Posts

एक स्मरणगाथा आणखी ......

□मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       तसे पाहिले असता माझ्या आईने माझ्यावर केलेले वाचन-संस्कार व हायस्कूल मधील शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांनी केलेले लेखन संस्कार यामुळे 1970-71 पासूनच मी ओबडधोबड लिहू लागतो होतो. 1971च्या शालेय स्नेहसंमेलनाच्या हस्तलिखित वार्षिकांकाचा मी विद्यार्थी-संपादक होतो. आणि त्या अंकासाठी मी लिहिलेला एक लेख "अपघातग्रस्त बस ची आत्मकथा" वाचून हा लेख मी स्वतः लिहिला नसून कुठून तरी चोरलाय अशी रोखठोक तंबी सुद्धा मला "प्राप्त" झाली होती. अखेर सगदेव मॅडम नी माझ्यावर विश्वास दाखवला व तो लेख अंकात समाविष्ट करण्यात आला. पण बांगला मुक्ती संग्रामाच्या धामधुमीत त्यावर्षीचे स्नेह संमेलन स्थगित करण्यात आल्याने त्या अंकाचे प्रकाशन त्यावर्षी होऊ शकले नव्हते. 1972 मध्ये मी धोटे बंधू सायंस काॅलेज गोंदिया चा बी.एस्सी. फर्स्ट ईयर चा विद्यार्थी असताना आदर्श विद्यालय आमगांव च्या त्यावर्षीच्या स्नेह संमेलनाचे मुख्य अतिथी गो.नी.दांडेकर यांच्या हस्ते त्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.       बी.एस...

एक स्मरणगाथा आणखी ...... मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.

□मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       तसे पाहिले असता माझ्या आईने माझ्यावर बालपणी केलेले वाचन-संस्कार व हायस्कूल मधील शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांनी केलेले लेखन संस्कार यामुळे 1970-71 पासूनच मी ओबडधोबड लिहू लागतो होतो. 1971च्या शालेय स्नेहसंमेलनाच्या हस्तलिखित वार्षिकांकाचा मी विद्यार्थी-संपादक होतो. आणि त्या अंकासाठी मी लिहिलेला एक लेख "अपघातग्रस्त बस ची आत्मकथा" वाचून हा लेख मी स्वतः लिहिला नसून कुठून तरी चोरलाय अशी रोखठोक तंबी सुद्धा मला "प्राप्त" झाली होती. अखेर सगदेव मॅडम नी माझ्यावर विश्वास दाखवला व तो लेख अंकात समाविष्ट करण्यात आला. पण बांगला मुक्ती संग्रामाच्या धामधुमीत त्यावर्षीचे स्नेह संमेलन स्थगित करण्यात आल्याने त्या अंकाचे प्रकाशन त्यावर्षी होऊ शकले नव्हते. 1972 मध्ये मी धोटे बंधू सायंस काॅलेज गोंदिया चा बी.एस्सी. फर्स्ट ईयर चा विद्यार्थी असताना आदर्श विद्यालय आमगांव च्या त्यावर्षीच्या स्नेह संमेलनाचे मुख्य अतिथी गो.नी.दांडेकर यांच्या हस्ते त्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.      ...

न्यायाधीश (?) : एक न-कथा.

◇◇◇न्यायाधीश(?)/एक न-कथा◇◇◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ □न्यायाधीश : माझ्या समोर बसलेल्या तुम्हा दोघा तरुणांना आणि तिन्ही तरुणींना या कथे(?)च्या लेखकाने सांगितलेच असावे की, मी या कथेतील अ-वास्तव न्यायाधीश आहे, वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नव्हे! मी या कथेच्या प्रयोजनापुरता या कथेच्या मर्यादेतच वावरणारा न्यायाधीश आहे. त्यामुळे लेखकाचे म्हणणे मला ऐकावेच लागेल. तरी लेखकाचे म्हणणे जर का अगदीच न पटणारे असेल तेव्हा मी माझे dissent विचारही प्रकट करणार आहे. हे मी लेखकाला आधीच सांगून ठेवले असून लेखकाने ते, सशर्त का असेना, मान्यही केले आहे. आमच्यातील त्या अलिखीत करारामुळे मला त्या शर्तींचा उल्लेख येथे करता येणार नाही. तर एकंदरीत मी वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नसून या कथालेखकाने 'विचार'लेला (चितारलेला नव्हे!) एक पात्र --- न्यायाधीश आहे, याचे तुम्ही सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने क्रमशः आपापली कैफियत माझ्यासमोर उभे राहून मांडायची आहे. एक बोलत असताना दुस-या कोणाहीने बोलायचे नाही. एखाद्याने आपली कैफियत सादर करताना दुस-यावर काही आरोप केले तर त्या दुस-याने त्याची कैफि...

सीता स्वयंवर (एक लघुकथा)

□सीता स्वयंवर     (एक लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~         त्याचे असे झाले की, त्या गावात उत्तर प्रदेशातील एक रामायण मंडली आली होती. रोज रात्री ग्रामपंचायत समोरील पटांगणात ते रामायणातील एकेक प्रसंग अभिनित करायचे. अजूनही गावात रामायणचे भारूड आहेच, रोज चांगली गर्दी जमायची. आरतीमध्ये चांगली रक्कम जमा व्हायची, त्यामुळे मंडली खुश होती.     त्या रामायण मंडलीत एकूण दहा व्यक्ती होते, सहा पुरुष आणि चार महिला. मंडली-प्रमुख पुरुषाचे नाव होते बिभूतीप्रसाद पाण्डेय. त्याचे वय साधारणतः 60-65 वर्षाचे असावे, पण होता चांगलाच धष्टपुष्ट. तो मुख्यतः दशरथाची, जनकाची व रावणाची भूमिका करायचा. त्याची तीन मुले, अनुक्रमे रामजी, लछमन आणि भरतबाबू. रामजी आणि लछमन हे दोघेही विवाहित होते. त्यांच्या पत्नींची नावे अनुक्रमे सीता आणि उर्मी. भरतबाबू अविवाहित होता. रामजी हा मुख्यतः रामाची, तर लछमन मुख्यतः लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, बिभिषण, इंद्रजित अशा भूमिका करायचे. भरत हा ऑलराऊंडर होता, ऋषींच्या भूमिकाही तोच करायचा. बिभूतीप्रसाद ची पत्नी कौशल्या, कैकेयी, मंदोदरी आदि प्रौढ महि...

गायीचा मृत्यू आणि त्यानंतर... (एक लघुकथा)

□गायीचा मृत्यू आणि त्यानंतर... (एक लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~       त्याचे नाव बलदेवप्रसाद सिंह. हे नाव कसे उत्तर भारतीय किंवा बिहारी वाटते ना? पण बलदेवप्रसाद सिंह मात्र उत्तरभारतीय किंवा बिहारी नसून गेल्या कित्येक पिढ्यांपासून त्याचे कुटुंब महाराष्ट्रीयन झाले आहे. तर हा बलदेवप्रसाद सिंह महाराष्ट्राच्या वन विभागात फाॅरेस्ट गाॅर्ड पदावर कार्यरत होता. 1977-78 च्या महाराष्ट्रातील शासकीय कर्मचा-यांच्या 54 दिवसीय लांबलचक संपाच्या कालावधीत माझी व त्याची भेट व ओळख झाली होती.     म्हणजे झाले असे की लांबलेल्या संपामुळे विधान सभेच्या निवडणूकीकरिता शासकीय कर्मचारी उपलब्ध न झाल्याने शासनाने संपकालीन कर्मचारी (Strike Period Personnel = SPP) या नावाने काही बेरोजगार व काॅलेज विद्यार्थी यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. या तात्पुरत्या कर्मचा-यांना निवडणूक कार्याचा कोणताच अनुभव नसल्याने तहसील कार्यालयात दररोज या तात्पुरत्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जात असे. मी सुद्धा एक काॅलेज विद्यार्थी म्हणून माझ्या सहमित्रांसोबत SPP होतो. त्या प्रशिक्षणादरम्यान माझी या बलदे...

गायीचा मृत्यू आणि त्यानंतर... (एक लघुकथा)

□गायीचा मृत्यू आणि त्यानंतर... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~       त्याचे नाव बलदेवप्रसाद सिंह. हे नाव कसे उत्तर भारतीय किंवा बिहारी वाटते ना? पण बलदेवप्रसाद सिंह मात्र उत्तरभारतीय किंवा बिहारी नसू...

तो आणि ती...(एक लघुकथा)

तो आणि ती. (एक लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~     ही कथा आहे तो आणि ती ची. तो योगेश आणि ती योगिता. योगेश चे शिक्षण बारावी पर्यंत तर योगिता बी.ए.गॅज्युएट. योगेश आपल्या आईवडिलांना एकुलता एक, ना भाऊ ना बहीण. शेती दहा एकर. गोंदिया जिल्ह्यातील कोरडवाहू, धानाची शेती. पाऊसपाणी व्यवस्थित पडला, धानावर रोगराई नाही आली, वेळेवर मजूर-वन्यार भेटले व त्यांनी बेईमानी न करता इमानदारीने शेतकाम केले तर त्यावर्षी शे-दीडशे क्विंटल धान व्हायचे. पण असा हंगाम तिन-चार वर्षातून एखादाच. बाकीच्या साली पन्नास क्विंटल धान झाले तरी खूपच म्हणायचे. तसा घरी खाऊन-पिऊन सुखी म्हणता येईल असा. तरी आई वडिलांनी त्याला शिक्षणासाठी खूप डिवचले, डी.एड.करून मास्तर तरी हो म्हणून खूप ढोसण्या लावल्या. पण योगेश काही बधला नाही. त्याला शेतीकामातच आनंद होता. आईवडिलासोबत तो शेती सांभाळणे शिकला होता. आजच्या उच्छृंखल तरुणाईत एक कोणतीच महत्वाकांक्षा नसलेला बायल्या जीवच म्हणा ना!        योगिता आपल्या आईवडिलांची पाचवी लेक. मुलाच्या आशेत पाच मुली झाल्या आणि शेवटी तिचे आईवडील थकून थांबले. घरी तीन एकर कोरडवाहू धान-शेती...