असेल तर ते बदल/परिवर्तन हेच होय, या विधानावर माझी मदार वाढू लागली. आणि मी सतत प्रवाही असलेल्या *विचारधारा* या संकल्पनेचा आपल्या अल्पबुद्धि-आकलनानुसार अभ्यास करू लागलो, आणि माझे ब्रीदवाक्य असलेल्या "DISSENT : THE VOICE OF PROGRESS" च्या प्रकाशात, माझा तो अभ्यास माझ्या कुवतीनुसार अजूनही सुरूच आहे. 

>> त्यामुळेच कदाचित मी आजकालच्या नानाविध डिजिटल माध्यमातून प्रकट(?) होणाऱ्या उलटसुलट चर्चाविश्वासाठी व चर्चाविश्वात उपराच ठरत आहे/ठरू लागलो आहे, असे माझे नम्र आकलन आहे. 

>> असो. असोच! 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त जिल्हा सहकार निबंधक/डीडीआर)
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(26 मे 2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन