न्यायाधीश (?) : एक न-कथा.
◇◇◇न्यायाधीश(?)/एक न-कथा◇◇◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
□न्यायाधीश : माझ्या समोर बसलेल्या तुम्हा दोघा तरुणांना आणि तिन्ही तरुणींना या कथे(?)च्या लेखकाने सांगितलेच असावे की, मी या कथेतील अ-वास्तव न्यायाधीश आहे, वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नव्हे! मी या कथेच्या प्रयोजनापुरता या कथेच्या मर्यादेतच वावरणारा न्यायाधीश आहे. त्यामुळे लेखकाचे म्हणणे मला ऐकावेच लागेल. तरी लेखकाचे म्हणणे जर का अगदीच न पटणारे असेल तेव्हा मी माझे dissent विचारही प्रकट करणार आहे. हे मी लेखकाला आधीच सांगून ठेवले असून लेखकाने ते, सशर्त का असेना, मान्यही केले आहे. आमच्यातील त्या अलिखीत करारामुळे मला त्या शर्तींचा उल्लेख येथे करता येणार नाही. तर एकंदरीत मी वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नसून या कथालेखकाने 'विचार'लेला (चितारलेला नव्हे!) एक पात्र --- न्यायाधीश आहे, याचे तुम्ही सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने क्रमशः आपापली कैफियत माझ्यासमोर उभे राहून मांडायची आहे. एक बोलत असताना दुस-या कोणाहीने बोलायचे नाही. एखाद्याने आपली कैफियत सादर करताना दुस-यावर काही आरोप केले तर त्या दुस-याने त्याची कैफियत मांडताना त्याचे खंडन करावे किंवा आरोप मान्य असतील तर तसे अभिकथन करावे. मध्येच कोणाही दुस-याने बोलू नये. तुम्हा पाचही जणांच्या कैफियती मी ध्यानपूर्वक ऐकणार आहे, याची तुम्ही खात्री बाळगावी. परंतु मी वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नसल्याने तुम्हा सगळ्यांच्या कैफियती ऐकल्यानंतर त्यावर एखादा साधकबाधक निर्णय वा आदेश पारित करण्याला मी बांधील नाही. लेखकाच्या मनात काहीही असले तरी मी 'सुनावणी'अंती निर्णय वा आदेश पारित करीनच याची मी शाश्वती देऊ शकत नाही.
मला वाटते तुम्हाला आता सा-या संकल्पना नीट समजल्या असतीलच. तर आता आपल्या न्यायालयीन कामकाजाला सुरूवात करू या. सर्वप्रथम तो-1 याने समोर येऊन माझ्याकडे तोंड करून आपली कैफियत मांडावी. नंतर आपण समोर येणा-या परिस्थितीनुसार क्रम ठरवून त्या-त्या व्यक्तीला, तरुणाला वा तरुणीला, त्याची त्याची कैफियत मांडायची संधी देऊ. अर्थात हा निर्णय माझा असेल, तथापि हा निर्णय वा आदेश अंतिम नसेल. यामध्ये लेखकाची लुडबुड आपण चालवून घेऊ या. असो. तर आता तो-1, तू तुझी कैफियत मांडायला सुरुवात कर---- उरलेल्यांनी नीट ऐकायचे आहे. काही नोंदी घ्यायच्या असतील तर तुमच्या हातातील पॅडवर त्या-त्या नोंदी तुम्हाला घेता येतील. चला सुरू करू या. बोला तो-1.
□तो-1 : न्यायाधीश महोदय, आपण सांगितल्यानुसार हे वास्तवातले खरेखुरे न्यायालय नसून आपणही वास्तवातले खरेखुरे न्यायाधीश नाहीत. त्यामुळे रूढ न्यायालयीन संकेत पाळण्याचे माझ्यावर बंधन नाही, असे समजून मी माझी कैफियत सादर करीत आहे. मी आणि तो-2, आम्ही दोघे बालपणापासूनचे मित्र होतो. म्हणजे अगदी लंगोटिया यार म्हणतात ना, तसे! आम्ही बारावीत असताना काय घडले किंवा काय झाले, माहित नाही; किंवा असे म्हणू या की कारण निश्चित सांगता येत नाही, तो-2 हा माझा क्रमशः दूरस्थ -> प्रतिस्पर्धी -> शत्रू असा हळूहळू बदलू लागला व आज तो माझा कट्टर शत्रू म्हणून आमच्या गावभर ओळखला जातो. माझी आणि ती-3 ची दोस्ती त्याला कदाचित बिलकुल आवडली नसावी. त्याने ती-3 ला माझ्या बालपणीच्या व कुमारवयातील काही आलतू-फालतू व क्षुल्लक चूकांबद्दल तीखट-मीठ लावून सांगितले व तिच्या मनात माझ्याबद्दल दुरावा आणि द्वेष निर्माण केला. आता ती-3 माझ्याशी बोलणे तर दूरच माझ्याकडे ढूंकूनही पाहत नाही. तसं पाहिलं तर मी ती-3 च्या दोस्तीआडून तिच्यावर हळूहळू प्रेम करू लागलो होतो. आमच्या आजच्या पिढीत हे जरा नवलकारकच वाटेल, पण हे सत्य आहे. आईने केलेले संस्कार आडवे येत असावेत कदाचित. तर माझ्या अशा अवस्थेत तो-2 ने खोडा टाकल्याने मी खूपच डिस्टर्ब झालो. आणि तो-2 शी भांडून त्याला मारझोडही केली. शारीरिक दृष्ट्या तो-2 माझ्याहून कमजोर असल्याने त्याने माझ्याकडून चांगलाच मार खाल्ला. शेवटी ती-1 मध्ये पडली आणि तिने आमचे भांडण व मारामारी थांबवली. तो-2 तोवर चांगलाच अधमरा झाला होता. पण त्याच्या इगो प्राॅब्लेम मुळे त्याने हे त्याच्या घरी सांगितले नसावे. पण तेव्हापासून तो-2 माझ्या प्रत्येकच कामात अप्रत्यक्षपणे टांग अडवतो, काड्या करतो. अशा प्रसंगी ती-1 मला समजावते व सांभाळून घेते. ती-1 अजूनतरी माझी मैत्रीणच आहे. तिच्याविषयी मला प्रेम-बिम काही वाटत नसले तरी आपुलकी मात्र वाटते. आणि मैत्रीखातर मी तिचे म्हणणे, सांगणे ऐकतोही. आता आपणच सांगा न्यायाधीश महोदय, यात माझे काय चुकले? ... बस, थांबतो आता!
□न्यायाधीश : मी न्यायाधीश म्हणून आता असा आदेश देतो की, यापुढे ती-1 ने आपली कैफियत सादर करावी. थोडक्यात सर्व मुद्दे सांगावेत, पाल्हाळ लावू नये.
□ती-1 : न्यायाधीश महोदय, तो-1 ने त्याच्या कैफियत मध्ये सांगितलेले कथन माझ्या माहितीप्रमाणे सत्यच आहे. त्यावर मला काहीही अन्यथा बोलायचे किंवा सांगायचे नाही. पण एक गोष्ट मात्र तो-1 ने अर्धवट सांगितली किंवा जाणीवपूर्वक लपवली असे मला वाटते. तो माझ्यावर प्रेम-बिम करत नाही असे तो म्हणाला, पण मी मात्र त्याच्यावर प्रेम करते. आणि एखादी तरुणी एखाद्या तरुणावर प्रेम करीत असेल तर त्या तरुणाला ते कळत नाही, हे मानवी स्वभावाला धरून नाही. म्हणून मला तो-1 च्या फक्त एवढ्याच विधानावर प्रतिवाद नोंदवायचा आहे. यापेक्षा अधिक मला काही सांगावयाचे नसल्याने मी आता थांबते, न्यायाधीश महोदय!
□न्यायाधीश : मी ती-1 चे अभिनन्दन करतो. तिची कैफियत अतिसंक्षिप्त असली तरी तिच्या शब्दांच्या पाठीमागे खूप मोठे गहन पर्वत लपले आहेत याची जाणीव मला झाली आहे. तिला पुन्हा संधी द्यावी किंवा कसे, हे मी प्रसंगानुसार ठरवीन. पण आता मात्र आपण तो-2 ची कैफियत ऐकू या. मी तो-2 ला आदेश देतो की, त्याने त्याची कैफियत मांडावी. त्यालाही सुचना वजा आदेश आहेत की, पाल्हाळ लावू नये.
□तो-2 : न्यायाधीश साहेब, माझ्या पूर्वीच्या दोघांच्याही कैफियत कथनातील आंतरिक तफावत आपल्या लक्षात आली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. मला तर असेही वाटते की, कथालेखकाने आपल्याला न्यायाधीश म्हणून निवडून मोठी घोडचूक केली आहे. किंवा मग या कथालेखकाला "न्यायाधीश" या संकल्पनेची व्याख्याच माहित नसावी. तो-1 चे कथन पूर्णतः एकतर्फी आहे. तो-1 चे कथन सत्य नसून सत्याचा आभास होईल असे सहानुभूतीची भीक मागणारे भंकस कथन आहे. आम्ही बालपणापासून एकदुस-याला ओळखतो, हा काही निसर्ग नियम नव्हे! आम्ही एकाच गावात, एकाच मोहल्ल्यात, एकाच महिन्यात जन्माला आलो, यात कदाचित योगायोग असेल. पण त्यावरून आम्ही लंगोटिया यार आहोत किंवा होतो, असा निष्कर्ष कसा काढता येईल? बालपणापासूनच तो-1 हा हट्टी आणि हेकेखोर स्वभावाचा आहे. 'पहिले मी, नंतरच तू'; ही त्याच्या विचारांची मर्यादा व खासियत! बारावीत असताना अभ्यासादरम्यान आमचे बिनसले. त्याचे कारण विचित्र वाटले तरी अनैसर्गिक किंवा अनैतिक नाही. तो-1 माझ्याकडून हस्तमैथून करवून घ्यायचा, पण माझी पाळी आली की कां-कू करायचा. आमचे बिनसण्याचे मुख्य कारण हे असे आहे. या वयात जवळपास सगळेच हस्तमैथून करतात. ही इतिहास-वर्तमान-भविष्य सापेक्ष अशी सार्वकालिक सत्यघटना असल्याने याबद्दल बोलताना किंवा सांगताना मला काही गैर वा अनैतिक वगैरे वाटत नाही. तर असे आमचे बिनसले. मी याबाबत ती-3 ला नेहमीप्रमाणे सहज बोलता बोलता सांगितले. तिने कसे काय कोण जाणे, मनावर घेतले असावे आणि तो-1 व ती-3 चे फाटले असावे. वास्तविक पाहता ती-3 सुद्धा हस्तमैथून करते आणि हे तिने एका ऑफ पिरिएडच्या ऑड चर्चेत हसत हसत सांगितले होते. तोच धागा पकडून मी ती-3 ला तो-1 च्या त्या सवयीबद्दल बोललो. यात काहीतरी चुगली सांगण्याचा प्रकार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही आजकालचे तरुण तरुणी हे असे अगदी सहज बोलत व सांगत असतो, हे आपल्यालाही ऐकून वगैरे माहीत असावे, न्यायाधीश साहेब! त्यामुळे तो-1 चे ती-3 सोबत बिनसण्याबाबतचे तो-1 चे विधान अन्य सक्षम पूराव्यांद्वारे तपासणे आवश्यक राहील असे माझे सबमिशन आहे. तसेच "बिनसणे" म्हणजे काय, याची व्याख्या सुद्धा न्यायालयाने अगोदर निश्चित करूनच मग या तथाकथित "बिनसण्या"च्या माझ्यावरील कपोलकल्पित आरोपाची जबाबदारी निश्चित करणे वा आरोप फेटाळणे बाबत न्यायाधीश साहेबांनी निर्णय घेणे न्यायोचित ठरेल, असेही माझे सबमिशन आहे. आणि माझी तशी आग्रहपूर्वक विनंती सुद्धा आहे. हे न्यायालय व न्यायाधीश कथालेखकाच्या डोक्यातील निर्मिती असली तरी काही ना काही न्यायालयीन संकेत व प्रथा पाळणे आवश्यक ठरत असल्याने मी सुद्धा काही between the lines न्यायाधीशांच्या विचारासाठी सोडत आहे. तरी माझ्यावर न्यायिक-अन्याय होईल असा कोणताही निर्णय देण्यात येऊ नये अशी प्रार्थना करून मी येथेच माझी कैफियत थांबवतो. धन्यवाद न्यायाधीश साहेब!
□न्यायाधीश : तो-2, तुला ताकीद देण्यात येते. कारण की, तू तुझी कैफियत सादर करताना बहकलास व जे काही बकलास ते तर्कसंगत व कथनक्रमानुसार नव्हते. तुझ्या या अस्ताव्यस्त व बकवासजनक कथनाबद्दल तुला पुन्हा ताकीद देण्यात येते तथा सोबतच तुझ्या या स्पष्टवक्तेपणासाठी तुझे अभिनन्दनही करण्यात येते. तुझ्या कैफियतीतील कितीतरी कच्चे दुवे या न्यायासनाला जुळवावे लागतील व त्यासाठी अकारण न्यायालयीन यंत्रणा राबवावी लागेल. यापुढे कैफियत-कथनातील सलगता आणि सार्थकता सांभाळण्याची दक्षता घेण्यात यावी, पुढे कैफियत सादर करण्याची पुनश्च संधी देण्यात आल्यास! अन्यथा अर्थाचा अनर्थही होऊ शकतो व तो तुझ्या विरोधात पुरावा म्हणूनही वापरला जाऊ शकतो, याची तू गंभीर दखल घ्यावी. आता ती-3 ने आपली कैफियत सादर करावी तथापि तिच्या कैफियत-कथनात कडवटपणा वा उद्वेगादि न येता वस्तुस्थितीच येईल याची ती-3 ने दक्षता घ्यावी.
□ती-3 : न्यायाधीश जी, तो-1 व तो-2 या दोन्ही आमच्या तरुण मित्रांचे एखाद्या तरुणीविषयीचे मत त्यांच्या कैफियतीमधून ज्याप्रकारे व्यक्त झालेत, त्यावरून मला त्यांच्या मतांची व विचारांची किळस येते. माझ्याविषयी त्यांनी केलेले कथन व विधान माझी बदनामी करणारे आहेत. काही खाजगी गुपिते अशी भर न्यायालयात, मग ते न्यायालय कथालेखकाच्या डोक्यातील वास्तवात नसलेले न्यायालय असले तरी, उघड करणे हे कोणत्याही न्यायाने व पद्धतीने न्यायोचित ठरू शकत नाहीत. या तथाकथित कथेचा लेखक स्वतःच गोंधळलेला दिसतोय. त्याला आम्हा आजच्या ग्रामीण तरुण-तरुणींचे अद्यावत विचार, मते समजलीतच नाहीत, कळलीतच नाहीत, असे नाईलाजाने म्हणावे लागते. किंवा तो अजूनही इतिहासातच रमत व वावरत असावा असे वाटते. आणि ऐकीव व काल्पनिक माहितीवर चालला कथा लिहायला! एकंदरीत मला या सा-या प्रकाराचीच किळस येते, कींवही येते. त्यामुळे मी या खटल्यातून व न्यायालयीन प्रक्रियेतून माघार घेते आहे तथा या सा-या प्रकाराचा निषेध करून मी येथेच थांबते, न्यायाधीश जी! आता मी निघू का?
□न्यायाधीश : ती-3 ला सक्त ताकीद देण्यात येते की, तिने न्यायालयाची बेअदबी होईल असे कथन व वर्तन करू नये. तिला न्यायालयाची आजची कार्यवाही संपेपर्यंत येथून निघण्याची परवानगी देता येत नाही. तिने न्यायालयाची आजची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत न्यायालयातच थांबावे व स्वतःवर नियंत्रण ठेवावे. न्यायालयाच्या कामकाजात कोणताही अडथळा येईल असे कोणतेही कृत्य वा अशी कोणतीही हरकत करू नये व इथेच आपल्या जागेवरच थांबावे. पुढील न्यायालयीन कार्यवाहीची दखल घ्यावी व शांत रहावे. आता शेवटची म्हणजे ती-2 ची कैफियत ऐकून घेऊन आपण यथाशक्य निर्णय आणि आदेशाची पायरी चढू किंवा हे प्रकरण निर्णय वा आदेशाशिवाय तसेच सोडून देऊ. तर आता ती-2 ने आपली कैफियत सादर करावी. पण न्यायालयाची बेअदबी होईल व कथालेखकावर आरोप येतील असे वक्तव्य तथा कथन, विधान करू नये, करिता तिला सक्त ताकीद देण्यात येते.
□ती-2 : न्यायाधीश महोदय, मला या प्रकरणी कशासाठी बोलावण्यात आले आहे, याची कारणमीमांसा मला अजूनही कळू शकलेली नाही. आणि आतापर्यंत सादर झालेल्या कैफियतीवरूनही मला या न्यायालयाचे व ह्या न्यायालयीन प्रक्रियेचे प्रयोजनच समजलेले नाही. त्यामुळे मी याप्रकरणी काहीही न बोलता व काहीही न सांगता येथेच थांबते आहे. तथा न्यायाधीश महोदयांना विनंती करते की, त्यांनी लवकरात लवकर आणि आजच या अबुझ आणि कदाचित अफलातूनही प्रकरणाचा निपटारा करून आपला निर्णय व आदेश पारित करावा. जेणेकरून आम्हाला हे काय प्रकरण आहे, ते कळू शकेल आणि आम्हाला लवकरच आपापल्या कामाच्या दिशेने कूच करता येईल. आम्ही ग्रामीण तरुण-तरुणी आहोत म्हणून रिकामचोट आहोत, असे कृपया समजू नये, ही सविनय विनंती.
□न्यायाधीश : आजची कैफियत मांडणीची व सादरीकरणाची कार्यवाही येथे संपत आहे. परंतु शेवटपर्यंत म्हणजे 'आता न्यायालयाचे कामकाज संपले' असे घोषित होईपर्यंत कोणालाही न्यायालयाच्या बाहेर पडता येणार नाही. एकंदरीत सर्व कैफियती विचारात घेता पाचही युवक-युवती आणि कथालेखक सुद्धा गोंधळलेले आहेत, हे स्पष्टपणे लक्षात येते. या संपूर्ण कार्यवाहीतून तुटक-तुटक संदर्भाशिवाय सलग असे काहीही व कोणतेही कथासूत्र सापडून येत नाही. या सर्व लिखाण-प्रकाराला कथालेखक 'कथा' म्हणत असला तरी हे असंबद्ध व फालतू लिखाण; एकांकिका, नाटिका, कथा, लघुलेख, निबंध, यापैकी नेमक्या कोणत्या प्रकारात मोडते, याबद्दल हे न्यायालय संशय व्यक्त करीत आहे. कोणतीही स्पष्ट गोष्ट वा कथा वा कथासूत्र सुद्धा नसताना जशी अर्धी-कच्ची म्हणावी तशी ही रचना लेखकाने केली असल्याने हे न्यायालय लेखकाची कानउघाडणी करते की, या लेखकाने आणखी अभ्यास करावा, लिखाणाची परिपक्वता प्राप्त करावी व त्यानंतरच कथालेखनाची हिंमत करावी.
या पाचही तरुण-तरुणींविरूद्ध कोणतेही दोषारोप न ठेवता कथालेखकाने त्यांच्या कैफियतीसाठी या न्यायालयाची स्थापना केली, न्यायाधीश नेमला, न्यायाधीशासोबत (म्हणजे माझ्यासोबत) गुप्त, अलिखित करारही केला, हे खरोखरीच धक्कादायक आणि कथा या प्रकाराला मारक आहे. त्यामुळे या पाचही व्यक्तींपैकी कोणाला दोषी धरावे, हे समजून येत नाही. सुनावणीतून सुद्धा काहीही स्पष्ट होत नाही किंवा काहीच ठोस निष्कर्षही निष्पन्न होत नाही. सगळाच सावळा-गोंधळ आढळून येतो. या सर्व बाबींना फक्त कथालेखकच नव्हे तर ते पाचही तरुण-तरुणी सुद्धा जबाबदार आहेत, असे स्पष्ट होत आहे. असा सावळा-गोंधळ व अशी असमंजसग्रस्त स्थिती, आजच्या ग्रामीण युवक-युवतींच्या मनस्थितीचे तथा वर्तमानाचे यथायोग्य आकलन व वर्णन करण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. त्यामुळे मी, म्हणजे हे न्यायालय, पुनश्च कथालेखकाच्या विचाराची कींव व्यक्त करून तथा एकूणच परिस्थिती, वस्तुस्थिती तथा सुनावणीच्या प्रकाशात आकळलेली गोंधळ-स्थिती विचारात घेऊन तसेच हे प्रकरण अनिर्णित वा खुले ठेवणे धोक्याचे ठरू शकते याचा साकल्याने विचार करून याचा शेवट करणे आवश्यक वाटत असल्याने, हे न्यायालय प्रारंभीचे संभ्रमित मत त्यागून, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याकरिता खालीलप्रमाणे अंतरिम निर्णय पारित करून तसे आदेशित करीत आहे ---->
□निर्णय/आदेश:-
--------------------
1) पुढील तारखेपर्यंत (तारीख पे तारीख प्रमाणे) सुनावणी तहकूब करण्यात येत आहे.
2) कथालेखकाचा गोंधळलेपणा व कच्चेपणा लक्षात घेता, कथालेखकाने ही तथाकथित 'कथा' मागे घेऊन ही 'कथा' नष्ट करण्याकरिता कथालेखकाला आदेशात्मक तंबी देण्यात येत आहे.
3) कथालेखकाने मुजोरी करून ही तथाकथित 'कथा' कुठेही प्रकाशनार्थ पाठविल्यास कोणत्याही प्रकाशक/संपादकाने ही 'कथा' कदापि प्रकाशित करू नये, अशी त्या सर्व प्रकाशक/संपादकांना आदेशात्मक सूचना करण्यात येत आहे.
सदरील निर्णय/आदेश आज दिनांक अमुक-तमुक रोजी माझ्या (वास्तवातील/ख-याखु-या नसलेल्या न्यायाधीशाच्या) स्वाक्षरी तथा सील-शिक्क्यासह पारित करण्यात येत असून या निर्णय/आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सर्व वाचकांना 'निर्दयपूर्वक' आदेशित करण्यात येत आहे.
न्यायाधीश,
स्वा-×××××××
कथालेखकाने नेमलेला अ-वास्तव न्यायालयातील अ-वास्तव न्यायाधीश.
□□□

(शब्दसंख्या सुमारे 2100)
¤
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
(चलभाष:- +91 7066968350)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
(चलभाष:- +91 7066968350)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment