म.रा.सा.सं.मंडळ 2024-27 : CM/DCM/CS यांना ईमेल

ईमेल ची प्रत......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दि.18.10.2024
~~~~~~~~~~~~~
प्रति,
मा.मुख्यमंत्री,
मा.उपमुख्यमंत्री (1)
मा.उपमुख्यमंत्री (2)
मा.मुख्य सचिव,
महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई-400032

सविनय सादर प्रणाम. 

      म.रा.साहित्य व संस्कृती मंडळाच्या 1960 मधील स्थापनेनंतर, सुमारे 58 वर्षानंतर, मंडळाच्या इतिहासात प्रथमच, 2018 ते 2021 करिता माझी, *झाडीपट्टीतील एखाद्या साहित्यिकाची,* मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली होती. तथापि कोरोना-कालावधीमुळे 2018 ते 2021 मधील आमच्या सदस्यत्वाचा कालावधी शून्यवत गेला. 
        तरी 2021-24 या कालावधीत झाडीपट्टीतील कोणालाही संधी देण्यात आली नाही. 
      आणि आता 2024-27 मध्ये तर हद्दच झाली. झाडीपट्टीतील व्यक्ती तर नाहीच पण राजकीय सोय म्हणून काही व्यक्तींना विधानबाह्य जागेवर/पदावर सामावून घेण्याची अचंबित घटना घडवून आणली गेली.
असो. असोच.
       *(झाडीपट्टी ही/हा महाराष्ट्रातील एक अविभाज्य घटक आहे!* 😅😅😅🤣 *म्हणूनच म्हणावेसे वाटते की, असा/एवढा झाडीपट्टी-द्वेष बरा नव्हे!)*
¤
आपला, 
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, ता.आमगांव, 
जि.गोंदिया (पूर्व विदर्भ-महाराष्ट्र)
दि.18.10.2024
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन