Posts

Language, भाषा आणि बोली : एक पॅरेडाईम

*Language, भाषा आणि बोली : एक पॅरेडाईम* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      मुंबई, पुणे सारख्या नागरी/महानगरीय भागातील (सर्वच नसले तरी) बहुतेक मराठी साहित्याच्या व साहित्यिकांच्या "लघुवर्तुळ-Language"च्या परीघाबाहेरील आम्हा पूर्व विदर्भ-महाराष्ट्रीयन झाडीपट्टीवासीयांची "भाषा" मुंबई, पुण्यासारख्या भागातील बहुतेक साहित्यिकांना "विटाळ"णारी वाटत असल्याची #कटू जाणीव होऊ लागल्याने, सर्वप्रथम 1990 दरम्यान आम्ही पूर्व विदर्भातील झाडीपट्टीवासीयांनी झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना केली.       .....आणि आजवर तिचे बत्तीस/32 साहित्य संमेलन, शासनाच्या कोणत्याही कुबड्यांशिवाय, अर्थसाह्याशिवाय यशस्वी रित्या पार पाडले आहेत. बत्तीसावे झाडीबोली साहित्य संमेलन 28, 29 डिसेंबर 2024 ला वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर येथे यशस्वीरित्या पार पडले आहे. या बत्तीसाव्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध शाहीर, गझलकार, लोककलावंत श्री.लोकराम शेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे/होती.       (मी स्वतः वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर येथेच यापूर्वी जानेवारी-...

पोवार समाज आणि सांस्कृतिक परंपरा : एक नम्र प्रकटन

*पोवार समाज आणि सांस्कृतिक परंपरा : एक नम्र प्रकटन*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       कोणत्याही विषयाची सखोल माहिती न घेता, अर्धवट किंवा ऐकीव ज्ञानाच्या आधारे एखाद्या समाजाच्या प्राचीनतम सांस्कृतिक परंपरेला नावे ठेवणे, अमान्य करणे किंवा तिला अयोग्य ठरवणे हे ज्ञानपरंपरेत कधीच मान्य केले गेलेले नाही/केले जात नाही. कारण अशा भ्रामक, कपोलकल्पित व अज्ञानावर आधारित टिका-टिप्पण्या, त्या सांस्कृतिक परंपरेचा धारक व पाईक असलेल्या समाजाला; त्याच्या अवनतीचे, ऱ्हासाचे व जेनेटिक अनावस्थेचे बळजबरीने/मुजोरीने डोस पाजण्याचेच द्योतक असते.        वस्तूतः जगातील प्राचीनतम मानला गेलेल्या ऋग्वेद या ग्रंथात ज्या समाजाला ब्रह्मक्षत्र अशी संज्ञा दिल्याचे दिसून येते, त्या संज्ञेचे कालक्रमित अवस्थांतर होऊन ते पौर, प्रवर , प्रवार, पावार व (सुमारे 1000 वर्षांपूर्वी) संस्कृतनिष्ठ परमार, प्रमार, >> पोवार, पंवार व क्वचित पवार असे संज्ञापन झाल्याचे सुद्धा या विषयातील तज्ज्ञ संशोधक-इतिहासकार मांडतात. याच समाजातील काही विदुषी महिला, ऋषी या संज्ञेला पात्र ठरून त्यांना स्फुरलेल्...

(New)/*शाश्वत विकास आणि व्यक्ती : तत्त्व, व्यवहार, वस्तुस्थिती आणि निसर्गाचे कटूसत्य...! (एक संक्षिप्त टिपण)*

New/*शाश्वत विकास आणि व्यक्ती : तत्त्व, व्यवहार, वस्तुस्थिती आणि निसर्गाचे कटूसत्य...!* (एक संक्षिप्त टिपण) (New) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        व्यक्ती (स्त्री, पुरुष वा ट्रान्स जेण्डर) कोणतीही असो, तिच्या/त्याच्या व्यक्तिगत व समूहगत शाश्वत व सम्यक विकास, उत्थान, प्रगती, उत्कर्ष, इ. आणि याच्या उलट सुद्धा, (तथाकथित दारिद्र्य-निर्मुलनादि प्रथमदर्शनी निसर्गद्रोही कुप्रयोग...?) संबंधाने जे सिद्धांत, प्रमेय, गृहीतक... (Theory, Hypothesis, Theorum, Postulate) मांडले जातात त्यात बहुदा वस्तुस्थितीचा विपर्यास, चूकीचे आकलन, अपसमज, गैरसमज किंवा अपूर्णांकी/पोकळ तत्त्ववाद, अविचारी/तर्कदुष्ट युक्तिवाद, निसर्ग-नियमांच्या विरोधी छद्म प्रतिवाद, अवैज्ञानिक मांडणी, ... आदि पळवाटाच अधिक प्रमाणात आढळून येतात, हा माझा "अल्पबुद्धी"चा अनुभव आहे.      त्यातील काही सर्वसासर्वसाधारण दोष/पळवाटा अशा... 1)पूर्वजन्मीचा दोष...(पाप?)..., 2)शासन व्यवस्थेची असमर्थता, असफलता..., 3)समाजाची आपल्या घटकाप्रती अनास्था, बेफिकिरी..., 4)संपत्तीचे असमान(?) वाटप......., 5)गांधी-विचाराचे अज्...

