Posts

विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन

*विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        वाद (इझम) व/वा विचारसरणी या विचारपद्धतीच्या विविध विधा/तऱ्हा आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या विचार करण्याच्या विचारपद्धतींचे मी तीन मुख्य प्रकार मानतो. ते तीन प्रकार म्हणजे --  (1)विचारवाद (इझम),  (2)विचारसरणी आणि  (3)विचारधारा.         (1) *विचारवाद* :- यापैकी विचारवाद(इझम) हा कोणत्यातरी विचारकाच्या विचारांचा संग्रह व/वा संगम असतो. यात मुख्य प्रवर्तकाचे विचारच प्रामुख्याने आचरले व अभ्यासले(?) जातात. मुख्य प्रवर्तकाने मांडलेल्या विचारांचा प्रतिवाद करण्याची प्रथा या प्रकारात कटाक्षाने टाळली जाते. मुख्य प्रवर्तकाने त्याच्या जीवनकालात/जीवनप्रवासात मांडलेले विचार हेच अंतिम विचार असा एक समज/कल/आग्रह असणे, हे या प्रकाराचे एक वैशिष्ट्यच म्हणता येईल. परंतू निसर्गचक्र हे सतत प्रवाही व बदलानुकूल असल्याने कोणताच कालसापेक्ष विचार/विचारवाद/विचारपद्धती शाश्वत/कायम/सार्वकालिक असूच शकत नाही. त्यामुळेच अर्थातच अशा विचारवाद/विचारपद्धतीचे कालसुसंगत असणे क...

शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality

◇*शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality*◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 'दासबोध' मध्ये रामदासांनी वर्णिलेल्या एका मुर्खपणाच्या लक्षणाचे अनुसरण करून सांगू इच्छितो की, शासकीय सेवेत ''कार्यक्षमता, कामाचे सर्वोत्कृष्ट, सकारात्मक, टिकाऊ परिणाम'' यांची कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसली तरी अशा अधिकारी/कर्मचा-यांना गधा बनवून त्याच्यावर जास्तीत जास्त भार मात्र हमखास टाकला जातो, अशांपैकीच मी एक होतो. मी TARCS असताना माझ्याकडे एका बिमार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकल प्रशासकीय प्रभार सोपविण्यात आला होता. आठ-नऊ महिन्याच्या कालावधीतच मी ती बाजार समिती कायम आर्थिक व प्रशासनिक स्थिरतेमध्ये आणू शकलो व माझा अल्पकालिक प्रशासकीय कालावधी संपतांना त्या बाजार समितीच्या खळखळाटी बँक खात्यात लाखो रुपये जमा झालेले होते.  >> शिवाय मी ज्यावेळी तालुकाप्रमुख अधिकारी होतो तेव्हा माझ्याकडे चार तालुक्यांचा अतिरिक्त प्रभार असतानाही मला अविभाजित भंडारा जिमस बँक,भंडारा या समस्याग्रस्त जिल्हा बँकेचा एकल प्रशासक व त्याच अविभाजित भंडारा जिल्ह्याचा DDR असे आणखी दोन महत्वाचे प्रभार सोपवि...

करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे

*करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे  (निवृत्त डीडीआर/जिल्हा सहकार निबंधक) B.Sc.(PCM), M.A., LL.B., B.Ed., H.D.C.M., G.D.C.&A., D.B.M., D.I.T. ----------------------------------------------- *प्रकाशित साहित्य*  ------------------------------ 1)प्रमेय (कवितासंग्रह/1996) 2)जाणिवेतले कर्कदंश (कवितासंग्रह/2000) (या संग्रहातील एक कविता 'जागर' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.काॅम.च्या प्रथम वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट) 3)एकोणिसावा अध्याय (कथासंग्रह/2001) 4)शाश्वत मौनाचे स्वगत (अभंगसंग्रह/2002) 5)आदिम प्रकाशचित्रे (चित्र-काव्यसंग्रह/2004) (सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व पत्रकार श्री.सुरेश द्वादशीवार यांची विवेचक प्रस्तावना, 'लोकमत'च्या तत्कालीन साहित्य पुरवणीतून विशेष दखल, 'भाषा आणि जीवन' मधून समीक्षण प्रकाशित तथा या संग्रहाला जानेवारी 2006 मध्ये बुलडाणा येथील प्रतिष्ठेचा 'तुका म्हणे' पुरस्कार प्राप्त) 6)शब्दार्थांचे आधार निष्फळ (कवितासंग्रह/2005) (झाडीबोल...

माझी कविता : एक अप्रासंगिक टिपणी

*माझी कविता : एक अप्रासंगिक टिपणी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> तसे पाहिले असता माझ्या आईच्या प्रेरणेने माझ्या वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासूनच मी सटरफटर कविता/कथा करू/लिहू लागलो होतो. माझ्या या वृत्तीला 1969-70 पासून अजून काही धुमारे फुटू लागून मी आणखी काही सटरफटर कविता/कथा (हिंदी आणि मराठीत) करू लागलो होतो. माझ्या वर्ग दहा (1970-71) च्या शिक्षिका सौ.मंदाकिनी प्रभाकरराव सगदेव यांनी मला खऱ्या अर्थाने काव्यलेखनाला प्रवृत्त व दिक्षित करताना काव्यालंकार, वृत्त-छंदादि काव्य-व्याकरणाचे सफल व यशस्वी धडे दिले. मी आपल्या अल्पमतीप्रमाणे यथाशक्य तसा या काव्य-व्याकरणाला शरण जाऊन माझी सटरफटर कविता लिहित असे. >> परंतु मी बी.एससी.(पीसीएम) च्या अभ्यासक्रमात आधुनिक भौतिकशास्त्राचा अभ्यास करू लागलो तेव्हा प्रा.आगलावे सरांच्या प्रभावी व सुहृद्, सुस्पष्ट शिकवण्यामुळे खूप प्रभावित होऊन भौतिकशास्त्रावरील विविध पुस्तके वाचू/अभ्यासू लागलो. बी.एससी. च्या अंतिम वर्षात आइनस्टाइन यांचा सापेक्षवादाचा सिद्धांत, वर्नर हायसेनबर्ग यांचा अनिश्चततेचा सिद्धांत आणि रिचर्ड फाइनमन यांची वेगवेगळे विश्वेतिहास अस...

कुत्सित(विकृत) बौद्धिकता(प्रतिभा) और... (प्रकाशित)

*कुत्सित(विकृत) बौद्धिकता(प्रतिभा) और...* (प्रकाशित) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (दिवान मेरा : हिंदी द्वैमासिक : फर-मार्च 2024) ------------------------------------------------------------- @ॲड.लखनपाल सिंह कटरे "अपराधी" ------------------------------------------ >> मानव की आकलन क्षमता का पूरा पूरा ज्ञान अभी भी विज्ञान खोज ही रहा है। मानव मस्तिष्क अभी भी वैज्ञानिकों के लिए एक अनबुझ पहेली ही साबित हो रहा है। इस मानवी आकलन क्षमता और मानवी बौद्धिकता/प्रतिभा के विभिन्न पहलुओं पर संबंधित वैज्ञानिकों द्वारा प्रकट/प्रस्तुत भिन्न भिन्न अनुभव तथा आकलन हम आये दिन पढ़ते रहते है। अभीतक मानवी बौद्धिकता/प्रतिभा के जो विभिन्न आयाम वैज्ञानिकों ने खोज लिए है, उनका एक सर्वसाधारण ब्योरा अमेरिकन मनोवैज्ञानिक हावर्ड गार्डनर द्वारा प्रस्तुत किया गया है। जिसके अनुसार मानवी बौद्धिकता/प्रतिभा के आठ प्रकार माने गए है। वे है --- 1) दृश्य स्थानिक या आकाशीय बौद्धिकता/प्रतिभा (Visuals - Spatial)-  जो लोग Visuals - Spatial में मजबूत होते हैं, वे चीजों को देखने में बाकि लोगों से अच्छे होते है। यह व्यक्ति...

वाचता वाचता : इब्ने शफी की जासूसी दुनिया

*वाचता वाचता...*😁😁😁 ----------------------------------------------- 👇 *इब्ने शफी की जासूसी दुनिया* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी जर विसरत नसेन तर माझ्या तत्कालीन हायर मॅट्रीक (अकरावी मॅट्रीक) व महाविद्यालयीन जीवनात म्हणजे 1970 ते 1980 या कालावधीत हिंदी भाषेत जासूसी कथा/कादंबऱ्यांचे एक पाक्षिक किंवा मासिक प्रकाशित व्हायचे. त्याचे नाव होते 'जासूसी दुनिया' आणि लेखक होते इब्ने शफी. त्या अंकातून दर पंधरवड्यात/महिन्यात नवनवीन(!) जासूसी कथा/कादंबरी प्रकाशित केल्या जायच्या. मी सुमारे पन्नासेक तरी अशा जासूसी कथा/कादंबऱ्या वाचल्या असाव्यात. >> शिवाय विविध पाॅकेट बुक्स अंतर्गत गुलशन नंदा, रामानंद सागर, राजवंश, रानू, गुरुदत्त, शिवानी, ... आदिंच्या हिंदी कादंबऱ्या/उपन्यास सुद्धा दर महिन्या-दोन महिन्यात प्रकाशित व्हायच्या. अशा सुमारे पाचेकशे हिंदी कादंबऱ्या/उपन्यास मी वाचल्या असाव्यात. त्यामुळे माझे हिंदी भाषेवर चांगलेच प्रभुत्व(?) झाले होते. मिडलस्कूल मध्ये वर्धा आणि पुणे येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या परिचय, प्रबोध, प्रवीण, वगैरे परीक्षा उ...

पोवारी बोली अना साहित्य निर्मिती : एक संक्षिप्त आकलन

*पोवारी बोली अना साहित्य निर्मिती : एक संक्षिप्त आकलन*  --- @ॲड.लखनसिंह कटरे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> तसो तं मी साल 2002 मा आमरो गाव मा नववो झाडीबोली साहित्य संमेलन लेयेव् होतो, तबपासनाच मी झाडीबोली को संगसंगच् पोवारी बोली को पुनरूत्थान साती भी गंभीरतापूर्वक-पर-हलकोफुलको काम कर रही सेव्. भारत सरकार को ANTHROPOLOGICAL Deptt. द्वारा 1990 को आसपास ANTHROPOLOGICAL SURVEY OF INDIA करनो मा आयेव् होतो. वोको महाराष्ट्र राज्य को पुरो अहवाल PEOPLE OF INDIA : MAHARASHTRA PART 1, 2, 3 असो नावलका POPULAR PRAKASHAN PVT. LTD. MUMBAI द्वारा सन 2004 मा इंग्लिश मा प्रकाशित भयी से. वू पूरो अहवाल (तीनही पार्ट) मी 29.08.2005 ला खरेदी करी सेव् अना बाची सेव्. तीनही पार्ट मा, महाराष्ट्र मा, पोवार समाज अना पोवारी बोली को अस्तित्वच शून्यवत दर्शायेव् गयी से. वोकोसाती भी मी सितम्बर 2005 पासना संबंधितईन संगं पत्रव्यवहार कर रही सेव्. अना आपलो अल्पबुद्धि-आकलन को अनुसार, पोवारी बोली को पुनरूत्थान, संवर्धन, समर्थन, यथार्थ अंकन साती बोली मा कविता, कथा, लेख आदि लिखन/लिखावन को हलको फुलको काम भी कर रही सेव्. ...