डाॅ.किशोर सानप आणि "इतिहास आढळत नाही"
-डॉ.किशोर सानप
दिविशा, 249/ए,
मानेवाडा बेसा रोड, शाहू नगर, नागपूर-440 034
Email- dr.kishorsanap@gmail.com
Web-www.kishorsanap.com
Phone-9326880523, 9518368976
नागपूर, दिनांक १२ मार्च २०१९

~~~~~~~~~~~
□इतिहास आढळत नाही : सृष्टी रहस्याचा अमूर्त ध्यास□
डॉ. किशोर सानप
---------------------------------------------------------------------
पायव्याला वाळवी लागता, ज्ञातमार्गही भुलले काही, निर्णयाच्या खगोलात मात्र, इतिहास आढळत नाही...कवितेला चिंतनाची आणि अज्ञाताच्या शोधाची डूब देणारे कवी म्हणून लखनसिंह कटरे यांचा उल्लेख करावा लागतो. साठीच्या पुढे कवी अधिक आत्मसन्मुख झाला असे म्हणण्यापेक्षा आत्मसन्मुख होणे हा कवीच्या काव्याचाच गुण आहे. इतिहास आढळत नाही, या सहाव्या कविता संग्रहातून किंवा दीर्घकवितेतूनही त्याचा प्रत्यय येतो. नागपूरच्या मध्यमा प्रकाशनाने कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या प्रतीकात्मक मुखपृष्ठासह देखण्यारूपात सन् 2018 मध्ये कवीची दीर्घकविता प्रकाशित केली आहे. यापूर्वीच त्यांचे प्रमेय (1996), जाणिवेतले कर्कदंश (2000), शाश्वत मौनाचे स्वगत (2002), आदिम प्रकाशचित्रे (2004), शब्दार्थांचे आधार निष्फळ (2005) याशिवाय कथा आणि ललित याही क्षेत्रात त्यांची प्रतिभा वावरताना दिसते.
खरेतर हा कवी मनस्वी माणूस, कवितेवर निरतिशय प्रेम करणारा, मैत्रभाव जपणारा, मनात कटुता न बाळगणारा तरी प्रतिभेच्या गूढांना स्पर्शून छंद ते मुक्तछंद असा चिंतनशील काव्यप्रवास करणारा आहे. झाडीबोली, पोवारी बोली अशा भाषिक अस्मितांच्याही चळवळीत कवी कार्यरत आहे. काष्ठशिल्प व अमूर्त चित्रशैलीने चित्रांना अर्थवत्ता देणे हे सर्व लक्षात घेतले तर गेल्या 25 वर्षांपासून हा कवी साहित्यक्षेत्रातील विविध प्रांतात आपल्या वेगळेपणाने व अमूर्त शैलीने विविध प्रयोग करीत आहे; तरीही मराठी साहित्यक्षेत्राने कवीची घ्यावी तशी दखल का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करता येतो. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीत चालले आहे तरी काय?
कवी लखनसिंह कटरे यांनी इतिहास आढळत नाही या दीर्घकवितेच्या सुरूवातीला पूर्वपक्ष मांडताना काही महत्त्वाची अवतरणे दिलेली आहेत. तर्क व बुद्धी तर्कदुष्ट झाल्याची अनुभूती म्हणजे स्वानुभव होय. काव्यातील स्वानुभवाची विखंडित अभिव्यक्ती कवितेच्या आकलन व रसास्वादातील अडसर ठरत असल्याने कवितेवर दुर्बोधतेचे व अनाकलनीयतेचे आरोप होत असावेत. जीवनानुभवाची सलगता म्हणूनच खंडकाव्य किंवा दीर्घकाव्यात कधीकधी अशक्य होत असावी. परिणामस्वरूप, आधुनिक काळात महाकाव्य किवा खंडकाव्य किंवा दीर्घकाव्य निर्माण होत नसावे. इतिहास आढळत नाही, याही संग्रहात कवीच्या ह्याच स्पष्टीकरणाची प्रचीती येते. परिणामस्वरूप कवीच्या आशयाभिव्यक्तीच्या नवख्या शैलीतही व्यत्यय का जाणवतात? त्याचे उत्तर खुद्द कवीनेच दिलेले आहे. कवी आपल्या काव्यदोषांचीही कबुली देतो व तिच्यापुढे आपल्या कवितेच्या गूढ चिंतनाचा ध्यास घेऊन; तो सृष्टीचे वास्तव, सत्य, रहस्य जाणून मानवी युगांच्याही बदलांची नोंद कवितेत घेताना दिसतो. कवीच्या जगण्याच्या, भवतालाच्या अमूर्त परिप्रेक्ष्यात स्वतःचाही शोध घेण्याची जिगिशा व जिज्ञासा सर्जनाच्या अज्ञात-अमूर्त रहस्यांचे आकलन व अवलंबन करण्याकडे नेते. कलाकृतीचे कार्य आत्मशोधाला प्रवृत्त करते. आल्बर्ट काम्यूच्या मते, “ Writing is an act of voilence against myself ’’ कलाकृतीची निर्मिती ही लेखकाने स्वतःशी केलेल्या अटीतटीच्या आत्मसंघर्षाचा परिणाम असतो. कवीही याच सर्जनशील आत्मसंघर्षाशी तद्रुप झालेला असतो.
