(New)/*शाश्वत विकास आणि व्यक्ती : तत्त्व, व्यवहार, वस्तुस्थिती आणि निसर्गाचे कटूसत्य...! (एक संक्षिप्त टिपण)*

New/*शाश्वत विकास आणि व्यक्ती : तत्त्व, व्यवहार, वस्तुस्थिती आणि निसर्गाचे कटूसत्य...!* (एक संक्षिप्त टिपण) (New)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
       व्यक्ती (स्त्री, पुरुष वा ट्रान्स जेण्डर) कोणतीही असो, तिच्या/त्याच्या व्यक्तिगत व समूहगत शाश्वत व सम्यक विकास, उत्थान, प्रगती, उत्कर्ष, इ. आणि याच्या उलट सुद्धा, (तथाकथित दारिद्र्य-निर्मुलनादि प्रथमदर्शनी निसर्गद्रोही कुप्रयोग...?) संबंधाने जे सिद्धांत, प्रमेय, गृहीतक... (Theory, Hypothesis, Theorum, Postulate) मांडले जातात त्यात बहुदा वस्तुस्थितीचा विपर्यास, चूकीचे आकलन, अपसमज, गैरसमज किंवा अपूर्णांकी/पोकळ तत्त्ववाद, अविचारी/तर्कदुष्ट युक्तिवाद, निसर्ग-नियमांच्या विरोधी छद्म प्रतिवाद, अवैज्ञानिक मांडणी, ... आदि पळवाटाच अधिक प्रमाणात आढळून येतात, हा माझा "अल्पबुद्धी"चा अनुभव आहे. 

    त्यातील काही सर्वसासर्वसाधारण दोष/पळवाटा अशा...
1)पूर्वजन्मीचा दोष...(पाप?)...,
2)शासन व्यवस्थेची असमर्थता, असफलता...,
3)समाजाची आपल्या घटकाप्रती अनास्था, बेफिकिरी...,
4)संपत्तीचे असमान(?) वाटप.......,
5)गांधी-विचाराचे अज्ञान किंवा चूकीचे आकलन.......,
6)सामाजिक बांधिलकी बद्दलचे अपसमज...,
7)सहानुभूतीचे निसर्ग विरोधी उदात्तीकरण...,
इत्यादी....

      परंतु एखाद्या व्यक्तीची “व्यक्ती म्हणून जगण्यासच संपूर्णतः नालायक”* असण्याची वृत्ती व कृती/वर्तन मात्र कोणत्याही निसर्गसंमत अशा शाश्वत स्वरूपाच्या सिद्धांतांमध्ये यथार्थपणे तपासली गेल्याचे मला अजून तरी आढळून आलेले नाही. (चूक-भूल देणे-घेणे!) जी व्यक्ती ही “निसर्गसंजीवक माणूस” (व्यक्ती?) म्हणून जगण्यासच संपूर्णतः “नालायक”* असते, पृथ्वीवरील अनावश्यक भारच असते, अशा वस्तूतः अतिशयच अल्पसंख्य असलेल्या व्यक्तींच्या तथाकथित “जीवनयापना”ची व त्यांच्या उत्थान, प्रगती, उत्कर्ष, विकास, दारिद्र्य-निर्मुलनादिंची,... भ्रामक/निसर्गविरोधी संकल्पनांची जबाबदारी बहुसंख्य असलेल्या सक्षम समूहावर अविचारी व तर्कदुष्ट अशा अनाकलनीय बळजबरीने लादण्यासाठीच सरसकट विविध निसर्ग-विसंगत व निसर्गद्रोही, अवैैैज्ञानिक तत्त्वे तथाकथित विद्वान आणि विचारवंतांनी “माणूसकी”, “मानवता” अशा वस्तूतः शाश्वत मूल्यांच्या नावे भ्रामक, छद्मी व माणूसकी/मानवता-विरोधी, अविचारी, तर्कदुष्ट तथा निसर्गद्रोही तत्त्वांनी भारून टाकली आहेत. आणि दुर्दैवाने त्यालाच “सिद्धांत”, “वाद”, “प्रमेय”, “गृहीतक”,.... अशी भूलथापजनक छद्म व प्रच्छन्न नावे/संज्ञा सुद्धा प्रदान केली आहेत, हे निष्पक्ष/निरपेक्ष सुज्ञांना नाकारता येणार नाही.
       वस्तूतः व्यक्ती, व्यक्तीचे अध्याहृत/अंतर्निहित असे शारीरिक/मानसिक श्रम, बुद्धी आणि त्याचे स्वतंत्र/स्वायत्त अस्तित्व असणे याच बाबी व्यक्तीला खऱ्या सत्यापर्यंत व शाश्वत आनंदापर्यंत पोहोचवितात. ज्या व्यक्तीमध्ये “अशा” वृत्तीचा व कृतीचा/वर्तनाचा अभावच नव्हे तर त्याप्रति सर्वंकष उदासीनता/नकारात्मकता असते, ती व्यक्ती अर्थातच मनुष्य/व्यक्ती म्हणून जगण्यासच निसर्गतःच संपूर्णतः “नालायक” असते. [अशा व्यक्तींची संख्या नेहमीच अत्यल्प राहिली असून त्यांना “लायक” बनविण्याच्या प्रक्रियेत छद्मी दयाभाव नव्हे तर कायदेशास्त्रातील (jurisprudence मधील) सक्षम, सफल व सुफल उपाययोजनांच्या उपयोजनाची निकड असते.] अन्यथा उत्क्रांतीशास्त्रानुसारच्या निसर्गाच्या कठोरतम वाटणाऱ्या पण परमावश्यक असलेल्या Natural Selection (survival of the FITTEST) या वैज्ञानिक सिद्धांतानुसार ती व्यक्ती काळलुप्त होणे ही बाब पूर्णतः स्वाभाविक अशी नैसर्गिक प्रक्रिया असते. अशा व्यक्तीच्या तथाकथित तथा छद्मी “विकास/प्रगती/उत्थाना”दि करिता इतर सक्षम व्यक्तींच्या श्रम, स्वातंत्र्य, संपत्ती व स्वायत्ततेचा अनाकलनीय बळजबरीने बळी देणे वा “त्यांचा” संकोच करायला त्यांना भ्रामक/छद्म व आक्रमक युक्तिवादाद्वारे भाग पाडणे म्हणजे विज्ञानाधारित शाश्वत निसर्ग-नियमांना डावलून कल्पनेतील सशाचे शिंग शोधण्यासारखेच असते, हे मी माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार नम्रपणे नमूद करू इच्छितो. 
       असे असले तरी काही तथाकथित विचारवंत या नैसर्गिक विचारप्रवाहाच्या विरुद्ध विचार मांडताना आढळून येतात. वस्तूतः एखाद्या गरीब व्यक्तीला सुद्धा श्रीमंत होण्यासाठी यथावश्यक असे सकारात्मक व न्यायोचित धोरण राबवणे निसर्गाधारित/निसर्गानुकूल असते/असावे/आहे. पण गरिबाला श्रीमंत करण्यासाठी, श्रीमंताला गरीब करण्याची अघोरी कला सांगणाऱ्या, अवलंबणाऱ्या/जोपासणाऱ्या विचारवादाचे जनक, वाहक, प्रचालक, प्रचारक व अनुयायी म्हणजे निसर्ग-विसंगत व नितांत निसर्ग-विरोधी धोरणाचे कट्टर समर्थकच असतात. त्यांना "निसर्गाचे स्वाभाविक/स्वभावगत परिचालन" या संकल्पनेशी काहीच देणेघेणे नसते. "मेरे मुर्गीकी एक ही टांग" ही वृत्ती जोपासणारा विचारवाद हाच त्यांचा अघोरी धंदा असतो. 
          यासंदर्भात गांधीजींच्या विचारांच्या दिशेने पाहिले तर असे दिसून येते की,....
      मुळात कोणताही वाद/(तत्त्व) मानवनिर्मित असल्यामुळे गांधीजींना तो वाद बनविणाऱ्याच्या मनातील चौकटीसारखाच वाटतो. पर्यायाने अशा कोणत्याही व कोणाच्याही चौकटीत समाजाला व पर्यायाने व्यक्ती ला बळजबरीने बसविणे गांधींना मान्य नव्हते. एकंदरीत “असे” निसर्ग-विरोधी/निसर्गद्रोही मानवनिर्मित भ्रामक/काल्पनिक/हवामहली वाद अशा “नालायक”* व्यक्तींच्या संदर्भात सध्याच्या उजाखा*प्रणित स्वायत्त व व्यामिश्रतम काळात सुद्धा उपयोजिणे, गांधी-विचारांच्या प्रकाशातही, पूर्णतः अयोग्य व चूकीचेही ठरते हेे स्वयंस्पष्टच आहे. त्यासाठी काही वेगळ्याच निसर्ग-संमत पण कठोर वा यथाशक्य सौम्य निर्णय घेणाऱ्या कायदेशास्त्रावर आधारित धोरणाची आवश्यकता आहे. “ही  समस्या/बाब” सरधोपटपणे व सरसकटपणे सोडविण्याचा जबरदस्तीचा व अविचारी व तर्कदुष्ट अट्टाहास मात्र निसर्ग-विरोधी/निसर्गद्रोही व अवैज्ञानिक सुद्धा असल्याने परिणामकारक न ठरता त्यातून वेगळ्याच भयंकर (ऐतखाऊपणा, आळशीपणा, नैराश्य, उदासीनता, क्रूरता, खुटीउपाळपणा, गुन्हेगारीवृत्ती, आप्पलपोटेपणा, खुनशीवृत्ती, मत्सर, अलगपणा, इ.) अशा जटिलतम समस्या उभ्या ठाकतात. (दुर्दैवाने हे आपण सध्या अनुभवतो सुद्धा आहोत.)
         वस्तूतः पुनरुत्पादन हे कोणत्याही सजीवांचे, पर्यायाने व्यक्तीचेही, एक क्रमप्राप्त उद्दिष्टच आहेे. प्रत्येक प्रजातीतील सजीव मोठ्या प्रमाणात संतती निर्माण करीत असतात. या संततीतील प्रत्येकाच्या गुणधर्मात  निसर्गतःच किंचितसा फरक असतो. संततीतील सर्वांना आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेऊनच जगावे लागते. या संघर्षात ज्या संंततीचे गुणधर्म परिस्थितीशी जुुुुळवून घेण्याच्या दृष्टीने अनुकूल ठरतात, तीच संतती केवळ टिकून  राहते. या टिकून राहिलेल्या संततीचे जेे गुणधर्म त्या सजीवाच्या पुढील पिढ्यांत संक्रमित होतात, त्यातूनच धिम्या गतीने नवीन प्रजाती  निर्माण होऊन उत्क्रांती होत जाते. याउलट असे गुणधर्म सांडलेल्या संततीला/व्यक्तीला उत्क्रांतीशास्त्राच्या सिद्धांतानुसार Natural Selection (survival of the FITTEST)ची प्रक्रिया होऊन नामशेष/नष्ट  होणेे क्रमप्राप्तच असते. अशा प्रकरणी मानवता/माणूसकी/उदात्त भावना... आदि कल्पना/भावना पूर्णतः गैरलागू ठरतात/असतात. हे उत्क्रांतीशास्त्राधारित निसर्ग-संमत #कटूसत्य समजणे कठीण असले तरी अशक्य ठरू नये, असे मला वाटते.
        (*नालायक या संज्ञेच्या विवेचनात सर्वच प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचा अपवाद आहे, हे लक्षात असू द्यावे. दिव्यांग व्यक्ती “जगण्यास नालायक” कधीच नसतात! मी स्वतः एक दिव्यांग व्यक्ती आहे.)
       निसर्ग नियमांचे तंतोतंत पालन करण्यापासून निसर्गाला रोखण्यासाठी/निसर्गनियमांवर मात करण्यासाठी काही तथाकथित विद्वान व (कु)विचारवंतांनी मूलतः अवैज्ञानिक, अनैसर्गिक सिद्धांत आणि विचार-पद्धतींचा "वापर"/"दूरुपयोग" सर्रास सुरू केला असल्याचे सध्या सर्वत्रच निदर्शनास येत आहे. वस्तूतः Natural Selection (Survival of the FITTEST)हा तर त्रिकालाबाधित असा सर्वव्यापी आणि सर्वंकष विज्ञानाधारित, उत्क्रांतीशास्त्राचा निसर्ग नियमच आहे. या नियमालाच आव्हानित करणे म्हणजेच माणूसकी, मानवता असे मानावयाचे काही तथाकथित विद्वानांनी ठासून ठरविले असल्याने माझे हे उत्क्रांतीशास्त्राधारित “निसर्ग-संमत” विचार, कोणत्याही तर्काधिष्ठित पद्धतीचा अवलंब न करता, मानवता-विरोधी ठरविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याची मला कल्पना आहे. तरी "कटूसत्य" असले म्हणून सत्य काही असत्य थोडेच होणार आहे, आणि निसर्गाचा आजवरचा इतिहास सुद्धा मी मांडत असलेल्या "कटूसत्या"ला सक्षम साक्षीदार आहेच! शिवाय कोणत्याही तत्वा(?)तील शब्दांपेक्षा त्यांच्या परिणामाला अधिक महत्व असते, हा व्यावहारिक सिद्धांत स्वीकारणे बहुतेक "लकीर के फकीर" असलेल्या विद्वान, विचारवंतांना कठीणच "जाते" हा सार्वत्रिक अनुभव आहेच.
      एखाद्या बाबीचा साकल्याने विचार करताना एक महत्वाचे तथ्य लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. ते म्हणजे ‘देश व समाज हा व्यक्तीहून मोठा असल्याने त्याची बाजू घेताना स्वतःची/व्यक्तीची मते व हित काही प्रमाणात तरी मागे टाकणे अनिवार्य असते’. म्हणूनच वर नमूद केल्याप्रमाणे “नालायक”* व्यक्तींच्या संदर्भात धोरण तयार करताना/राबवताना “देश, समाज व इतर सक्षम व्यक्ती” यांच्या विकास व हिताला (मानसिक व बौद्धिक क्षमतेला) ते कोणत्याही प्रकारे बाधक, विनाशक व विरोधी असता कामा नये याचे सजग भान ठेवणे अत्यावश्यक ठरते, असेही माझे अल्पबुद्धि-आकलन मी सविनय मांडत आहे. 
