Posts

विदर्भ : एक दुर्लक्षित विभाग : प्रति, लोकसत्ता

 बोरकन्हार-441902, दि.31.10.2024 =========================== प्रति,  मा.संपादक,  "लोकसत्ता", सस्नेह सादर नमस्कार.       आज दि.31ऑक्टोबर 2024 च्या 'लोकसत्ता'मधील आमचे मित्रश्रेष्ठ श्रीनिवास खांदेवाले यांचा 'विदर्भ : निवडणुकीतील एक विस्मृत प्रदेश' हा कटूतम तथ्याधारित लेख वाचला. विदर्भाकडे नैसर्गिक सौंदर्य व संपत्ती, जल संपत्ती, विविध धान्य उपजाऊ सुपीक जमीन, वनसंपत्ती, खनिजसंपत्ती, पीकपाणी यांची अक्षरशः लयलूट असूनही विदर्भ उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मागास/अप्रगत, गरीब व शेतकरी आत्महत्याग्रस्त असा बदहाल का असावा? या प्रश्नाच्या यथोचित उत्तराच्या दृष्टिकोनातून त्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असलेल्या कारणमीमांसेचे काहीसे संक्षिप्त व त्रोटक तरी स्फोटक असेच विवरण श्री.खांदेवाले यांनी या लेखात केले आहे. वस्तुतः यापेक्षा कितीतरी भयंकर व भयानक अशा, शासनप्रणित अन्यायच नव्हे तर धडधडीत अत्याचाराने सुद्धा आमचा विदर्भ पिडीत आहे. याचा जाब विचारण्यासाठी व वर नमूद विदर्भ-विकासातील अडथळ्यांचे घटक दूर करण्याच्या कामासाठी येथील जनतेने निवडून पाठविलेले लोकप्रतिनिधी, यासाठ...

जुने मिथक : नवा अन्वयार्थ (NEW)

*जुने मिथक : नवा अन्वयार्थ*  (NEW) ~~~~~~~~~~~~~~~~       महाभारतातील एका(?) मिथक(!)कथेनुसार असे सांगितले जाते की, ---      एका कोणत्यातरी यज्ञसमारंभात श्रीकृष्ण, युधिष्ठीर व दुर्योधन(सुयोधन!) एकत्र आले असता दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारले की, तो(दुर्योधन) आणि युधिष्ठीर हे दोघेही श्रीकृष्णाशी सारखेच संबंधित असतानाही श्रीकृष्णाचा कल युधिष्ठीराकडे नेहमीच झुकलेला का असतो. श्रीकृष्णाला मी(दुर्योधन) वाईट/दूरचा आणि युधिष्ठीर चांगला/जवळचा वाटतो, असा पक्षपात कां?       त्यावर दुर्योधन ला एका बाजूला नेऊन श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी चांगले, सुष्ट व्यक्ती कोणते, हे शोधून काढ! दुर्योधन निघाला शोधमोहीमेवर! सर्वत्र शोध घेऊन तो श्रीकृष्णाजवळ पोचला व सांगितले की, या यज्ञसमारंभात एकही चांगला, सुष्ट व्यक्ती त्याला आढळून आला नाही.        नंतर श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला सुद्धा बाजूला नेऊन सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी वाईट, दुष्ट व्यक्ती कोणते, ते शोधून काढ! युधिष्ठीरही निघाला शोधमोहीम...

जुने मिथक : नवा अन्वयार्थ (एक प्रार्थना!)

