गडचिरोली : माझ्या जीवनातील एक घटनासंपृक्त गाव

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मी 10 मार्च-2003 ते 12 मे-2006 पर्यंत चंद्रपूर येथे डीडीआर असतानाच्या कालावधीतच जुलै-2004 ते मे-2006 दरम्यान माझ्याकडे गडचिरोली येथील डीडीआर पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आलेला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सहकार व पणन विभागाच्या कामकाजाची इत्यंभूत माहिती मला होती.
>> म्हणूनच मी 15 मे 2006 ते 31 मे 2008 या कालावधीतील यवतमाळ येथील सफल डीडीआर पदानंतर (तेथील एका राजनेत्याशी खटकल्याने) मी स्वखर्चाने व विनंतीने गडचिरोली येथे बदलून गेलो. आणि दि.02 जून 2008 ला गडचिरोली येथील डीडीआर पदाचा प्रभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली.
>> तेव्हा माझ्याकडे डेव्हिल नावाचा लेब्राडाॅर प्रजातीचा आज्ञाधारक, सुंदर प्रशिक्षित कुत्रा होता. आम्ही पती पत्नी दोघे व हा डेव्हिल असे तिघेही आम्ही गडचिरोली येथील शासकीय निवासस्थानी राहायचो. (मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी गेली होती व मुलगा नागपूर ला शिकत होता.)
>> आमच्या त्या शासकीय निवासस्थानात चार फ्लॅट होते. त्यापैकी खालच्या एका फ्लॅटमध्ये माझा निवास होता. या इमारतीच्या पाय-यांखाली गावठी कुत्र्यांचा जमावळा राहायचा. तो जमावळा आमच्या डेव्हिल ला आवडत नसल्याने तो अस्वस्थ होऊन भूंकू लागायचा.
>> 26 सप्टेंबर 2008 ला रात्री सुमारे दहा-साडेदहा वाजता असाच जमावळा जमल्याने डेव्हिल भूंकू लागला. आम्ही टीव्ही वरील बातम्या पाहत बसलो होतो. मी डेव्हिल ला घेऊन (साखळीने बांधून), दुस-या हातात एक काठी घेऊन त्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी बाहेर आलो. ते चार-पाच कुत्रे असल्याने त्यांनी डेव्हिल ला जुमानले नाही. म्हणून मी एका हातात डेव्हिल ची साखळी व दुस-या हातात काठी घेऊन त्या कुत्र्यांना हाकलत रस्त्यावर आलो. तरी ते कुत्रे त्यादिवशी मात्र आवरतच नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव मी काठीने त्या कुत्र्यांना मारण्यासाठी धावलो व त्या गिट्टीभरल्या रस्त्यावर राडधूड उबडाच पडलो. गिट्टी लागल्याने माझ्या डाव्या पायाचा पटेला (गुडघ्याची वाटी) फ्रक्चर झाला. (हे फ्रॅक्चरचे नंतर कळले.) व मी स्वतःहून उठून बसण्यासाठी सुद्धा असमर्थ होऊन बसलो. जवळून जाणारे एक-दोघे मला उचलायला माझ्या जवळ येऊ लागताच डेव्हिल त्यांच्यावर चवताळू लागला. शेवटी पत्नीला बोलावले असता तिने मला उचलले, उठवले व तिच्या सहाय्याने मी इमारतीच्या पायरीवर येऊन बसलो. पटेला फ्रॅक्चर झाल्याने असह्य पीडा होत होती.
>> जवळपासच राहणारा सहायक निबंधक गणवीर व एक कर्मचारी सांगोळे यांना फोन करून बोलावून घेतले व ताबडतोब शासकीय रुग्णालयात गेलो. तिथे कळले की, मायनर फ्रॅक्चर आहे. मलमपट्टी वगैरे करून घरी आलो.
>> तिस-या-चौथ्या दिवशी दुखणे तीव्र झाल्याने चंद्रपूर ला डाॅ.गाडेगोणे यांच्याकडे जाऊन तपासणी केली असता फ्रॅक्चरची गंभीरता आणि तीव्रता कळली. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली व फ्रॅक्चर झालेला पटेला सांधून घ्यावा लागला. तरी त्यामुळे माझा डावा पाय नेहमीसाठी अंशतः विकलांग/दिव्यांग होऊन मला नेहमी चालताना काठीचा आधार घेणे अनिवार्य ठरले. त्यानंतर मी आणि माझी काठी यांची दोस्ती अमर झाली.
>> डिसेंबर 2008 मध्ये नागपूर येथील महाराष्ट्र विधान सभेचे सत्र संपल्याबरोबर मा.सहकार मंत्री यांनी गडचिरोली येथे एक शेतकरी सहकार मेळावा घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार त्या मेळाव्याच्या यशस्वीतेच्या देखरेखीसाठी पुणे येथील मुख्यालयातील दोन वरिष्ठ अधिकारी श्री.सुभाष काशीकर आणि श्री.×××× यांना नेमण्यात आले. ×××× साहेब उंटावरून शेळ्या हाकण्यातच व्यस्त राहिल्याने काशीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची, संभाव्य त्या सर्व शक्यता आजमावून, तयारी करण्यात आली. गडचिरोली येथे उपलब्ध होऊ शकणा-या सा-या शक्यता मोठ्या मुश्किलीने उभारून/वापरून कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. (कार्यक्रमानंतर मंत्रीमहोदयांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेची तोंडभरून स्तुती सुद्धा केली.)
>> परंतु गडचिरोली सारख्या आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित भागात/गावात एवढी चांगली आखणी करूनही मंत्रीमहोदयांच्या आगमनाच्या सुमारे पंधरा मिनिटे अगोदर पोचलेल्या ×××× साहेबांनी आमच्या आखणी व आयोजनाची अतिशय कटू शब्दात निर्भत्सना केली व मला भलतेच अद्वातद्वा बोलले. मी कधीही क्रोधित न होणारा व्यक्ती त्यांच्या त्या अवांछित व अवाजवी अशा अपमानास्पद व कुत्सित बोलाने अतिशय क्रोधित होऊन स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसलो व दुर्दैवाने अपघातामुळे माझ्या हाती असलेली/आलेली काठी घेऊन त्यांना मारायलाच धावलो. उपस्थित काशीकर साहेब, विसनि दुष्यंत सिडाम साहेब वगैरे थक्क होऊन बघतच राहिले. पण तितक्यातच सिडाम साहेबांनी प्रसंगावधान राखून मला गच्च धरून ठेवले. यानंतर ×××× साहेबांनी तेथून पळच काढला. आणि अगदी पाचच मिनिटात मंत्रीमहोदय कार्यक्रम स्थळी पोचले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. गडचिरोली सारख्या आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित भागात इतक्या सुंदर व नेटकेपणे कार्यक्रम घेतल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी आमची स्तुती सुद्धा केली.
>> तर अशी ही माझी पटेला फ्रॅक्चर मुळे लाभलेल्या काठीची कथा*! ही कथा जो अकरा वेळ शांतपणे ऐकून घेईल त्याला नेहमी सज्जन व सभ्य असेच वरिष्ठ लाभतील आणि कोरोना सुद्धा बाधणार नाही, याची त्यांनी खात्री बाळगावी. 😀😀😀⚘⚘⚘🙏🙏🙏
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार, जि.गोंदिया
(06.04.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(*ही सत्य घटना असून 18 जानेवारी-2009 ला झालेल्या माझ्या "त्या" भयंकर अपघातापूर्वीच घडलेली आहे.)
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

Comments
Post a Comment