Posts

दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूर, दि.19.12.2021 (संमेलनाध्यक्षांचे भाषण)

*दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन, दि.19 डिसेंबर 2021*, *(पवार विद्यार्थी भवन, कुकडे लेआऊट, एन.आय.टी. गार्डन च्या समोर, नागपूर)* ----------------------------------------------------------------------                   *संमेलनाध्यक्षाचे भाषण*   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य आणि पोवारी संस्कृती : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~             @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार,   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आम्ही पोवार आहोत आणि पोवार समाजाची उत्पत्ती अग्निकुण्ड मधून झाल्यामुळे आम्हाला अग्निवंशी क्षत्रिय म्हणतात. पण हळूहळू, भिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला असल्याने आमच्या समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणाचे सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता पण दिसते. आणि म्हणूनच "आपली संस्कृती टिकविण्या सोबतच विभिन्न क्षेत्रात बसलेल्या आमच्या पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा पण आम्ही आदर केला पाहिजे...

मी एक नवोदित(!) साहित्यिक(?).

◇*मी एक नवोदित(!) साहित्यिक(?)*◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~             माझा जन्म फेब्रुवारी 1955 चा. माझी मातृभाषा पोवारी/हिंदी. शालेय शिक्षण मात्र (गणित वगळता) मराठी माध्यमातूनच झाले. नंतरचे पुढील सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. तरी माझे पहिले प्रकाशित साहित्य(लेख) हिंदीतून डिसेंबर 1972 मधले. मराठीतले पहिले प्रकाशित साहित्य(कविता) एप्रिल 1978 मधले.  >> 1978 ते 1980-82 या माझ्या भाषा-संक्रमण  काळात अखेर मराठी वरचढ ठरली व मी 1980-1982 पासून पूर्णतः मराठी लेखनाकडेच वळलो. (बिचारी मराठी म्हणाली असेल, आला आणखी एक उपटसुंभ! पण मी काही मराठीचा पिच्छा सोडला नाही.) दरम्यान आनंद यादव, कृष्णा चौधरी, यशवंत मनोहर, दिनकर देशपांडे, योगेन्द्र मेश्राम, केशवराव कोठावळे, अवधूत शास्त्री, या दिग्गजांशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध जुळत गेला. हरिश्चंद्र बोरकर या झाडीबोलीच्या एका अभ्यासकाशी सुद्धा सख्य जुळत गेले. >> 1990 ते 1993 दरम्यान साकोली येथे कार्यरत असताना चाकोरीबाह्य, नावीन्यपूर्ण विचार करणा-या अनिल नितनवरे या चिरतरूण साहित्यिकाशी मैत्री जुळली.(23 जानेव...

लाखांदूर एपिसोड : एक भयस्वप्न

*लाखांदूर एपिसोड* : एक भयस्वप्न  ~~~~~~~~~~~~~~~~~~~           ऑगस्ट 17 च्या दरम्यान एका वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती की, दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे एका विरोधी पक्षनेत्याकडे प्राप्त झाले आहेत. मला त्या विरोधी पक्षनेत्यांना सांगायचे आहे की, 'त्या पुराव्यांचा काही उपयोग होईल असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत नाही.'  ----->>>>>      माझा एक छोटासा अनुभव सांगतो... 1996-97 मधील सत्य घटना आहे ही. तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील एक तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) सेवानिवृत्त झाल्याने त्या तालुक्याचा प्रभार कोणाला द्यावा यासाठी जिऊनि कार्यालयात खूप मोठे(?) खलबत(!) झाल्यावर कोणीही तेथील प्रभार घ्यायला तयार(?) नसल्याने मला विश्वासातही न घेता तो अतिरिक्त प्रभार मला सोपविण्यात आला. तेथील एक कनिष्ठ कर्मचारी नागपूर, अमरावतीच नव्हे तर राज्यातील संपूर्ण सहकार, पणन, ... विभागात सु(?)विख्यात (कुप्रसिद्ध?) होता. स्वतःच्या भ्रष्टाचाराला आच लागू नये म्हणून सर्वच वरीष्ठांच्या खोट्यानाट्या पुराव्यां(?)सह खोट्यानाट्या तक्रार...

विचार केलाच तर !

□विचार केलाच तर ! ~~~~~~~~~~~          आज थोडेसे वेगळेच लिहावेसे वाटते. त्याला कारण झालेय, एका सुप्रसिद्ध व महत्वाच्या वर्तमानपत्राच्या मालक/चेअरमन यांच्या एक सोमवासरीय स्तंभातील लिखाणाचे! हा स्तंभ माझा अतिशय आवडता आहे. मी हा स्तंभ कधीही चुकवत नाही. या स्तंभातून मांडण्यात येणारे/आलेले विचार व त्यावरील उपाययोजनाही मननीय, विचारणीय व आचरणीयही असतात. आजच्या स्तंभात त्यांनी किशोरवयीन गुन्हेगारांच्या समस्येविषयी अतिशय मुलभूत चिंतन मांडले आहे. (प्रत्येकाने ते अवश्य वाचावे असे मला वाटते.) त्यावरील माझा प्रतिसाद मी कोणत्याही टिपणी किंवा भाष्याशिवाय व्यक्त करीत आहे. एक:-मी बालपणी कदाचित खूप सुंदर दिसत असावा(?). मी 4थी किंवा 5वीत असेन. गावांमध्ये आजही बहुतेक घरी लघवीसाठी जनावरांचा गोठाच राखीव असतो. आमच्या वाडीत बांधलेल्या गोठ्यात एका सकाळी मी लघवीला गेलो होतो. बसून लघवी करायची सवय होती. मी लघवी करीत असतांनाच कोणीतरी हळूच येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवले. अर्थातच मी दचकून मागे पाहिले. माझ्याच वयाची एका *****ची मुलगी होती ती! तिने केलेली "मागणी" ऐकूनच मी तेथून पळालो व थेट आईक...

पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान.

पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~        साल 2014-15 को दरम्यान मी एक पोवारी बोली/भाषा की पोस्ट फेसबुक परा टाकेव होतो. वोको पह्यले मी फेसबुक परा पोवारी पोस्ट बाचेव वा देखेवच् नोहोतो. मोरो फेसबुक-मित्र परिवार मा करीब साडेतीन हजार मित्र सेती, अना मी करीब एक सौ व्हाॅट्सॲप ग्रूप मा सेव. पर कही भी मोरो साल 2014-15 को पोस्ट को पह्यले मी पोवारी पोस्ट ना देखेव होतो ना बाचेव ना आयकेव होतो.                  मंज्या 2014-15 को दरम्यान मी फेसबुक परा पोवारी बोली की पोस्ट टाकेव् त् पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान करनेवालो पह्यलो व्यक्ती  मीच् आव्, असो मी कव्हन् लगेव त् वू सोळा आणा गलत होये, मी आता रावण को अनुयायी होन् लगेव् असो वोको सीधो अर्थ होये. अना असो बेमतलबको अनुमान ला, मी आपली पाठ आपुनच् थपथपायस्यानी, सच कर रही सेव् असोच् वोको अर्थ समजे पाह्यजे, असो मोरो बिचार से.      पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान साठी आमरो पोवार समाज को बोहुत महानुभावईन्न बोहूत पह्यले पासून महत्त्वपूर्ण काम करी सेन्. ज...

एक आठवण (1987)

एक आठवण (1987) ~~~~~~~~~~~~~~ परीविक्षा कालावधी संपल्यानंतर मला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे TARCS म्हणून पोस्टींग मिळाली. तेव्हा माझ्या फक्त सहा महिन्याचा असलेल्या मुलाचे हेमेनजोयमा चे (कान व गळा यामध्ये) मोठे ऑपरेशन (26 टाके लागले होते) नुकतेच नागपूरच्या शासकीय मेडीकल हाॅस्पिटल मध्ये झाले होते व दर पंधरा दिवसांनी फाॅलोअप साठी जाणे अनिवार्य होते. पण पादोद्यासारख्या 700-750 किमी अंतरावरून हे शक्य नसल्याने मी नागपूरच्या जवळपास कुठेही स्थानांतर व्हावे म्हणून विनंती केली होती. सुमारे सात महिन्यानंतर माझी विनंती मान्य(?) होऊन मला गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज(वडसा) येथील CBF येथे प्रतिनियुक्तीवर पोस्टींग देण्यात आली. पशूसंवर्धन विभागांतर्गत असलेले हे Cattle Breeding Farm सुमारे हजार एकरात पसरलेले(!) असून वडसावरून सहा -सात कि.मी.वर आहे. तेथे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्वप्नातील ''दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम...." हा द्विवर्षीय डिप्लोमा कोर्स  चालविला(?) जात होता. (एकूण तीन ठिकाणी असे शासकीय कोर्स सुरू करण्यात आले होते, ...

कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!

*कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        कविता म्हणजे काय? हा प्रश्न अजूनही निर्विवादपणे सोडविता आलेला नाही. आणि कदाचित त्यामुळेच आज जागतिक स्तरावरही सर्वत्रच "कवीं"चा भयंकर(!) सुळसुळाट आढळून येतो. स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो..... हे आंशिक सत्य असले तरी व्हाॅट इज ओव्हरफ्लो आणि ओव्हरफ्लो ऑफ व्हाॅट, हे प्रश्न अजूनही एकवाक्यतेच्या प्रतिक्षेत तडफडतच आहेत.      मी जेव्हा "कावळा हागता  चिमणीला विटाळ..." अशा "प्रारंभा"ची कविता प्रकाशनार्थ पाठवतो तेव्हा मूळ ग्रामीण असलेली पण व्यवसायामुळे शहरी झालेली संपादकीय मानसिकता मला "आदेशात्मक सूरात" कळवते की, "हागता" हा शब्द वगळून त्याऐवजी "शिटता" हा शब्द वापरावा.      मी एक अप्रसिद्ध व उजळ ग्रामीण मानसिकता जपून असलेला, झाडीपट्टीतील झाडप्या, व्यक्ती असल्याने जरा खडसावूनच लिहिले की,  ## माझ्या बालपणी माझी आई महिन्यातील तीन-चार दिवस बाहेर बसायची व माझी आजी स्वैंपाक करायची. मी आईला याचे कारण विचारल्यावर ती मला सांगायची की, 'चिंचेच्या झाडाखालून परसाकडे जाताना माझ्या डोईव...