*जुने मिथक : नवा अन्वयार्थ* (एक प्रार्थना!) ~~~~~~~~~~~~~~~~~~      अशाच एका(?) महाभारतातील एका(?) मिथक(!)कथेनुसार असे सांगितले जाते की, ---      एका कोणत्यातरी यज्ञसमारंभात श्रीकृष्ण, युधिष्ठीर व दुर्योधन(सुयोधन!) एकत्र आले असता दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारले की, तो(दुर्योधन) आणि युधिष्ठीर हे दोघेही श्रीकृष्णाशी सारखेच संबंधित असतानाही श्रीकृष्णाचा कल युधिष्ठीराकडे नेहमीच झुकलेला का असतो. श्रीकृष्णाला मी(दुर्योधन) वाईट/दूरचा आणि युधिष्ठीर चांगला/जवळचा वाटतो, असा पक्षपात कां?       त्यावर दुर्योधन ला एका बाजूला नेऊन श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी चांगले, सुष्ट व्यक्ती कोणते, हे शोधून काढ!  दुर्योधन निघाला शोधमोहीमेवर! सर्वत्र शोध घेऊन तो श्रीकृष्णाजवळ पोचला व सांगितले की,  या यज्ञसमारंभात एकही चांगला, सुष्ट व्यक्ती त्याला आढळून आला नाही.        नंतर श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला सुद्धा बाजूला नेऊन सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी वाईट, दुष्ट व्यक्ती कोणते, ते शोधून काढ...

म.रा.सा.सं.मंडळ 2024-27 : CM/DCM/CS यांना ईमेल

ईमेल ची प्रत...... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ दि.18.10.2024 ~~~~~~~~~~~~~ प्रति, मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री (1) मा.उपमुख्यमंत्री (2) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-400032 सविनय सादर प्रणाम.        म.रा.साहित्य व संस्कृती मंडळाच्या 1960 मधील स्थापनेनंतर, सुमारे 58 वर्षानंतर, मंडळाच्या इतिहासात प्रथमच, 2018 ते 2021 करिता माझी, *झाडीपट्टीतील एखाद्या साहित्यिकाची,* मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली होती. तथापि कोरोना-कालावधीमुळे 2018 ते 2021 मधील आमच्या सदस्यत्वाचा कालावधी शून्यवत गेला.          तरी 2021-24 या कालावधीत झाडीपट्टीतील कोणालाही संधी देण्यात आली नाही.        आणि आता 2024-27 मध्ये तर हद्दच झाली. झाडीपट्टीतील व्यक्ती तर नाहीच पण राजकीय सोय म्हणून काही व्यक्तींना विधानबाह्य जागेवर/पदावर सामावून घेण्याची अचंबित घटना घडवून आणली गेली. असो. असोच.        *(झाडीपट्टी ही/हा महाराष्ट्रातील एक अविभाज्य घटक आहे!* 😅😅😅🤣 *म्हणूनच म्हणावेसे वाटते की, असा/एवढा झाडीपट्टी-द्वेष बरा नव्हे!)*...

डाॅ.गणेश देवी यांच्या संदर्भातील पत्रव्यवहार : कुमार केतकर यांना अवलोकनार्थ

अग्रिम क्षमाप्रार्थनापूर्वक।  🙏🙏🙏 •••••••••••••••••••••••••••••••••••••• दि.29.09.2024/बोरकन्हार-441902 ~~~~~~~~~~~~~~~~~~ द्वारा/मार्फत :- मा.श्री.विनोद शिरसाठ, संपादक, 'साधना' साप्ताहिक,  पुणे-411030. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~                      ||ॐ| ----------------------------------------------- प्रेषक :-  ॲड.लखनसिंह कटरे, (निवृत्त डीडीआर/यवतमाळ),  बोरकन्हार-441902,  ता.आमगांव, जि.गोंदिया. (झाडीपट्टी/पूर्व विदर्भ) ----------------------------------------------- दि.29 सप्टेंबर 2024 ----------------------------------------------- प्रति, मा.श्री.कुमार केतकर मुंबई  (साक्षेपी विचारवंत, संपादक) सस्नेह सादर नमस्कार.        दि.21 सप्टेंबर 2024 च्या 'साधना'च्या अंकात प्रकाशित आपला 'त्रिविधा : पाथब्रेकिंग कादंबरी' हा नवे पुस्तक सदरातील पुस्तक-परिचय लेख वाचला. मी आपला फॅन वाचक आहे. या लेखात प्रकट आपल्या विचारांशी मी सहमत आहे. या परिचय लेखाच्या शेवटी आपण डाॅ.गणेश देवी यांच्या बोलीभाषा वि...

कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!

*कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       कविता म्हणजे काय? हा प्रश्न अजूनही निर्विवादपणे सोडविता आलेला नाही. आणि कदाचित त्यामुळेच आज जागतिक स्तरावरही सर्वत्रच "कवीं"चा भयंकर(!) सुळसुळाट आढळून येतो. स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो..... हे आंशिक सत्य असले तरी व्हाॅट इज ओव्हरफ्लो आणि ओव्हरफ्लो ऑफ व्हाॅट, हे प्रश्न अजूनही एकवाक्यतेच्या प्रतिक्षेत तडफडतच आहेत.         मी जेव्हा "कावळा हागता, चिमणीला विटाळ..." अशा "प्रारंभा"ची एक कविता एका मान्यवर संपादकांकडे प्रकाशनार्थ पाठवतो तेव्हा मूळ ग्रामीण असलेली पण नोकरी-व्यवसायामुळे शहरी झालेली संपादकीय मानसिकता मला "आदेशात्मक सूरात" कळवते की, "हागता" हा शब्द जरा अश्लील वाटतो, तो वगळून त्याऐवजी "शिटता" हा शब्द वापरावा.        मी एक अप्रसिद्ध, पण मुळातच उजळ असलेली ग्रामीण मानसिकता जपून असलेला, खट्याळ तरी विवेकाधारित स्वभावाने भारलेला, झाडीपट्टीतील झाडप्या, व्यक्ती असल्याने, यावर मी जरा खडसावूनच लिहिले की,---  ## माझ्या बालपणी माझी आई महिन्यातील तीन-चार दिवस बाहेर बसा...

वडिलांचे नसणे : एक आकलन

*वडीलांचे नसणे : एक आकलन!* ~~~~~~~~~~~~~~~~~         दि.25 जानेवारी 2018, गुरूवारला दुपारी 01:32 वाजता माझे वडील श्री.मोहनभाऊ कटरे (1930-2018) हे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धावस्थेमुळे हे जग सोडून गेले, निसर्गशरण झाले. माझे आजोबा श्री.उकनभाऊ पाटील ऑगस्ट 1948 मध्ये, एका तत्कालीन असाध्य अशा लागट रोगाच्या साथीत, अल्पवयातच वारले. तेव्हा माझ्या वडीलांचे वय फक्त 18 वर्षाचे होते. त्या वयातही त्यांनी कुटूंबाचा व सुमारे 60 एकर शेतीचा सारा कारभार व पसारा अगदी व्यवस्थितरीत्या सांभाळला.        त्यांच्या सोबतीला त्यावेळचे आमचे आवारी श्री.शिवलाल कुंभरे हे आदिवासी गोंड समाजातील स्वामीनिष्ठ व्यक्ती होते. शिवाय रावजीबाबा आंबेडारे, मोडकूकाका चव्हाण, मंगरूबडो चव्हाण, भैय्यालालभाऊ कुंभरे, उरकुडाबाबा शरणागत, छगनमामा शरणागत, कुकसीबडो भोयर, वळगूबाबा येल्ले, बाबूलालमामा शरणागत, चुन्नीलालभाऊ सर्राटी, कारूभाऊ मेंढे, लोंढू(रूपचंद)भाऊ मेंढे, डोकूभाऊ नेवारे, गोंडूभाऊ नेवारे, फंदूभाऊ भूमके, तुकारामभाऊ भूमके, दयारामभाऊ भूमके, चिंधूभाऊ भूमके, फंदूभाऊ भूमके, मयारामबडो गौतम, डोमाकाक...