मी सुद्धा एक सामान्य माणूसच...
मी सुद्धा एक सामान्य माणूसच...
¤
>> मी स्पष्टवक्ता असलो तरी दुष्टवक्ता नाही.
¤
>> माझी दौड मतभेदापर्यंतच असते, ती मनभेदाला स्पर्श करीत नाही.
¤
>> 'ताकाला जाऊन भांडे लपविणे' ह्या वृत्तीवर मी सडकून टीका सुद्धा करतो. कारण असे करणे म्हणजे दुटप्पीपणाचा अवलंब करणे होय, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. पण त्यामुळे मी टीका केलेली व्यक्ती माझा/माझी दुश्मन नसते.
¤
>> गौतम बुद्धाचा original text चा बुद्ध-धम्म डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या संशोधनात्मक ग्रंथात मांडताना restoration of (original) text साठी collations, interpolation, addendum, et corrigendum, apocryphal literature आदि पाठभेद-शोधक /सिद्धांतांचा/प्रक्रियांचा वापर करून मूळ रुपाच्या अगदी सन्निकट जाणारा बुद्ध धम्म त्यांच्या अनुयायांकरिता सिद्ध केला. तसा *"सर्वमान्य"* प्रयत्न अन्यधर्मीयांतील जाणकार-विद्वानांनी केल्याचे आढळून येत नसल्याने ; अशा अन्य धर्मांच्या धर्मग्रंथांतील collations, interpolation, addendum, et corrigendum, apocryphal literature आदिंची पाठनिश्चिती (पाठसंहिताचिकित्सा--निर्धारणशास्त्रानुरुप) न झाल्याने (किंवा मी त्यासंदर्भात अनभिज्ञ असल्याने); मी त्या-त्या अन्य धर्मांच्या धर्मग्रंथांवर *'अधजल गगरी छलकत जाय'* अशा स्वरूपाची टिप्पणी करू शकत नाही. म्हणून मी त्या-त्या अन्य धर्मांच्या धर्मग्रंथांतील सर्व प्रक्षेप मान्य करतो असे(ही) नव्हे.
¤
>> मी भारतीय संविधानातील तरतूदींचे अनुपालन करताना, भारतीय संविधानाला सर्व भारतीयांनी, कोणताही जास्तीचा अपवाद न करता/मागता, सारख्याच प्रमाणात मान्य करावे व तदनुरुप आपले संपूर्ण *'वर्तन'* ठेवावे असे मला वाटते.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार, जि.गोंदिया
(19.04.2020)
Comments
Post a Comment