निसर्ग नियम आणि....
*निसर्ग-नियम आणि संयम व अनिर्बंध उच्छृंखलता*
---------------------------------------------------------------
एका मराठी वर्तमान पत्राच्या युवा पुरवणीत नुकताच एक लेख वाचण्यात आला. त्या लेखातील पहिलेच काही परिच्छेद असे...
@@@..."व्हॅलेन्टाइन्स वीक सुरु झाला. बाजारपेठा सजतील, लालचुटूक फुगे, हाॅटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारे सुरु होईल.
हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.
मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडिओ पाहून भीती वाटतेच. आजही खेड्यापाड्यातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरुप हे सारे प्रेमात आडवे येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म स्टाइल मुलंमुली स्वतःच ठरवतात की आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरून जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको. किती मुलंमुली आजही आपलं प्रेम विसरुन, सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात. भयंकर असलं तरी हे आजच्या समाजाचं वास्तव आहे.
मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जीवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही. अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात. कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत. त्यांची जाणीव होते तोवर ब्रेकअप होऊन गेलेला असतो.
ते आहेत नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरस.
अॅन्टीव्हायलस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढवून घेतो आहोत. याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा."@@@
□□
या लेखात नमूद "मतां"बद्दल कोणतेही अधिक-उणे भाष्य न करता काही इतिहास-सिद्ध तथा वैज्ञानिक रित्या सिद्ध झालेले "सैद्धांतिक-विचार" नमूद करीत आहे....
□□
€€€ "गांधीजी म्हणाले होते की, 'भौतिक सुखसोयींच्या -- म्हणजेच अतिरेकी उपभोग-उत्पादनाच्या -- भाराखाली पश्चिमी सभ्यता नष्ट होतील.'
गांधीजींच्या ह्या म्हणण्याला मानववंश-शास्त्रातला एक सिद्धांत भक्कम पुरावा देतो. जगात आजवर अनेक सभ्यतांचा उदय झाला. त्यापैकी काही (मेसोपोटेमिया, बाबिलोनिया, रोम, ग्रीक, इ.) अत्यंत प्रगत होत्या. तथापि, कालान्तराने त्या नामशेष झाल्या. 'असं का झालं' ह्याचा शोध घेताना मानववंवशास्त्राला (Anthropology) असं आढळून आलं की, ज्या सभ्यतांनी निसर्गाचा आदर न करता, त्यावर विजय मिळवायचा प्रयत्न केला, त्या सभ्यता त्या नादात नाश पावल्या. ह्या सर्व सभ्यता प्रायः पश्चिमेकडच्या होत्या.
उलट, पूर्वेकडच्या भारतीय, चिनी, जपानी ह्या सभ्यतांनी निसर्गाच्या मर्यादांचा आदर केला; उत्पादन आणि उपभोग हे संयमित ठेवले. निसर्गाची चक्रीयता, पुनरुत्पादनक्षमता अबाधित ठेवली. त्यामुळे, त्या आजही अस्तित्वात आहेत.
त्यामुळेच, त्याच न्यायाने, आजची जी पाश्चात्य सभ्यता आहे, ती नष्ट होण्याची जवळपास 100% खात्री आहे. गांधींनी हेच सांगितलं. तथापि, वरील पौर्वात्य सभ्यताही आता वर्तनानं "पश्चिमी" बनलेल्या असल्यानं त्याही नष्ट होतील, हे उघड आहे."
(गतिमान संतुलन : जानेवारी 2019 : दिलीप कुलकर्णी)
□□
$$$या दोन्ही उद्-घृतांनंतर प्रश्न असा उपस्थित होतो की, आजकालची तरुण मुलंमुली म्हणतात तशी/त्याप्रमाणे व्हॅलेन्टाइन डे व तद्जन्य प्रेमालापादि हे "निसर्गाच्या मर्यादांचा आदर करणारे आहे की, निसर्गावर विजय मिळवायचा प्रयत्न" आहे???
□□
$$$प्रेम आणि वयानुसारचे भिन्नलिंगींविषयीचे आकर्षण(?) यात निसर्गाने काही भेद/फरक ठेवलाय की नाही? की दोन्ही सारखेच म्हणायचे?
□□
$$$निसर्ग-नियमानुसार संयम हा निसर्गाधारित आहे की, उच्छृंखलता ही निसर्गाधारित आहे? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्नच आहे!
□□
$$$आणि "सभ्यता-नष्ट" होण्याबद्दलचा
मानववंशशास्त्राचा इतिहास-सिद्ध वैज्ञानिक सिद्धांत/इशारा चुकीचा ठरवायचा/म्हणायचा काय???
□□
###प्रत्येकाने स्व-विचारशक्तीनुसार निष्कर्षित व्हावे हीच अपेक्षा आहे.
□□
===शेवटी "यथेच्छसि तथा कुरु".===
□□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902
(जि.गोंदिया/07.02 2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment