Posts

◇नसणे : वडीलांचे ! ◇ एक स्मरण

◇नसणे : वडीलांचे ! ◇ एक स्मरण ****************************        दि.25 जानेवारी 2018, गुरूवारला दुपारी 01:32 वाजता माझे वडील श्री.मोहनभाऊ कटरे हे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धावस्थेमुळे हे जग सोडून गेले. माझे आजोबा श्री.उकनभाऊ पाटील ऑगस्ट 1948 मध्ये वारले, तेव्हा माझ्या वडीलांचे वय फक्त 18 वर्षाचे होते. त्या वयातही त्यांनी कुटूंबाचा सारा कारभार सांभाळला. सोबतीला त्यावेळचे आमचे आवारी श्री.शिवलाल कुंभरे हे आदिवासी समाजातील स्वामीनिष्ठ व्यक्ती होते.           शिवाय मोडकूकाका चव्हाण, मंगरूबडो चव्हाण, भैय्यालालभाऊ कुंभरे, उरकुडाबाबा शरणागत, छगनमामा शरणागत, कुकसीबडो भोयर, इंदलबाबा भोयर, वळगूबाबा येल्ले, बाबूलालमामा शरणागत, चुन्नीलालभाऊ सर्राटी, रावजीबाबा आंबेडारे, कारूभाऊ मेंढे, लोंढू(रूपचंद)भाऊ मेंढे, डोकूभाऊ नेवारे, गोंडूभाऊ नेवारे, दयारामभाऊ भूमके, तुकारामभाऊ भूमके, चिंधूभाऊ भूमके, फंदूभाऊ भूमके, मयारामबडो गौतम, डोमाबडो सहारे, बेनीमामा गौतम, चिंधू(भसकी)बडो सर्राटी, यासारखे जीवाभावाचे स्वामीनिष्ठ व कौटुंबिक/परिवारसम सेवक(!) सोबत होते. या सर्वा...

अंधश्रद्धा म्हणावी की आणखी काही?

*अंधश्रद्धा म्हणावी की आणखी काही?* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        07 जानेवारी 2022 ला आमच्या गावातील माझ्या घराशेजारील एका पुरुष व्यक्तीचे निधन झाले. ही व्यक्ती माझ्याहून चार-पाच वर्षांनी लहान असली तरी दीर्घ आजाराचे निमित्त होऊन ह्या व्यक्तीची देहातून सुटका झाली. जमलेल्या मंडळींनी, आमच्या भागात प्रचलित असलेल्या पं.बाबूलाल चतुर्वेदी यांच्या भुवन विजय पंचांग या हिंदी कॅलेंडरचे अवलोकन केले असता 05 जानेवारीच्या रात्री 11:55 वाजतापासून 10 जानेवारीच्या दुपारी 12:32 वाजेपर्यंत "पंचक" असल्याचे दिसून आले. म्हणजेच सदरील व्यक्तीचे निधन पंचकात झाले, असा निष्कर्ष निघाला.         या "पंचक" बद्दलची जनमान्यता अशी की, पंचकात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पाठोपाठ गावातीलच आणखी किमान पाच व्यक्तींचे सुद्धा निधन होते. म्हणून अशा "पंचकात" निधन पावलेल्या व्यक्तीसोबत कणकेचे पाच पुतळे तयार करून त्यांचाही अंतिम संस्कार करण्यात येतो. त्यामुळेच तेथेही तशी व्यवस्था करण्यात आली.        त्याचदिवशी संध्याकाळीच आणखी एक सुमारे पन्नासेक वर्षे वयाची व्...

गतिमान संतुलन आणि मी : एक टिपण (प्रकाशित)

"गतिमान संतुलन" (संपादक : दिलीप कुलकर्णी) या मासिकाच्या जानेवारी 2022/सौर माघ, शके 1943 (वर्ष : 21, अंक : 2) या अंतिम अंकात प्रकाशित माझे एक मनोगत... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *गतिमान संतुलन आणि मी : एक टिपण* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> लोकसंख्या सुमारे 2345 असलेले झाडीपट्टीतील एक छोटेसे गाव बोरकन्हार हे माझे जन्मगाव. या गावात माझी वडिलोपार्जित 60 एकर धानाची शेती होती/आहे. असा मी एक गावकरी, महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात एक राजपत्रित/शासकीय अधिकारी म्हणून एमपीएससी मार्फत निवड होऊन महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ते मुंबई आणि पुणे ते बीड, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली अशा विविध शहरी भागातून नोकरीनिमित्त मी 'भटकत'(?) राहिलो. >> अविभाजित भंडारा जिल्ह्य़ातील एक मोठे शहर असलेल्या व मुंबई ते हावडा या प्रमुख रेल्वेरूटवर वसलेल्या गोंदिया या सद्यकालीन जिल्ह्याच्या शहरात भाड्याने खोली करून मी शिकलो आहे. शरद पवार गोंदियाला 'मिनी मुंबई' असे संबोधतात. त्यामुळेच कदाचित या शहरात आपलेही घर असावे म्हणून मी 1996-97 दरम्यान गोंदिया येथे ए...

एक वाढदिवस (अपघाताचा) असाही...!

●एक वाढदिवस (अपघाताचा) असाही...!● ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~            आजपासून बरोबर 13 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी  (18 जाने. 2009ला ) गडचिरोली येथे शासकीय कामानिमित्त दौऱ्यावर असतांना माझा मोठा/जीवघेणा अपघात झाला व त्यात माझा डावा हात पूर्णतः (Brachial Plexus Injury ने) नेहमीसाठी दिव्यांग (!!!!!!) झाला. उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर असा तथाकथित(?) डाॅक्टरांच्या मोहजालात भटकत भटकत अखेर चंद्रपूर येथील माझे सन्मित्र डा.गाडेगोणे यांच्या उचित सल्ल्यानुसार पुणे येथील संचेती हाॅस्पिटल येथे डाॅ.अरुण भाटिया आणि डाॅ.आशिष बाभुळकर यांना शरण गेलो. दोन्ही डाॅक्टरांनी सुमारे तेरा तास यशस्वी शस्त्रक्रिया करून माझ्या छातीतील श्वास घेण्याला साह्यभूत ठरणाऱ्या एका लिगामेन्ट(!)चा मार्ग बदलून ती लिगामेन्ट माझ्या डाव्या हाताच्या एका अपघातग्रस्त लिगामेन्टशी जोडून दिला आणि सुमारे तीन-चार वर्षापर्यंत हळूहळू माझा पूर्णतः परावलंबी झालेला अपघातग्रस्त डावा हात अल्प प्रमाणात तरी स्वयंचलित होऊ शकेल अशी आशा जागवून दिली. सुमारे सहा महिने मी संचेती हाॅस्पिटल येथील उपचार घेत होतो....

कोकिला की कुहूक में.....

*कोकिला की कुहूक में....!* ~~~~~~~~~~~~~~~ >> 1965-66 दरम्यानची ही घटना असावी. मी पाचवी.किंवा सहावीत असेन, वय वर्षे 10-11वगैरे. माझा एक मावसभाऊ हायस्कूल शिक्षणासाठी आमच्या गावी, आमच्या घरीच रहायचा. त्याच्या गावापासून आमगांव पर्यंत फक्त गाडदान होती, कच्चा-पक्का कसाही रोड नव्हता आणि पावसाळ्यात ती गाडदानही उपयोगाची राहत नसे. आमचे गाव मात्र आमगांव-देवरी या तत्कालीन कच्च्या (का असेना) रोड(?)वर असल्याने बोरकन्हार ते आमगांव सायकलने जाणे-येणे सहज-सुलभ होते. म्हणून माझा तो मावसभाऊ आमच्या घरूनच त्याची शाळा करायचा. >> एकदा त्याने कुठून तरी हिन्द पाॅकेट बुक्स चे एक हिंदी गीतांचे पुस्तक आणले. त्यात हिंदीतील मान्यवर गीतकार/कवी यांचे गीत संकलित केले होते. रामायण, महाभारतादि ग्रंथांचे माझे वाचन (त्या वयातही आईच्या कृपेने) हिंदीतूनच झाल्याने मी हिंदीशी परिचित होतोच. मी सुद्धा ते पुस्तक वाचले. त्यातील एक गीत मला खूप खूप आवडले. ते पूर्ण गीत आज आठवत नसले तरी सुरुवातीच्या दोन ओळी अजूनही आठवतात. कदाचित शब्द, लयादि अनुकूलतेमुळे मला ते आवडत असावे. मी पुष्कळदा ते गीत आपल्या भसाड्या आवाजात गातही असत...

श्री.गो.तु.पाटील सर यांच्या अमृत-महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने...

श्री.गो.तु.पाटील सर यांच्या अमृत-महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      First impression is the last impression, या सूत्रावर माझा बिलकुल विश्वास नाही. माझ्या संपूर्ण शासनसेवा काळात प्रशासन राबविताना मी नेहमी या सूत्रातील फोलपणा अनुभवला आहे. पण कोणताही नियम अपवादाशिवाय पूर्णता पावत नाही, हे सत्यसुद्धा मी अनुभवले आहे.      1997-98 दरम्यान मी तत्कालीन भंडारा (सध्याच्या गोंदिया) जिल्ह्यातील अर्जूनी/मोरगाव येथे तालुका निबंधक (सहकार व पणन) म्हणून कार्यरत होतो. या तालुक्यात नवेगावबांध हे अभयारण्य असून तेथे दूरदूरून पर्यटक येत असतात. सुटीचा दिवस असल्याने एके दिवशी मी घरीच होतो, तेव्हा आमच्या घरमालकाच्या दुकानातील पो-या सांगत आला की, कोणीतरी तुम्हाला विचारत आहेत, ते गाडीतच बसले आहेत. मी जाऊन पाहिले असता माझ्या हस-या प्रतिसादाला मोहक हास्याचा प्रतिसाद देणारे एक अनोळखी व्यक्तीमत्व गाडीजवळ उभे राहून मला "न्याहाळत" होते. आम्ही दोघांनी एकदुस-याला कधीच पाहिले नसल्याने त्यांनीच ओळख करून दिली की, ते गो.तु.पाटील आहेत व नवेगावबांधला भेट देऊन "अनुष्...

दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूर, दि.19.12.2021 (संमेलनाध्यक्षांचे भाषण)

*दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन, दि.19 डिसेंबर 2021*, *(पवार विद्यार्थी भवन, कुकडे लेआऊट, एन.आय.टी. गार्डन च्या समोर, नागपूर)* ----------------------------------------------------------------------                   *संमेलनाध्यक्षाचे भाषण*   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य आणि पोवारी संस्कृती : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~             @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार,   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आम्ही पोवार आहोत आणि पोवार समाजाची उत्पत्ती अग्निकुण्ड मधून झाल्यामुळे आम्हाला अग्निवंशी क्षत्रिय म्हणतात. पण हळूहळू, भिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला असल्याने आमच्या समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणाचे सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता पण दिसते. आणि म्हणूनच "आपली संस्कृती टिकविण्या सोबतच विभिन्न क्षेत्रात बसलेल्या आमच्या पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा पण आम्ही आदर केला पाहिजे...