Posts

पहिले संविधान संशोधन, 18 जून 1951 आणि...

*पहिले संविधान संशोधन, 18 जून 1951 आणि आजचा भारत : एक संक्षिप्त आकलन* (शेतकऱ्यांच्या नजरेतून) ++++++++++++++++++++++++++++++++++           काही भ्रम मजेदारच असतात. भारताच्या स्वातंत्र्याला इंडियाच्या स्वातंत्र्याने असेच भ्रमातच ठेवले आहे. इंडियाच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे नेतृत्व इंडिया ऐवजी सच्च्या भारताच्या एखाद्या सच्च्या सुपुत्राकडे गेले असते, तर आज संविधानातील Article 32 ला असे दुर्दिन पहावे लागले नसते, कदाचित!       या Atricle 32 ची शब्दरचना अशी आहे.... 32.Remedies for enforcement of rights conferred by this Part :- (1) The right to move the Supreme Court by appropriate proceedings for the enforcement of the rights conferred by this Part is guaranteed. (2) The Supreme Court shall have power to issue directions or orders or writs, including writs in the nature of habeas corpus, mandamus, prohibition, quo warranto and certiorari, whichever may be appropriate, for the enforcement of any of the rights conferred by this Part. (3) Without prejudice...

शिकायत : पीएमओ इंडिया x

महोदय, सादर प्रणाम.  >> ट्रेन नं.12130, आझाद हिंद एक्स्प्रेस, हावरा से पुणे : हरदिन तीन/चार घंटे विलंब से चलती है। 14/06/2024 को पुणे पहुँचते पहुँचते दोपहर के 12:35 हो चुके थे, जबकि उसका पुणे पहुँचने का निर्धारित समय सुबह 07:05 का है। यही हाल कई दिनों से चल रहा है और फिलहाल भी हरदिन का यही हाल है। इससे इस रूटपर प्रवास करने वाले यात्री बेवजह नाराजी पाले हुए है। यह मा.श्री.नरेंद्रजी मोदी, प्रधानमंत्रीजी को जानबूझकर बदनाम करने का षडयंत्र तो नही? इसकी कृपया आप स्वयं अपनी देखरेख में जाँच कराईएगा। हावरा-मुंबई और हावरा-पुणे इस रूटपर चलनेवाली लगभग सभी ट्रेने, अप और डाऊन भी, अक्सर बहुतही विलंब से चलती है। मै एक रास्वसं का सहभागी होने से मुझे यह प्रधानमंत्रीजी के कार्यकाल और कार्यपद्धति को बदनाम करने का गंभीरतम षडयंत्र लग रहा है। कृपया अवश्य सघन जाँच कराईएगा। @लखनसिंह कटरे, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)19.06.2024

ॲब्सर्डिझम आणि मनुष्याचे "असणे".....!

Adv.Lakhansingh Katre ॲब्सर्डिझम आणि मनुष्याचे "असणे".....! December 21, 2020 □मित्रवर्य गणेश कनाटे द्वारा संपादित व मित्रवर्य मनोज पाठक द्वारा प्रकाशित "बेकेट : आय डोन्ट नो म्हणतो म्हणून" हे पुस्तक वाचताना......... व त्यानंतर......! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 👇 *ॲब्सर्डिझम आणि मनुष्याचे "असणे".....!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          वेळेचा छोट्यात छोटा अंश, सेकंदाचा कोट्यांश किंवा त्यापेक्षाही कितीतरी पटीने छोटा वेळांश/काळांश सुद्धा कायम स्थिर नसतो, तो सतत व कायम परिवर्तनमय असतो. अशा परिवर्तनमय वेळांश/काळांश बद्दल किंवा या काळांशात घटित होणारा/झालेला कोणताही प्रसंग, घटना, ..... काहीही बद्दल "मी जाणतो" असे विधान करणारी व्यक्ती सपशेल खोटे(!) बोलत असते. वस्तूतः "मला काहीही माहिती नाही" -- "I do not know." हेच विधान काही प्रमाणात तरी वस्तुस्थिती-निदर्शक असते. कारण "जाणणे" ही संकल्पनाच ॲब्सर्ड असून तिला यथार्थ स्वरूपात परिभाषित करताच येत नाही. तसेच मानवी जीवन सुद्धा Absolute/निरपेक्ष नसून "सापेक्ष"शील/(Relati...

"पोवारी" बोली/भाषेविषयी.... : एक संक्षिप्त टिपण

*"पोवारी" बोली/भाषेविषयी.... : एक संक्षिप्त टिपण* ****************************************** (Revised on 17.06.2024) ~~~~~~~~~~~~~~~~~~~       @पूर्व विदर्भातील झाडीपट्टीचे मुख्य जिल्हे म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तथा नागपूर, वर्धा जिल्ह्यांचा काही भाग आणि जुन्या सी.पी.आणि बेरार मधील तथा आताच्या मध्यप्रदेशातील बालाघाट व सिवनी ह्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी बोली/भाषा म्हणजे ही प्राचीनतम "पोवारी" बोली/भाषा होय. या पोवारी बोली/भाषेत भोयरी/पवारी बोलीचाही समावेश केल्यास ह्या दोन्ही बोली बोलणाऱ्या पोवार व भोयर/पवार समाजाची या भागातील लोकसंख्या दुर्लक्षित करता येणार नाही इतकी मोठी आहे. यातील भोयरी/बोली बोलली जाण्याचे प्रमुख स्थान म्हणजे नागपूर, वर्धा हे महाराष्ट्रातील तथा बैतुल व छिंदवाडा हे मध्यप्रदेशातील जिल्हे आहेत. पोवारी आणि भोयरी/पवारी(?) या एकाच मूळ समुहाच्या बोलीभाषा आहेत की हे दोन्ही समूह/समाज मूलतः वेगवेगळे आहेत याबद्दल तद्विषयक संशोधकांमध्ये प्रामाणिक मतभेद असून त्यात काही सूक्ष्म व/वा मोठे फरक कालांतराने व स्थलभेदान...

येथून पुढे जाताना.......!

*येथून पुढे जाताना........!* ~~~~~~~~~~~~~~ प्रिय रसिक वाचकहो,        साहित्यिक, प्रकाशक, संपादक आणि साहित्याचे रसिक वाचक यांच्या परस्पर संबंधाच्या संदर्भात माझे विचार असे आहेत की, कोणतेही साहित्यिक व/वा इतरही लिखाण, जे "गुरू-शिष्य संवादा"ला पूरक असते, ते "मित्र-मित्र संवादा"ला मात्र घातकच ठरते.          गुरू-शिष्य संवादाच्या लिखाणाचा मुख्य (कदाचित छुपा) उद्देश प्रामुख्याने असा असतो की, गुरुने ठाम(?) व अपरिवर्तनीय(?) मत मांडायचे आणि वाचकाने स्वतःचा कोणताही विचार न मांडता/करता तेच/गुरुचेच म्हणणे सत्य मानले पाहिजे, तसेच आचरण व अनुकरण केले पाहिजे. पर्यायस्वरूप ते लिखाण म्हणजे एकप्रकारे सहमतीच्या हुकूमशाहीला पूरक व कुलूपबंद वृत्तीचे द्योतकच असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण की, वाचकाने त्यावर असहमती, शंका वा जरासाही विरोध व्यक्त केला वा तत्संबंधित साधक-बाधक चर्चा उपस्थित केली तर त्या वाचकाला शिष्यत्वाच्या कट्ट्यातून उचलून शत्रूच्या पिंजऱ्यात ढकलण्यासारखेच असते.        याउलट मित्र-मित्र* संवादाचे लिखाण प्रामुख्याने वाचकाल...

आकलन : एक बहुआयामी/Multidimensional विचार प्रक्रिया.

*आकलन : एक बहुआयामी/Multidimensional विचार प्रक्रिया* -------------------------------------------------------------      तीन वर्षात प्राप्त करावयाची बी.एससी.(पीसीएम) ची पदवी मी पाच(🤔) वर्षात, जून-1977 मध्ये अखेर प्राप्त केलीच! नंतरच्या शिक्षणासाठी एम.एससी.(फिजिक्स) मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने (ही वेगळीच स्टोरी आहे!) नाईलाजास्तव मला एलएल.बी. साठी प्रवेश घ्यावा लागला. एन.एम.डी.काॅलेज गोंदिया येथे एलएल.बी. चे वर्ग सायंकाळी सहा ते नऊ असे लागायचे(!). मी एलएल.बी. चा पूर्णवेळ विद्यार्थी असल्याने मी प्रथम वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक पिरीएड ला उपस्थित राहून, माझ्यासाठी एकदम नवा असलेला, विषय पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे.       आमच्या लाॅ विभागाचे प्रमुख श्री.राव सर हे अतिशय नावाजलेले असे विधी-प्रवीण प्राध्यापक होते. त्यांचा एकही पिरीएड मी चुकूनही चुकवत नसे. अगदी सुरुवातीला त्यांनी लाॅ विषयाबद्दल जे सांगितले ते मी कधीच विसरू शकत नाही. ते म्हणाले होते की, कोणत्याही कायद्यात/अधिनियमात काय सांगितलेले/लिहिलेले आहे, हे समजून घेण्यासाठी तुमची फक्...

निजता का विरेचन

*निजता का विरेचन* ~~~~~~~~~~~ >> निजता जब सार्वजनिक रूप से प्रभावित होने लगती है तब उसका विरेचन अनिवार्य रूप से आवश्यक जान पड़ता है। इसी के मद्देनजर मै आज अपनी निजता का विरेचन सार्वजनिकता में करना चाहता हूँ।  >> यह बात कोई नयी या अनहोनी नहीं है कि हर जीवन का अंत निश्चित है। फिरभी यह अंत कई बार हमें हिला देता है, अस्वस्थ कर देता है। कल ही की बात लिजिए। हम कुल आठ साडू (सागील) है(थे)। जिनमे से हमारे द्वितीय क्रमांक के साडू 4 अगस्त के रात्रि में निसर्गशरण हो गए। मै पत्नी के साथ उनके अंतिम दर्शन कर उनके अंतिम संस्कार के वक्त पूर्ण समय उपस्थित था। बड़ी अजीब सी अस्वस्थता का अनुभव कर मै बारबार भावुक हो जाता था। जबकि मेरे भयंकर अपघातों की श्रृंखला तथा मेरी कैंसर मैत्री के दरमियान भी मै कभी अस्वस्थ, विचलित या भावुक नहीं हुआ था। फिर यह क्या था, क्या उम्र का तकाज़ा, या यादों की बारात, या कुछ और जो मुझे अस्वस्थ और भावुक कर गया। अंतिम क्षण तो सभी को 'भोगना'ही है, यह एकमात्र परमसत्य है। फिर भी हम ऐसे कुछ क्षणों में विचलित, अस्वस्थ, भावुक क्यो हो जाते है? इस प्रश्न का उत्तर भगवद्गी...