फक्त सैल झालाय दोर : पद्मरेखा धनकर
*फक्त सैल झालाय दोर* : डाॅ.पद्मरेखा धनकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार)
(प्रकाशित : अक्षर वैदर्भी : मार्च -2021)
----------------------------------------------------------
>> डाॅ.पद्मरेखा धनकर यांचा कवितासंग्रह "सैल झालाय दोर" हा माझ्या आवडत्या कवितासंग्रहांपैकी एक महत्त्वाचा संग्रह. या संग्रहातील कविता वाचल्यावर मला साकल्याने जे आकलन झाले, ते मी माझ्या अल्पस्वल्प अनुभवानुसार खालीलप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
>> संग्रहातील कवितांवर कवितानिहाय माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा संपूर्ण संग्रह वाचल्यानंतर मला जे आकलन झाले ते मी संक्षिप्त रूपात/प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करीत आहे.
>> या कविता संग्रहाचे शिर्षक जरी ''फक्त सैल झालाय दोर" असे असले तरी मला या कवितासंग्रहातून प्रवास केल्यावर असे जाणवले, की "ती" अजूनही "तो"च्या दोराला पूर्णपणे सोडू शकलेली नाही, किंवा सोडू इच्छित नाही, किंवा पूर्ण-मुक्त झालेली नाही, फक्त सैल झालाय दोर! या संग्रहात "तो"शी संबंधित व संदर्भित कवितांचे बाहुल्य आहे. आणि ''तुला पांघरून घेताना देहभर" या अतिशय भावगर्भित अशा सुंदर कवितेत एका आदिम 'स्त्री-पुरुष' युग्माचे जणू स्तोत्रच गायिले आहे असेही मला वाटते.
या कवितेत डाॅ.धनकर स्त्री-पुरुषाची एक आदिम युग्म-प्रतिमा गुंफताना/रेखताना अतिशय तरल शब्दात हळूवारपणे मांडतात की,
"तहानल्या युगाच्या अंधारतळी.....
.... श्वासांची झुळझुळ....
....
अत्तराची सोनवर्खी कूपी
तरल पारदर्शी सुगंधी."
ही कविता आणि या कवितेतील प्रत्येक ओळ वाचकाला 'शरीरसंपृक्त प्रेम-समाधी' चे जणू दर्शनच घडवते आणि वाचक या कवितेतील त्या आदिम व/तरी नित्यनूतन प्रेम-प्रवाहाला सहजच शरण जातो, त्यात डुंबू लागतो.
कदाचित त्यामुळेच/म्हणूनच तर "फक्त सैल झालाय दोर" मधील "फक्त" हा शब्द या संग्रहाच्या शिर्षकात उगवला(!) नसावा ना? अशी मला सुमधूर शंका येते.
>> *"साहित्य चपराक" मासिकाचे संपादक व "दरवळ" या वाचकप्रिय पुस्तकाचे लेखक माझे सन्मित्र घनश्याम पाटील त्यांच्या 'अगम्य, अतर्क्य' या एका लेखात नमूद करतात की, ''स्त्री-पुरुष समानतेचा जयघोष करताना आपल्या मनात अहंकारही नको आणि न्यूनगंडही नको! ..... स्त्री-पुरुष समानतेचा जागर करताना आपण आधी एकमेकांविषयी आपल्या मनात व्यापक, उत्तुंग प्रेमभावना ठेवू. एकमेकांकडे माणूस म्हणून बघितलं तरी अनेक समस्या सुटतील. एक तरल, निकोप नातंच समाज सुदृढ ठेऊ शकतं. त्यासाठी आपला विवेक वाढत जावून मनातील गैरसमजाचं, उच्च-नीचतेचं, खोट्या प्रतिष्ठेचं, दिखाव्याचं मळभ दूर (होणे आवश्यक आहे.)"* या विचारांच्या अनुषंगाने पाहिले असता डाॅ.धनकर यांच्या एका कवितेतील खालील ओळी अगदी चपखल बसाव्यात अशाच आहेत. त्या ओळी अशा....
"लौकिकाच्या पलीकडे
ही साधता येईल
देहातीत एकरूपता
तू अन् मी
फक्त माणूस म्हणून!"
यासोबतच डाॅ.धनकर अन्यत्र असेही मांडतात की,
"माझ्या देहाच्या शांत वस्तीत
..... पायवा खणत गेलास
....
देह सागर होऊन
बेफाम अनिवार उसळतो आहे...."
एकंदरीत "तो" साठीच्या/विषयीच्या/संदर्भाच्या कवितांचे बाहुल्य असलेल्या संग्रहाचा एकूणच (सम)"तोल" सांभाळण्यात, वरील व इतर तत्सम ओळी/कविता, साह्यभूतच ठरतात, असे माझे आकलन आहे.
>> डाॅ.पद्मरेखा धनकर या चंद्रपूरच्या म्हणजेच झाडीपट्टीतील रहिवासी असून त्यांच्या कवितांतून सुद्धा, कदाचित नकळत, झाडीपट्टीचे सौंदर्य, येथील परिस्थिती व हिरवेपणा सुद्धा डोकावतोच.
"गावाचं शहर होताना....".
"गुळगुळीत स्पीडब्रेकरी रस्ते....".
"भिंतीलगत कारखान्याच्या / काळी गोचिडी...",
"पेरलं पाहिजे देशीवाण
आणि ठेवली पाहिजे तयारी
....
घामाच्या धारांवर
बारमाही पीक घेण्याची...",
"गावात विजेची आयात / तरी दिव्याखाली अंधार...",
"बोनसाय" व "पावसाने दगा दिल्यावर" ह्या कविता,
"या वर्षीचा पावसाळा ..... जरा जास्तच लांबलाय...."
अशा ओळी आणि अशा कविता ह्या इतर संदर्भासोबतच झाडीपट्टीच्या संगतीचेही सुपरिणाम दर्शवितात, हे नाकारता येणार नाही.
>> तसा तर हा संग्रह स्त्री-जाणिवांचा जागर करणा-या कवितांचा संग्रह समजला जातो. त्या दृष्टीने बघू जाता या संग्रहातील काही ओळी/कविता आश्वासक तथा महत्त्वाच्याही ठरतात. त्यापैकी काही ओळी अशा...
"...आहे खात्री मला
चालले कितीही रणगाडे सीमेवर
फुलपाखरं कधी मरत नसतात...",
"...घुंगरू नाही चाळ नाही
पायात वीज बांधली आहे...",
"...माझ्या मुखाला चंद्र म्हणून
तू बंद केलेस माझे
सूर्य होण्याचे रस्ते
मधुचंद्राच्याच रात्री...."
"...धुक्यापलीकडच्या
चिरंतन विश्वावर
दृष्टी स्थिर....
....
वादळ अंगावरून गेल्याने
चिंब भिजता येत नाही......"
या संग्रहातील अशा ओळी आणि अशा कविता स्त्री-जाणिवांना जागृत करणा-या आहेत.
>> संग्रहातील शेवटच्या, "पुस्तकांचा प्रवेश होताच" या, कवितेतील खालील ओळी, डाॅ.धनकर यांच्या अक्षरनिष्ठेच्या प्रतीक म्हणता येतील, त्या ओळी अशा...
"अक्षरांचा गंध संजीवक भारून गेला...
....
सारेच वास्तुदोष झालेत दूर....."
>> सारांशरूपाने माझ्या आकलनानुसार सदरील कविता संग्रह हर प्रकारच्या वाचकाला काही ना काही आवडीचे देऊन त्या वाचकाला समृद्ध करण्यात सक्षम आहे, असे मला वाटते. "अपवादानेच नियम सिद्ध होतो" या न्यायाने या संग्रहातील काही अल्पशा कच्च्या रचनांचा अपवाद वगळता वाचकांनी या संग्रहाचा आस्वाद घेऊन आपली वाचन-भूक अवश्य भागवावी असेही मला वाटते. (मी काव्याभ्यासक व/वा समीक्षक/परीक्षक नसून एक व्होरासियस(?) वाचक मात्र असून त्याच नात्याने या संग्रहावरील माझे अल्पबुद्धीचे आकलन मी मांडले आहे. शिवाय पद्मरेखा या माझ्या एक मानसकन्याच असल्याने मी या संग्रहातील कवितांच्या आकलनात कधी मृदू तर कधी अनावश्यक कठोर झालो असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सबब चूक-भूल देणे-घेणे आणि क्षमस्व सुद्धा!)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(19.06.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments
Post a Comment