तुझी गोधडी चांगली... वाचून (गिरीश कुबेर यांना पत्र)
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया
(विदर्भ/झाडीपट्टी-महाराष्ट्र), दि.10.05.2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रति,
मा.श्री.गिरीश कुबेर
संपादक, लोकसत्ता.
सप्रेम सादर नमस्कार.
>> पुनश्च सविनय कळवितो की, मी लोकसत्ता चा सुमारे 25-30 वर्षांपासूनचा नियमित वाचक आहे. सध्या निवृत्तीनंतर मी माझ्या पैतृक खेडेगावी स्थायिक झालो असून माझ्या गावात लोकसत्ता चे अंक रोजच्या रोज मिळत नसले तरी एक-दोन दिवसानंतर मला लोकसत्ता चे अंक मिळतील अशी व्यवस्था मी केली आहे. त्याप्रमाणे दि.08 व 09 मे चे दोन्ही अंक आज दि.10.05.2021ला मिळाले.
>> काल दि.09.05.2021 च्या लोकरंग मधील आपला अतिशय महत्त्वाचा व वस्तुस्थितीचे सुस्पष्ट विश्लेषण असलेला लेख "तुझी गोधडी चांगली..." मला खूप खूप आवडला. आपण या 'गागर में सागर' ठरणा-या लेखात मांडलेले विचार आणि त्याच्या कारणमीमांसेचे आपण केलेले विश्लेषण म्हणजे भारतीय जनमानसाच्या inbuilt विवेकशीलतेचे आपले अगदी सुयोग्य आकलन असून मी आपल्या या आकलनाशी माझी पूर्णपणे सहमती व्यक्त करतो. (माझी अशी सहमती म्हणजे माझी शेखी नसून आपल्या या संदर्भातील विविध लेखांतूनच विकसित झालेल्या माझ्या आकलनाची कबुली समजावी ही विनंती आहे.)
>> यापूर्वीच्या माझ्या काही पत्रांमधून मी आपल्या विदर्भविषयक विविध आकलनाबद्दल माझे तीव्र मतभेद (जाहीर रित्या सुद्धा) व्यक्त केले असले तरी मी आपल्या अन्य लिखाणाचा फॅन वाचकच असल्याने व आपल्या त्या लिखाणांतून, विशेषतः आपल्या संपादकीयांतून मी माझे आकलन समृद्ध करू शकलो असल्याने, आपण मला आपला Love-Hate प्रशंसक समजावा असेही माझे नम्र निवेदन आहे. असो.
>> 'तुझी गोधडी चांगली...' या आपल्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील निष्कर्ष, "हा देश एकच एकरंगी, एकपोती.... लागणार नाही.", मी माझ्या फेसबुक वाॅलवर शेअर करू इच्छितो. तरी मला तशी आपली संमती प्रदान करून उपकृत करावे ही विनंती.
>> प्रतिक्षेत,
¤आपला, एक प्रशंसक वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया
(विदर्भ/झाडीपट्टी-महाराष्ट्र)
~~~~~~~~~•~~~~~~~~~~~~~•~~~~~~
Comments
Post a Comment