पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य आणि पोवारी संस्कृती : एक आकलन

*पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य अना पोवारी संस्कृती : एक आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> आम्ही पोवार आजन् अना पोवार समाज की उत्पत्ती अग्निकुण्ड मालका भयेव् को कारनलका आम्ही अग्निवंशी क्षत्रिय कहलाव् सेजन्. पर धीरू धीरू, भिन्न भिन्न कारनलका सारो पोवार समाज अखंड भारतभर फैलेव् को कारनलका आमरो समाज को संस्कृती मा एकसाथ साम्य, समन्वय अना एकसारखोपणाको साथसाथमाच् विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता भी दिस् से. अना मुनस्यारीच् आमला "आपली संस्कृती टिकावनको संगसंगच् विभिन्न इलाका मा बस्या आमरो पोवार समाज को संस्कृती को भी आदर करे पाह्यजे." एकमेकको मत अना बिचार ला सहानुभूती अना समंजसपणालका समज् लेये पाह्यजे. भिन्न भिन्न इलाका का बस्या आमरो पोवार समाज को जीवनपद्धतीमा आयेव् काही-बाही, थोडोबहुत फरक आम्ही समज् लेये पाह्यजे. असी समन्वयवादी, समजदारीकी अना आदरयुक्त बिचारधाराच् आमरो समाज, आमरी बोली अना आमरो संस्कृती ला संपूरक अना तारक ठह्यरे असो मोला विश्वास से. 

>> 1910 को दशक मा, शायद सब समाज मा पह्यलोच् बेरा, आमरो पोवार समाज की संघटना स्थापित भयी अना वोकी देखासिकी मुनस्यारीच् अन्य समाजको लोकईन् न् भी आपापलो समाज की संघटना, वोको बादमा, स्थापित करीन, असो भारतीय समाज-संघटन को इतिहास सांगेव् जासे. पर आमरो समाज संघटना मा पोवारी बोली अना पोवारी संस्कृती को संस्थापन, उत्थापन, पुनर्कथन, नव-प्रवर्तन/नव-सर्जन सारखो विषय मा पुरो-पुरो ध्यान देयेव् गयेव् असो दिस् नही. येको मतलब आमरो वोन् प्रथम-प्रवर्तक समाज-धुरीणईन् को महत्त्व अना श्रेय कमी से, असो कतई नाहाय्, उलटो आम्ही उन् आमरो पूर्वजईनको आभारी सेजन् का उनन् आमला समाजोन्नतीसाठी काम करन् की दिशा देखाईन्. बोहुत बोहुत कृतज्ञ सेजन् आम्ही आमरो वोन् पूर्वजईनको! अजको आमरो काम उनन् रचीन् वोन् पायवापरच् स्थापित होय् रही से. 

>> आता आमरो लक्ष्य रहे पाह्यजे का आमरी मृतवत् होत् होती वा पोवारी बोली कसी अमर होय् सके. काहे का कोनतोच् समाज की बोली/भाषा याच् खरीखुरी वोन् समाज को संस्कृती की संरक्षक, प्रवाहक, निर्मिक रव्ह् से. याच् मुख्य बात ध्यान मा ठेयस्यारी आम्ही आमरो बोली/भाषा को पुनरुत्थान, पुनर्निर्माण अना पुनर्कथन साठी कटिबद्ध रहे अना होये पाह्यजे असो मोरो बिचार से. 

>> आमरो पोवार समाज आता आर्थिक दृष्टीलका समृद्ध होय् रही से. (पह्यले काही कमतरता रही रहे त् वा आता धीरूधीरू लुप्त होय् रही से.) पर यदि आर्थिक समृध्दीला सांस्कृतिक समृध्दी को अभिन्न झालर नही रहे त् आमरी (या कोनतोच् समाज की) दिशा पतन अना कंगालपनाकरच् रव्हन् की संभावना रव्ह् से. येन् सांस्कृतिक समृध्दीसाठी चांगलो साहित्य की नितांत आवश्यकता रव्ह् से. काहे का चांगलो साहित्य पाठक/वाचकला अंतर्मुख कर् से, अना संग् संगच् वाचककी जिज्ञासा अना संवाद की भूक भी पुरी कर् से. मानवी जीवनका अल्पपरिचित पैलू वाचक को नजर मा आण् देसे, जेकोलका वाचक की जाणीव-कक्षा विशाल अना सखोल होय् सक् से. वाचकला अस्वस्थ कर् से, उल्हसित कर् से. असो परस्परविरोधी परिणाममालका साहित्य वाचक को भावविश्वला व्यामिश्रता अना अनुभवविश्वला अर्थपूर्णता देसे, समाज मा सकारात्मक परिवर्तन की अपेक्षा निर्माण कर् से. 

>> आता एक प्रश्न उभो रव्ह् से का, संस्कृती मंज्या काजक् आय? त् येन् संकल्पना को बारामा मी मोरा बहि:शाल मार्गदर्शक रह्या जगप्रसिद्ध असा दिवंगत भाषाशास्त्री डाॅ.अशोक केळकर इनकी एक टिपणी (मराठी मा) मी याहा देय् रही सेव्. वा टिपणी असी....

"काही भारतीयांना पाश्चिमात्य देशांमधली 'कल्चर' ही संकल्पना एतद्देशीय भाषांमध्ये आणावीशी वाटली. बांगलाभाषकांनी त्यासाठी 'कृष्टि' हा शब्द वापरून मूळची शेतीच्या मशागतीची लक्षणा कायम राखण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ ठाकूर यांना हा शब्द फारसा पसंत पडला नव्हता. त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातील संस्कृतचे प्राध्यापक आणि गाढे अभ्यासक डाॅ.प.ल.वैद्य यांच्याकडे विचारणा केली. वैद्यांनी त्यांना सांगितले की, मराठीमध्ये इतिहासकार आणि विचारवंत विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी घडवलेला "संस्कृती" हा शब्द लोकांना समाधानकारक वाटल्याने रुळला आहे. रवींद्रनाथांना हा शब्द आवडला, त्यांनी तो जसाच्या तसा वापरला आणि तो एक अखिल भारतीय पातळीवर सामायिक शब्द म्हणून रुळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

      'कल्चर' या शब्दाचे सरधोपट भाषांतर न करता राजवाड्यांच्या प्रतिभेने त्याच्या अर्थातील एक धागा उचलून त्यासाठी आपल्याकडील संस्कार ही परंपरेतील सर्वज्ञात संकल्पना उचलली. संस्कारांनी सिद्ध होते ती संस्कृती. मग ते संस्कार बरे असतील किंवा वाईट असतील, जाणिवेतील किंवा नेणिवेतील असतील आणि स्वकीय असतील किंवा परकीय असतील. संस्कार म्हणजे व्यक्तीला जो परिसराचा, विशेषतः मानवी परिसराचा अनुभव येतो, त्या अनुभवाचे व्यक्तीवर उमटलेले ठसे. असे हे संस्काराचे ठसे कधी संचित रूपात टिकतात, कधी लोप पावतात, तर कधी कालांतराने स्थितिस्थापित होतात असे भारतीय परंपरा मानते. संस्कृती म्हणजे अशा संस्कारांचे भांडार. राजवाड्यांच्या योजकतेमुळे संस्कृती हा शब्द, कल्चर या शब्दापेक्षा अधिक अर्थघन असा, आपल्या हाती आला.

      'कल्चर'साठी संस्कृती या शब्दाचा वापर हे सर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण आहे."

      त् असो येव् संस्कृती शब्दनिर्मितीको इतिहास आय् अना असी संस्कृती येन् संकल्पनाकी परिपूर्ण परीभाषा/व्याख्या आय्. 

>> असो येन् संस्कृतीको यथायोग्य रखरखाव साहित्य लका होत् जासे. पर आमरो समाज को ध्यान पोवारी बोली मा स्वतंत्र साहित्य निर्मिती परा आमरोच दुर्दैवलका नही गयेव् होतो. अजवरी पूरी पोवारी बोली/भाषा मा लिखी स्वतंत्र किताब् नोहोती. (जयपालसिंह पटले, ॲड.मनराज पटले इनकी पोवारी मा अनुवाद की किताब् अपवादच् होती.) पर गयेव् तीन-च्यार सालमा पोवारी साहित्य,कला, संस्कृती मंडल की ऑक्टोबर-2018 मा स्थापना भयी अना मंग धीरूधीरू पोवारी इतिहास/साहित्य/उत्कर्ष समूह सरीखा करीबन् 59-60 फेसबुक अना व्हाट्सॲप ग्रुप आपापलो स्तर परा पुरो जोरसोरलका कार्यान्वित भया. तसोच् पोवारी साहित्य, कला, संस्कृती मंडल द्वारा फरवरी-2019 मा पह्यलो अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन तिरोडा, जि.गोंदिया मा संपन्न भयेव्. येन् मंडल को परिणाम स्वरूप देवेन्द्र चौधरी की दुय स्वतंत्र पोवारी कविता की किताब् प्रकाशित भयी. डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे इनकी कविता अना कथा की किताब् भी प्रकाशित भयी. येन् मंडल द्वारा दुय वार्षिक पत्रिका भी प्रकाशित भयी, लखनसिंह कटरे इनकी 'पोवारी साहित्य मंजूषा' या किताब भी प्रकाशित भयी, 125 कविता स्पर्धा संपन्न भयी अना येव् काव्य-यज्ञ सभी ग्रुप मा अनवरत चलच् रही से. उत्कर्ष ग्रुप की भी औंदा एक बोहुतही सुंदर पत्रिका प्रकाशित भयी. येन् उत्कर्ष ग्रुप द्वारा डिजिटल माध्यम मा भी पोवारी बोली को बारामा मोठा मोठा कार्यक्रम भया. सौ.छाया सुरेन्द्र पारधी इनकी भी एक कविता की किताब् प्रकाशित भयी, जेन् किताब् ला मी पोवारी संस्कृती को संक्षिप्त कोश कसू. देवेंद्र चौधरी भाऊ न् त् एक इतिहासच् कायम करीस्. 2019 ला यवतमाळ मा अना 2020 मा उस्मानाबाद मा, असो लगातार दुय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मा देवेंद्र चौधरी न् पोवारी बोली की कविता सादर करस्यानी पोवारी बोली को मराठी साहित्य जगत मा झेंडाच् गाळ देईस्. 

>> अशी या आमरी प्राचीनतम पोवारी बोली धीरूधीरू ध्वनीनिष्ठ/अलिखित स्वरूप मा लका शब्दनिष्ठ/लिपीनिष्ठ/लिखित स्वरूप मा आय् रही से. या बात आमरो सांस्कृतिक इतिहास को संरक्षण, संवर्धन अना भविष्य को दृष्टिलका बोहूत बोहूत आशावादी माहौल तयार कर रही से, असो आता आमला अभिमान लका सांगता आय् सिक् से. 
>> जय पोवार !
>> जय पोवारी !
>> जय राजा भोज !
>> जय गढकालिका माता !
>> जय हो !
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(14.02.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)