नोकरशाही : काही (कु)विचार (!)

नोकरशाही: काही (कु)विचार
~~~~~~~~~~~~~~~
    >> मी 30 1/2 वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी (नोकरशाह?) होतो. माझी निवड विदर्भ द्वेषी MPSC च्या माध्ममातूनच, पण एका  इमानदार अशा बॅरी.पी.जी.पाटील या पश्चिम महाराष्ट्रातील सुवर्णविचाराच्या विद्वानामुळे, होऊ शकली होती. माझी पहिली पदोन्नति माझ्या 19 वर्षांच्या निष्कलंक व समाजस्नेही लोक-सेवेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री श्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रशासनिक क्षमतेमुळेच होऊ शकली. या 19 वर्षात 10 वर्षे माझा C.R हा OUTSTANDING/सर्वोत्कृष्ट होता. उर्वरीत 7 वर्षे उत्कृष्ट व एके वर्षी चांगला होता. मला त्यापोटी 3 अग्रिम वेतनवाढी सुद्धा मिळाल्यात, परंतु 1996 च्या वेतन आयोगाच्या मंजूरीनंतर त्या वेतनवाढी Pay Fixation दरम्यान निरर्थक ठरल्यात. तर एकंदरीत मला पहिल्या पदोन्नतिचे 'दर्शन' व्हायला 19 वर्षे व मा. शिंदे सरांची कृपा यांची प्रतिक्षा करावी लागली. 

>> या कालावधीत माझ्या नियत कामाव्यतिरिक्त कितीतरी अतिरिक्त कामे, कोणत्याही अतिरिक्त मोबदल्याशिवाय, माझ्याकडून करवून घेण्यात आली. त्यात अविभाजित भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या अभूतपूर्व यशस्वी ठरलेल्या एकल प्रशासकापासून प्रभारी जिल्हा उप निबंधक (डीडीआर) या जिल्हास्तरीय पदाचाही समावेश होता. शिवाय 3-4 तालुक्यांचा अतिरिक्त प्रभाराचाही अंतर्भाव(?) होताच की!

>> त्यातच नागपूर येथील हाऊसिंग सोसायट्यांच्या (तत्कालीन महाराष्ट्रभर कुख्यात झालेल्या) भयंकर स्कॅम मधील, मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरील महत्वाची सुमारे 500 प्रकरणे सुद्धा यशस्वीपणे 'पार' पाडली. अशा "स्थिती"तही माझ्यातील कामाची उर्जा व प्रामाणिकता मी जपू शकलो. पण हा सर्वसमावेशक(!) नियम होऊ शकत नाही, असा 'नियम' कार्यक्षमतेला सदा-सर्वदा पूरकही ठरू शकत नाही. 

>> दोनेक वर्षापूर्वी संजय भास्कर जोशी यांचे 'आहे काॅर्पोरेट तरी' वाचले व शासकीय नोकरशाही आणि काॅर्पोरेट कार्यशैली यांची बरबस तुलना करू लागलो. काॅर्पोरेट क्षेत्रात कार्यक्षमता, कार्यनिष्पादनता, प्रामाणिकपणा, ज्ञान-समृद्धता, ... आणि वेतन तथा पद यांचे जे समन्वयन साधले जाते ते शासकीय यंत्रणेत व कार्यव्यवस्थेत साधले जाते काय? साधता येऊ शकेल/शकते काय? नसल्यास शासकीय नोकरशाहीच्या सध्याच्या (तथाकथित?) मुजोरी व (तथाकथित?) बेफिकीरपणाला जबाबदार कोण, हे ठरवावे लागेल आणि तेव्हाच या समस्येचे वस्तूनिष्ठ विश्लेषण तथा समस्ये(?)चे निराकरणही करता येऊ शकेल असे मला वाटते. 

>> माझे हे उदाहरण मी नमून्यादाखल दिले आहे, परन्तु हा अपवादही नव्हे. हे टिपण/ही पोस्ट संक्षिप्त आहे याची कृपया जाण ठेवावी व ही फक्त पहिली खेप समजावी. यावरील प्रतिक्रिया आजमावूनच पुढच्या खेपेचा विचार करता येईल. 

(ता.क.:- हे टिपण 100% नोकरशाहीला "लागू" पडत नसले तरी "ही #कटू-वस्तुस्थिति" (#BitterReality) मात्र आहेच, हे सरसकट नाकारता येत/येणार नाही. हे लक्षात यावे, यासाठीच हा लेखन-प्रपंच!!!)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
(बोरकन्हार-441902, जि.गोंदिया)
(पुनर्लेखन/11.04.2020/महात्मा फुले जयंती)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन