Posts

एमपीएससी : एक अविस्मरणीय अनुभव

*एमपीएससी : एक अविस्मरणीय स्वानुभव* ----------------------------------------------------- >> ग्रॅज्युएशन नंतर प्रथम प्रयत्नाच्या, 1977-78 च्या, एमपीएससी च्या नागरी सेवेसाठीच्या परीक्षांत मी (लेखी - 61% व मुलाखत - 40%) उत्तीर्ण झालो असलो तरी बीडीओ ची पोस्ट मला पसंत न पडल्याने मी रुजू झालोच नाही. (बीडीओ या पदासंबंधाने माझ्या नापसंतीची कारणे मी येथे लिहू शकत नाही, क्षमस्व.)  >> 1978-79 च्या परीक्षांत सुद्धा मला लेखी परीक्षेत 62.5% मार्क्स पडले असले तरी तत्कालीन Rural Weightage संबंधीच्या मा.उच्चन्यायालयाच्या अंतरिम निर्णयाचा "सोयीचा" अर्थ लावून त्याचा गैरफायदा घेत एमपीएससीच्या तत्कालीन "चालकां"नी Rural Weightage चा लाभ वगळून एकत्रित Merit चा विचार न करता, Weightage चा लाभ-पात्र अशा सर्वांना सरसकट वगळून, उर्वरितांची Merit List करून, जाहिरातीत नमूद एकूण पदांच्या सुमारे 80-85% पदे निवडण्या/भरण्याची विहित कार्यवाही उरकली. मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर Weightage शिवाय सुद्धा Merit मध्ये असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा फार्स करून उर्वरित सुमारे 15-20% पदे भ...

शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता : माझ्यातल्या कवी मरत चाललाय (इरफान शेख)

*शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता* (माझ्यातला कवी मरत चाललाय : इरफान शेख) ------------------------------------------------------------- (@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~    >> युवा मराठी कवी इरफान शेख यांचा "माझ्यातला कवी मरत चाललाय..." ह्या कवितासंग्रहातील कविता वाचल्यावर मला जे जाणवले ते हे की, या कवितासंग्रहाच्या कवीतील कवी "मरत" चालला नसून "पेरत" चाललाय. या संग्रहातील बहुतेक कवितांमधून कवीने एकेक बीज पेरले आहे. >> त्या कविता वाचल्या/अनुभवल्यावर वाचकाच्या मनोविश्वात ते "बीज" प्रस्फुटित होते, अंकुरित होते, वाढू लागते, विस्तारते, पारंब्यांनी समृद्ध होत जाते आणि त्या बीजातून प्रकट/प्रगट झालेल्या महाकाय वृक्षाचे स्वरूप आणि त्याचा आशयादि पाहून/अनुभवून वाचक अचंबित होतो, स्तंभित होतो, विचारप्रवृत्त होतो. त्या महाकाय महावृक्षाच्या "आवरणा''त वाचक स्वतःचा शोध घेऊ लागतो/आत्मावलोकन करू लागतो. आणि तेथे "कवी-वाचक" हे द्वंद्व लोप पावून "कवी-वाचक" एकाकार होतात, दोघांची "वृत...

फक्त सैल झालाय दोर : पद्मरेखा धनकर

*फक्त सैल झालाय दोर* : डाॅ.पद्मरेखा धनकर  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार) (प्रकाशित : अक्षर वैदर्भी : मार्च -2021) ---------------------------------------------------------- >> डाॅ.पद्मरेखा धनकर यांचा कवितासंग्रह "सैल झालाय दोर" हा माझ्या आवडत्या कवितासंग्रहांपैकी एक महत्त्वाचा संग्रह. या संग्रहातील कविता वाचल्यावर मला साकल्याने जे आकलन झाले, ते मी माझ्या अल्पस्वल्प अनुभवानुसार खालीलप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.  >> संग्रहातील कवितांवर कवितानिहाय माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा संपूर्ण संग्रह वाचल्यानंतर मला जे आकलन झाले ते मी संक्षिप्त रूपात/प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करीत आहे.  >> या कविता संग्रहाचे शिर्षक जरी ''फक्त सैल झालाय दोर" असे असले तरी मला या कवितासंग्रहातून प्रवास केल्यावर असे जाणवले, की "ती" अजूनही "तो"च्या दोराला पूर्णपणे सोडू शकलेली नाही, किंवा सोडू इच्छित नाही, किंवा पूर्ण-मुक्त झालेली नाही, फक्त सैल झालाय दोर! या संग्रहात "तो"शी संबंधित व संदर्भित कवितांचे बाहुल्य आ...

कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव

*कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >>   दोनेक वर्षांपूर्वीची घटना असावी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भवभूती महाविद्यालय आमगांव येथे मला बोलावे लागले. बोललो सुद्धा काही बाही. प्राचार्य श्री भुस्कुटे यांनी कुसूमाग्रजांच्या कवितांचं सुंदर असं "प्रदर्शन" सुद्धा भिंती भिंतीवर "लावलं" होतं. एका कवितेसमोर मी थोडासा थबकलो. मला 2009 मधील एक अप्रिय प्रसंग आठवला. ती कविता म्हणजे "- ...पाठीवर हात ठेवा....."! (कणा) >>  झालं असं की, जानेवारी-2009 मधील माझ्या अपघातानंतर डावा हात पूर्णतः आणि डावाच पाय अंशतः दिव्यांग होऊन मी सहा महिने उपचार घेऊन नुकताच रूजू झालो होतो. या दरम्यान जुने जिल्हाधिकारी बदलून नवीन जिल्हाधिकारी सुद्धा रुजू झाले होते. त्यामुळे प्रोटोकॉलच्या दृष्टीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी काठीच्या साहाय्याने लंगडत लंगडत (डावा हात बॅन्डेज मध्येच लटकवलेला) त्यांना भेटायला गेलो. साहेबांना आल्याचा निरोप धाडला. 1/1.5 तासा(?)नंतर साहेबांनी चेम्बरमध्ये बोलावलं. गेलो. माझ्या प्रोटोकॉल पाळण्याच्या सवयीप्...

शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality

◇*शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality*◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~              'दासबोध' मध्ये रामदासांनी वर्णिलेल्या एका मुर्खपणाच्या लक्षणाचे अनुसरण करून सांगू इच्छितो की, शासकीय सेवेत ''कार्यक्षमता, कामाचे सर्वोत्कृष्ट, सकारात्मक, टिकाऊ परिणाम'' यांची कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसली तरी अशा अधिकारी/कर्मचा-यांना गधा बनवून त्याच्यावर जास्तीत जास्त भार मात्र हमखास टाकला जातो, अशांपैकीच मी एक होतो. मी TARCS असताना माझ्याकडे एका बिमार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकल प्रशासकीय प्रभार सोपविण्यात आला होता. आठ-नऊ महिन्याच्या कालावधीतच मी ती बाजार समिती कायम आर्थिक व प्रशासनिक स्थिरतेमध्ये आणू शकलो. शिवाय माझ्याकडे चार तालुक्यांचा अतिरिक्त प्रभार असतानाही मला अविभाजित भंडारा जिमस बँक,भंडारा या समस्याग्रस्त जिल्हा बँकेचा एकल प्रशासक व त्याच अविभाजित भंडारा जिल्ह्याचा DDR असे आणखी दोन महत्वाचे प्रभार सोपविण्यात आले होते व मी ते कायमस्वरूपी अशा यशस्वीपणे "पार"ही पाडले. तसेच मी चंद्रपूर जिल्ह्यात DDR म्हणून काम करताना तिथे 80% कर्मचारी/अधिकारी पदे रिक्त असता...

पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य आणि पोवारी संस्कृती : एक आकलन

*पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य अना पोवारी संस्कृती : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया  ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आम्ही पोवार आजन् अना पोवार समाज की उत्पत्ती अग्निकुण्ड मालका भयेव् को कारनलका आम्ही अग्निवंशी क्षत्रिय कहलाव् सेजन्. पर धीरू धीरू, भिन्न भिन्न कारनलका सारो पोवार समाज अखंड भारतभर फैलेव् को कारनलका आमरो समाज को संस्कृती मा एकसाथ साम्य, समन्वय अना एकसारखोपणाको साथसाथमाच् विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता भी दिस् से. अना मुनस्यारीच् आमला "आपली संस्कृती टिकावनको संगसंगच् विभिन्न इलाका मा बस्या आमरो पोवार समाज को संस्कृती को भी आदर करे पाह्यजे." एकमेकको मत अना बिचार ला सहानुभूती अना समंजसपणालका समज् लेये पाह्यजे. भिन्न भिन्न इलाका का बस्या आमरो पोवार समाज को जीवनपद्धतीमा आयेव् काही-बाही, थोडोबहुत फरक आम्ही समज् लेये पाह्यजे. असी समन्वयवादी, समजदारीकी अना आदरयुक्त बिचारधाराच् आमरो समाज, आमरी बोली अना आमरो संस्कृती ला संपूरक अना तारक ठह्यरे असो मोला विश्वास से.  >> 1910 को दशक मा, शायद सब समाज मा पह्यलोच् बेरा, आमरो पोवार सम...

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारी बोली

*झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारीबोली* *(कला, साहित्य, संस्कृती व परंपरा)* : *एक आकलन* ------------------------------------------------------------------- @ॲड.लखनसिंह कटरे  ----------------------------------------------- (1) झाडीपट्टी/झाडीमंडळ : ही एक ऐतिहासिक, भौगोलिक तथा सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे संपूर्ण चार जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, भिवापूर, कुही, उमरेड हे तालुके असा हा झाडीपट्टीचा विस्तार आहे. या भागात सर्रास बोलली जाणारी ग्रामीण बोली ही झाडीबोली म्हणून संबोधिली/ओळखली जाते. झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी या भागातील दुसरी प्रमुख बोली म्हणजे पोवारीबोली होय. या भागातील वनाचे प्रमाण एकूण भूभागाच्या सरासरीने 60 ते 80% असून येथील वनात मौल्यवान सागवानापासून जवळपास सर्वच प्रजातीचे वृक्ष आहेत. येथील वृक्षराजी अत्यंत समृद्ध आहे.  सुप्रसिद्ध संस्कृत कवी/नाटककार भवभूति हे आमच्या झाडीपट्टीतील आमगांवजवळील पदमपूर येथील असल्याचे पुरातत्त्ववेत्ते महामहोपाध्याय डाॅ.वा.वि.मिराशी यांनी सप्रमाण मांडले आहे. पदमपू...