All India Pawari (Powari) Boli Sahitya-Kala-Sanskruti Mandal : An Unfolding Paradigm

*All India Pawari (Powari) Boli Sahitya-Kala-Sanskruti Mandal : An Unfolding Paradigm* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      The legacy of Raja Bhoj and Vikramaditya, and their intellectual heritage, should be utilized by us, their descendants, as a currency and capital. This is the need of the hour. To achieve this, we need to create awareness among the Powar community about our "Powar-Caste/Clan" concept and conduct critical caste studies. We need to encourage researchers to come forward and conduct studies on the linguistic, geographical, and circumstantial changes that have occurred in the Powari language & culture as well.         Our ancient historical period was glorious, but we cannot be satisfied with just that. We need to work towards making our historical reality relevant to the current global scenario. This requires a comprehensive and inclusive movement. However, this movement should not be limited to just digital media, protests, an...

माझ्या काही मूर्खपणाच्या शंका/कुशंका!!!

*माझ्या काही मूर्खपणाच्या शंका/कुशंका!!* ---------------------------------------------------- 1)मी एलएल.बी.(1981) करत असताना आम्हाला "नैसर्गिक न्याय तत्व" (Principle of Natural Justice) शिकवताना आमचे प्रोफेसर न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देऊन सांगायचे की, हे तत्त्व कोणत्याही कायद्यात "व्याख्यायित" केले नसले तरी हे तत्त्व कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचा मूलभूत पायाच असते. केलेली कार्यवाही कितीही योग्य(?) असली तरी नैसर्गिक न्याय तत्त्वाचे अनुपालन करणारी नसेल तर ती कार्यवाही या तत्त्वाचे अनुपालन न केल्याच्या तांत्रिक कारणावरून सुद्धा न्यायालय निरस्त/रद्द करू शकतात/करतात.  यावर आता असा प्रश्न उपस्थित होतो की, आताही हे "नैसर्गिक न्याय तत्त्व" न्यायालयीन निर्णयात पाळले जात असावे काय? 2)मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत असताना (30 वर्षांत) हजारो न्यायिकवत (Quasi Judicial) निर्णय/आदेश पारित केले होते. आणि त्यातील एकसुद्धा निर्णय कोणत्याही न्यायालयात निरस्त वा रद्द झाल्याचे "मला आढळून...

फिनिक्स माॅल ऑफ द मिलेनियल्स..... (जय हो...!)

*जय हो......!* ~~~~~~~~           फिनिक्स माॅल ऑफ द मिलेनियल्स, वाकड, पुणे या सुमारे 10-12 एकरात विस्तारित असलेल्या, सध्या सहा मजली असलेल्या अवाढव्य-अवाढव्यतम अशा अत्याधुनिक "परिसरा"तील आयनॉक्स मध्ये काल दि.16 मार्च 2024 ला 'सैतान' (की शैतान?) नावाचा तद्दन फालतू व कल्पनादारिद्र्याचा उत्कृष्ट उदाहरण/नमुना(?) असलेला सिनेमा "देखला". (आणि सारीडाॅनच्या टेबलेट्सची विक्री वाढवण्यात थोडासा हातभार लावला.)      या अवाढव्यतम माॅल मधील अवर्णनीय(?) गर्दी 'देखून' मला कैदेतून सुटलेल्या बंदीवानांचे वर्तन कसे असू शकेल याचा, 'याचि देही याचि डोळा' स्वानुभव घेता आला.        मी तीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात वरीष्ठ राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत असताना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद(?), नाशिक, नागपूर सारख्या महा ते महत्तम नागरी भागातही राहण्या/असण्याचा थोडाफार अनुभव घेतला आहे. या अशा अनुभवाच्या असहनीय मनस्तापाला मी पेलू शकण्यास स्वतःला असमर्थ जाणून, माझ्या निवृत्तीनंतर, सध्या गेली अकरा वर्ष...

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन

*झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली* *(कला, साहित्य, संस्कृती व परंपरा)* : *एक आकलन* ------------------------------------------------------------           @ॲड.लखनसिंह कटरे  ----------------------------------------------- (1) झाडीपट्टी/झाडीमंडळ : ही एक ऐतिहासिक, भौगोलिक तथा सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे संपूर्ण चार जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, भिवापूर, कुही, उमरेड हे तालुके (आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचाही काही भाग तथा छत्तीसगढ मधील राजनांदगाव, दुर्ग जिल्ह्यातील भाग) असा हा झाडीपट्टीचा विस्तार आहे. या भागात सर्रास बोलली जाणारी ग्रामीण बोली ही झाडीबोली म्हणून संबोधिली/ओळखली जाते. झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी या भागातील दुसरी प्रमुख बोली म्हणजे पोवारीबोली होय. या भागातील वनाचे प्रमाण एकूण भूभागाच्या सरासरीने 60 ते 80% असून येथील वनात मौल्यवान सागवानापासून जवळपास सर्वच प्रजातीचे वृक्ष आहेत. येथील वृक्षराजी अत्यंत समृद्ध आहे.  सुप्रसिद्ध संस्कृत कवी/नाटककार भवभूति...