कवी लखनसिंह कटरे यांचाही काव्यप्रवास याच सृजनसंघर्षाचा परिपाक होय. कवी सुरूवातीलाच म्हणतो, डोक्यात गर्दाळणारी विचारांची अनुभव शक्ती अज्ञानाला चिकटते. आकलनातील व्यामिश्र सृष्टी पाया हलवून सोडताना अश्राप गंतव्याची समष्टी हेलावून सोडते. अज्ञाताच्या विवरात कवीला इतिहास सापडत नाही. सृष्टीच्या इतिहासात अज्ञाताची युगे कितीतरी असतील परंतु मानवाला सृष्टीच्या इतिहासाचा शोध घेता येत नाही. मानवी इतिहास हा खोटा, क्षणभंगूर, आत्मप्रौढीचा, भेदाभेदाचाच असू शकतो. पायव्यांचा दगड हालेना, कुटिल फुटवे जागे होती...आकलनक्षमतेची गोची बुद्धिलाही भुलवत राही... निखळ आणि निर्मळ इतिहास केवळ समष्टीतील बदलांचाच असतो. पोळलेल्या मनात वसतो, स्वत्वाचा घायल स्वामिभक्त...माणुसकीच्या अपघाताला, दिली जाते मयताची साक्ष...ज्ञानवृक्षावरील काजवा, अंधारालाही भेदून जातो...खरेतर हा कवी तपस्वी आहे. स्व ते समष्टीच्या शोधाचा काव्ययात्री आहे. तोच त्याच्या कवितेचाही स्वभाव आहे. तर्कातीत अर्थाचे आकलन करण्याची अनोखी शैली कवीच्या काव्यप्रवासाचा केंद्रबिंदूही आहे. अनोळखी गुहेत तपस्वी, विचारशून्य भाव जपतो, संपृक्त जाणीव न्याहाळून, तर्कातीत अर्थाला झोंबतो...या आशयघन व आत्मघन काव्यप्रवासातून कवीला जीवनातील अनुभवांची व सृष्टीच्या पोकळीतील अवस्थांतरांची शब्दशिल्पे घडवायची आहेत. अशी कविताच आज खरेतर मुक्तछंदाच्या सोप्या युगात फारशी आढळत नाही. खालील तर्कातीत अभिव्यक्तीतूनही हीच जाणीव प्रस्फुटित होताना जाणवते.
कोलाज अस्फुट अंतरीचा, पायांना उगवू देत नाही
वाटेत सांडलेल्या क्षणांना, इतिहास आढळत नाही...
स्वप्नातले नक्षत्र बोलके, मौनातच हरवले काही,
उषःकाली सूर्याच्या देशात, इतिहास आढळत नाही...
इतिहास लपवतो पाने, अनित्य लहरींच्या पोटात,
भविष्याला आकळतो मग, झोपलेला पाषाण...
बोन्साय अनुभव, गाभार्यातील अंध पोकळी, विश्वासाचे राखीव वन, नामशेष झालेला माणूस, विश्वाच्या सीमेवर नसते अंधारलेली खोटी पहाट अशा वास्तवसन्मुख व गूढ प्रतिमा, शब्दप्रतिमांचा आविष्कार कवीच्या काव्याचे वैभव आहे. कवीने 150 चरणांची दीर्घकविता दशाक्षरी अक्षरछंदात लिहिली आहे. त्रिकालाचा मोठा अवकाश इतिहास आढळत नाही, या दीर्घकवितेतून काव्यरूपात कवीने मांडला आहे. आजकाल अशी आशयघन व जीवनाची लय पकडणारी कविता दुर्मिळच झालेली आहे. मुक्तकवितेच्या युगात कवी नवी रुढी निर्माण करताना दिसत नाहीत. पूर्वानुकरण आणि वास्तवाच्या ओझ्याखाली आजची कविता दबलेली दिसते. लखनसिंहसारखे कवी कवितेचा श्वास मोकळा करतात. कारण, शोकांतिका भव्यांचीच होते, खुजे तेथे सापडत नाही, इतिहासाच्या पानापानांत उधईचे हकदार काही... यशाची पायरी शोधताना कवितेला रसज्ञ का सापडत नाही? याचे उत्तर दीर्घ काव्यप्रवासातील भोवतालातल्या काव्यानुभवातूनच कवीला सापडते. कवी असलेल्यांपेक्षा कवी नसलेल्या सालोमालोंच्या काव्ययुगात प्रतिभावंताला किंमत नसते. वर्तमानात उधईचे हकदार खूप आहेत. हाच अनुभव कवीलाही अस्वस्थ करतो. गवसलेल्या ओळीतून इतिहास आढळत नसला तरी मात्र; अस्तित्वरीती कविता माझी, देते माझ्या अस्तित्वाची ग्वाही...कवीच्या कवितेत तुकोबांचा पांडुरंग रुतून बसतो. अनंताचा स्फोट होतो. खरेतर कवीला समाधान इतकेच असते की, शब्दबद्ध झालेली कविता, अथांग उरलेली असते, न कळलेले काही पासंग, हृदयी दडवून ठेवते...कवितेला असे अथांग मागे उरावे लागते. कवीचे तोंड इतिहासाकडे असूनही भविष्यातल्या इतिहासाच्या जडणघडणीकडे असायला हवे.
तात्पर्य, कवीला निसर्गाच्या कोपर्यात आणि मानवी अस्तित्वाच्या गर्भगृहात इतिहासाची हिरवी मने आढळत नाहीत. खरेतर कवी लखनसिंह कटरे यांनी इतिहास आढळत नाही या दीर्घकवितेत अनुभूतीच्या अनंत पोकळीत विहार करताना स्व ते समष्टीच्या शोधातून सृष्टीच्या पोटात दडलेल्या धडधडीलाच अनुभवांकित करताना स्वशोधाचा आत्मस्वर मुखर केला आहे. कवीची कविता अमूर्त, गूढ, दुर्बोध असल्याची टीका होत असली तरी सृष्टीची जगद्व्याळ रहस्ये कवितेतून उद्घाटित करताना कवी आणि कवीच्या कवितेचीही दमछाक होताना दिसते. कवीने आपली काव्यशैली आणि जीवनाचे आकलन मांडताना सम्यक वास्तवाच्या पलीकडे आत्मशोधाचे जे बेट असते, त्या बेटावर पोहचण्याचाच खरेतर कवीचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात कवीला यश मिळो की अपयश; सर्जनाची तृषा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत दीर्घकवितेसारखी सर्जनशील व सौंदर्यशीलपणे कविमनाच्या सृजनगृहात सुरूच राहील. कविता हाच कवीच्या जगण्याचाही श्वास आहे. प्राणवायू आहे. असे मानणार्या मोजक्या कविंपैकीच लखनसिंह कटरे अभिजात कवितेचा ध्यास घेणारे प्रतिभावंत कवी आहेत...
(-इतिहास आढळत नाही/ लखनसिंह कटरे,)
(मध्यमा प्रकाशन, नागपूर, 2018)
----------
□डाॅ.किशोर सानप,
नागपूर.

×××××××××××××××××××××××××××××××××××××
Comments
Post a Comment