        वस्तूतः आजच्या या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण)च्या युगात “तत्त्वज्ञानाचा अंत झाला आहे. तत्त्वज्ञानी विज्ञानातील अद्यावत प्रगतीशी सुसंबद्ध राहू शकले नाहीत. ज्ञानाचा शोध घेण्यामध्ये वैज्ञानिक सतत आघाडीवर राहतात. तत्त्वज्ञानातील समस्यांची उत्तरेही विज्ञानातून मिळतात. विशेषतः अशा वैज्ञानिक सिद्धांतांमधून आपल्यासमोर विश्वाचे एक नवे व वेगळे चित्र उभे करून त्यातील मानवाचे/व्यक्तीचे स्थान वैज्ञानिक दाखवू शकतात. ..... तत्त्वज्ञान आणि विज्ञान यात मूलभूत फरक आहे. अधिकारवाणी हा तत्त्वज्ञानाचा पाया आहे, त्याउलट निरीक्षण आणि तर्कशुद्धता हा विज्ञानाचा पाया आहे. अंततः विज्ञानाचाच विजय निश्चित आहे कारण विज्ञान केवळ बडबड करीत नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवते.”--(स्टिफन हाॅकिंग) या विज्ञानाधारित तथ्य-कथनाच्या प्रकाशातही उत्क्रांतीशास्त्रातील Natural Selection (Servival of the FITTEST) ह्या दुसऱ्या एका वैज्ञानिक तथ्याचे सत्त्यत्व सिद्ध होते. 
        व्यक्तीच्या सक्रीय सहभागाला व अंतर्निहित आत्मसन्मानाला महत्त्व न देता त्याला आयतोबा/परावलंबी बनवून घरबसल्या व अल्प/अत्यल्प श्रम-सहभागाद्वारे त्याच्या रोजच्या जगण्याच्या “गरजा” भागवणे, ही संकल्पना(?) अगदी निसर्ग-विसंगत असून या तर्कदुष्ट युक्तिवादाच्या आधारे तथाकथित/छद्म मानवतावादी लोकांनी (शासनाने) प्रत्यक्ष व्यवहारात ही संकल्पना(?) राबवणे सुरू केल्यापासून व्यक्तीची “स्व-सक्षमते”ची व “स्वाभिमाना”ची भावनाच मरू लागली आहे. आणि पर्यायाने "जगण्यास लायक" असलेल्या व्यक्ती सुद्धा “जगण्यास नालायक” व “स्वाभिमान-शून्य” अशा अनैसर्गिक श्रेणीत/वर्गात वेगाने तबदील होत आहेत. शिवाय अशा या ऐतखाऊ निर्माण करणाऱ्या योजनांपासून समाजाला/शासनव्यवस्थेला कोणताही शाश्वत लाभ न होता उलट भरून काढता येण्यास अशक्य अशा कोटीतला शाश्वत नुकसान होऊन समाज व पर्यायाने शासनव्यवस्था सुद्धा जागतिक पातळीवर श्रेणी-अवनत होत जातो/ते. म्हणूनच ही निसर्ग-विरोधी संकल्पना(?) तात्काळ स्थानबद्ध करून तिचे यथायोग्य निरसन करणे सद्यस्थितीत अनिवार्य झालेले आहे. 
        ...आणि म्हणूनच Natural Selection (Servival of the FITTEST) हे उत्क्रांतीशास्त्राधारित निसर्गाचे कटूसत्य-नियम स्विकारणे आतातरी प्रत्येक समंजस व स्व-सक्षम, स्वाभिमानी ”वृत्ती” व “कृती” जोपासणाऱ्याला आवश्यक तथा क्रमप्राप्त झाले आहे, अन्यथा या पूर्णतः “निसर्ग-शासित” व निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या पृथ्वीवर मानवसमूहा चा निभाव हळूहळू कठीण होत जाऊन संपूर्ण मानवजातच या पृथ्वीतलावरून नष्ट होण्याची भीषण शक्यता नाकारता येत नाही, असेही माझे अल्पबुद्धि-आकलन मी येथे, साक्षेपी वाचकांच्या व विचारवंतांच्या, साधक-बाधक विचारविमर्शासाठी सविनय मांडत आहे. 
¤
(शब्दसंख्या सुमारे #1320)
¤
(***भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्य या मूलभूत अधिकाराचा मी भोक्ता असून DISSENT : THE VOICE OF PROGRESS हे माझे ब्रीदवाक्यच आहे!!!***) 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
(महाशिवरात्री/04.03.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~






Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन