डाॅ.गणेश देवी यांच्या संदर्भातील पत्रव्यवहार : कुमार केतकर यांना अवलोकनार्थ

अग्रिम क्षमाप्रार्थनापूर्वक।  🙏🙏🙏
••••••••••••••••••••••••••••••••••••••
दि.29.09.2024/बोरकन्हार-441902
~~~~~~~~~~~~~~~~~~
द्वारा/मार्फत :-
मा.श्री.विनोद शिरसाठ,
संपादक, 'साधना' साप्ताहिक, 
पुणे-411030.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                     ||ॐ|
-----------------------------------------------
प्रेषक :- 
ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त डीडीआर/यवतमाळ), 
बोरकन्हार-441902, 
ता.आमगांव, जि.गोंदिया.
(झाडीपट्टी/पूर्व विदर्भ)
-----------------------------------------------
दि.29 सप्टेंबर 2024
-----------------------------------------------
प्रति,
मा.श्री.कुमार केतकर
मुंबई 
(साक्षेपी विचारवंत, संपादक)

सस्नेह सादर नमस्कार. 

      दि.21 सप्टेंबर 2024 च्या 'साधना'च्या अंकात प्रकाशित आपला 'त्रिविधा : पाथब्रेकिंग कादंबरी' हा नवे पुस्तक सदरातील पुस्तक-परिचय लेख वाचला. मी आपला फॅन वाचक आहे. या लेखात प्रकट आपल्या विचारांशी मी सहमत आहे. या परिचय लेखाच्या शेवटी आपण डाॅ.गणेश देवी यांच्या बोलीभाषा विषयक 'मूलभूत संशोधना(?)'बद्दल धावता उल्लेख केला आहे. 
          आपण आपल्या या सदरात्मक लेखात उल्लेखिलेल्या डाॅ.गणेश देवी यांच्या पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या संदर्भातच मी माझे एक निरीक्षण, जे आजवर अनुत्तरीत व असुधारित आहे, त्याबद्दल आपणास कळवू इच्छितो. ते असे---- 
         डाॅ.गणेश देवी यांच्या प्रमुख मालिका संपादकत्वाखाली व अरुण जाखडे यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या जागतिक स्तरावर गेलेल्या ग्रंथातील झाडीबोली आणि पोवारीबोली ह्या दोन बोलीतील नोंदी या खोट्या/फसव्या, आभासी/भ्रामक, त्रूटीपूर्ण, महत्वपूर्ण व्यक्तींच्या अनुल्लेखात्मक, स्वस्तुतिजनक तथा इतिहासाच्या एकांगी नोंदी अशा स्वरूपाच्या आहेत. शिवाय त्यात कोहळीबोली नावाच्या एका काल्पनिक बोलीचाही मुजोर अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
          यासंदर्भात मी एप्रिल-2018 पासून साधार व सक्षम पुराव्यासह डाॅ.गणेश देवी व श्री अरुण जाखडे(आता दिवंगत) यांच्यासमोर/कडे वेळोवेळी आक्षेप सादर केले असता डाॅ.गणेश देवी यांनी ईमेल द्वारे व मोबाईल वर प्रत्यक्ष बोलून वर नमूद गफलतीची दुरुस्ती करण्याचे कबूल देखील केले आहे/होते. 
          पण अजूनही त्यात कोणतीही दुरुस्ती न करता तशाच चुकीच्या व त्रूटीपूर्ण ग्रंथप्रतींची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावरही आक्षेप नोंदवूनही अजूनही चुकीची व त्रुटींची दुरुस्ती झाल्याचे दिसून येत नाही किंवा माझ्या साधार आक्षेपांची दखल घेतल्याचेही दिसून येत नाही.
        यासंबंधातील माझ्या, डाॅ.गणेश देवी यांच्यासोबत झालेल्या, ईमेल पत्रव्यवहाराच्या प्रती आपल्या अवलोकनार्थ खालीलप्रमाणे/यासोबत संलग्न करीत आहे. 
       कृपया आपण हा विषय आपल्याद्वारे हाताळून माझ्या या ऐतिहासिक स्वरूपाच्या ठरणाऱ्या महत्वपूर्ण कामात आपले अमूल्य सहकार्य प्रदान करून मला उपकृत करावे अशी आपणाला सविनय प्रार्थना आहे. 
¤आपला, एक फॅन वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे
(निवृत्त डीडीआर/यवतमाळ) 
~~~~~~~~~~~~~~~~~~
(ता.क. - पुष्कळदा माझ्यासारख्या खेड्यापाड्यात वास्तव्य करून असलेल्या व्यक्तींचे साधार व तर्कशुद्ध तथा साधक-बाधक विचार प्रकट करणाऱ्या अत्यावश्यक बाबी सुद्धा मुंबई-पुण्याकडील तथाकथित दुढ्ढाचार्य आपल्या अहंगंडाच्या कोशात लपून सहज दुर्लक्षित करतात. तसे घडू नये ही सविनय प्रार्थनापूर्वक विनंती आहे.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सोबत :- वरीलप्रमाणे ... संपूर्ण पत्रव्यवहार 

👇👇👇👇👇

To: ganesh_devy@yahoo.com
Subject: आपण मुख्य संपादक असलेल्या "भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण" या सर्वेक्षण मालिकेतील "महाराष्ट्र" या खंडासंबंधाने काही आक्षेप... 
¤
बोरकन्हार-441902,        दि.05.04.2018
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मान्यवर आदरणीय श्री.गणेश देवी जी
सविनय सादर प्रणाम.
       आपणास मराठी चे ज्ञान आहे, या समजूतीने हे पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे, त्याबद्दल क्षमस्व.
        श्री.अरुण जाखडे यांच्या संपादकत्वाखालील (आपल्या मुख्य संपादकत्वाखालील) विषयांकित "महाराष्ट्र" या भाषा सर्वेक्षणाच्या खंडात आमचे खास मित्र डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी लिहिलेल्या (4)कोहळी(पृष्ठ क्र.91), (7)झाडी(पृष्ठ क्र.130), (9)पोवारी(पृष्ठ क्र.157) या बोलींच्या नोंदी ह्या - खोट्या, फसव्या, आभासी, भ्रामक, त्रूटीपूर्ण, महत्वाच्या व्यक्तींचा अनुल्लेख असलेल्या, स्वस्तुतीसंपृक्त, अशा भयंकर दोषांनी परिपूर्ण आहेत.
        "कोहळी" या नावाची कोणतीही स्वतंत्र बोलीच अस्तित्वात नसूनही या बोलीचा समावेश, (फक्त डाॅ.बोरकर त्या समाजाचे असल्यामुळेच कदाचित,) करून या जागतिक महत्वाच्या संदर्भ ग्रंथात भयंकर अशी चूक करण्यात आली आहे. ही बाब "कोहळी" व "झाडी" या दोन्ही बोलींसाठी दिलेल्या 'वद्राचा देव खाल्या आला' या एकाच कथेच्या उदाहरणावरून व दिलेल्या शब्दांच्या वरवरच्याही अवलोकनावरून स्वयंस्पष्ट होते.(कृपया त्या नोंदींचे अवलोकन करावे) तरी आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या प्रसिद्ध व मान्यवर नावाचा गैरफायदा घेऊन ही महाभयंकर चूक आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
         तसेच "झाडी" बोलीच्या नोंदीत डाॅ.बोरकर यांनी स्वतःच्याच नावाची अकरा वेळा नोंद घेऊन आपलीच कविता व कथा सुद्धा नोंदविली आहे. आणि इतर "झाडी" बोली साहित्यिकांची व मुख्य अशा काही आद्य-प्रवर्तकांची नांवे जाणीवपूर्वक (कदाचित द्वेषबुद्धीने वा न्यूनगंडाने ग्रसित होऊन) वगळली आहेत. शिवाय घेतलेल्या बहुतेक नोंदी भ्रामक असल्याने असत्यालाच सत्य समजण्याची चूक होऊ शकते. त्यामुळे या जागतिक महत्वाच्या संदर्भ ग्रंथातून आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या नावाने चुकीचा संदेश व माहिती पोचत आहे, असे मला नम्रपणे कळवावेसे वाटते.
          त्याचप्रमाणे "पोवारी" बोलीवर लिहिण्यासाठी पोवार समाजातील एकसे बढ़कर एक विद्वान उपलब्ध असूनही डाॅ.बोरकर यांनी बळजबरीनेच "पोवारी" बोलीवर स्वतःच लिहिण्याची पूर्णतः अनधिकार व अनधिकृत कृती केली आहे. त्यामुळे "पोवारी" बोलीच्या खरीखुरी व संपूर्ण माहितीची व इतिहासाची नोंद न होता काही ऐकीव, भ्रामक, चूकीच्या, फसव्या नोंदी घेण्यात आल्याचे दिसून येते/स्पष्ट होते. त्यामुळे "पोवारी" बोलीवर अन्याय झाला असून या बोलीबाबत चुकीचा संदेश व माहिती प्रसृत झाली आहे. अशा जागतिक महत्वाच्या संदर्भ ग्रंथातून आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या नावाखाली "या अशा"(?) नोंदी खपविण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. 
          कृपया सबब सविनय प्रार्थना आहे की, आपण स्वतः किंवा अन्य सक्षम, पूर्वग्रहमुक्त, निष्पक्ष, साक्षेपी विद्वान व्यक्तींद्वारे माझ्या या विनंती पत्रातील सर्व आक्षेपांची, अविवेकी नोंदींची तपासणी करून त्यात यथाशीघ्र यथावश्यक दुरूस्ती करण्याची व्यवस्था करावी ही सविनय विनंती.
      आपल्या शीघ्र प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,
    आपला एक नम्र वाचक,
    @लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
इमेल:- lskatre55@gmail.com
टीप:- मला हा ग्रंथ बडोदा येथील अ.भा.साहित्य संमेलनात खरेदीची संधी मिळाल्याने मला या ग्रंथातील आक्षेपार्ह नोंदीबाबत कळविण्यात विलंब होत आहे, त्याबद्दल क्षमस्व.
¤
(माझ्या या आक्षेपाचे निराकरण झाल्याचे अजून आढळून येत/आले नाही.२६.०६.२०२३)
~~~~~~~~~~~~~~~~~~
यासंदर्भातील संपूर्ण पत्रव्यवहार खालीलप्रमाणे आपल्या अवलोकनार्थ व अभिप्रायार्थ पाठवीत आहे.

👇


From: lskatre55 <lskatre55@gmail.com> 

Date: 12/11/2021 14:00 (GMT+05:30) 

To: Ganesh_devy@yahoo.com 

Subject: FW: "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या खंडातील/ग्रंथातील झाडीबोली, कोहळी बोली आणि पोवारी बोली मधील भ्रामकादि* नोंदी दुरूस्त करण्यासाठी प्रार्थना-वजा-नोटीस....... (स्मरण-विनंती) 

प्रेषक : 
ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया
(विदर्भ-महाराष्ट्र), दि.11 नोव्हेंबर 2021
चलभाष : 8208557164
व्हाॅट्सॲप : 9665041483
ईमेल : lskatre55@gmail.com 
-----------------------------------------------------

प्रति,

डाॅ.गणेश देवी 

मुख्य संपादक,

भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र 

सप्रेम सादर नमस्कार,

>> सोबत सुलभ संदर्भासाठी संलग्न केलेल्या नोटीस/संपूर्ण पत्रव्यवहाराचे अवलोकन करावे ही विनंती.

>> अजून तरी त्यावर आपण कोणतीही सुधारात्मक कार्यवाही केल्याचे/झाल्याचे मला कळविण्यात आलेले नाही किंवा मला तसे कुठे अन्यत्रही आढळून आलेले नाही.

>> तरी कृपया या संदर्भात अद्ययावत प्रगतीबरोबरच आपण केलेल्या व/वा करीत असलेल्या सुधारात्मक व/वा अन्यथा कार्यवाहीबाबत मला पंधरा दिवसाचे आंत अवश्य कळविण्याची कृपा करावी ही विनंती.

>> अन्यथा पंधरा दिवसांनंतर मला यथोचित व यथाविहित अशी पुढील कारवाई/कार्यवाही करणे भाग पडेल व त्याला आपणच सर्वस्वी जबाबदार राहाल करिता सविनय कळविण्यात येत आहे.

>> कळावे, कळवावे ही पुनश्च सविनय विनंती. 

¤आपला 
स्वा----
@ॲड.लखनसिंह कटरे.
(11.11.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

------- Original message --------

From: lskatre55 <lskatre55@gmail.com> 

Date: 22/05/2020 12:55 (GMT+05:30) 

To: Ganesh_devy@yahoo.com 

Subject: "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या खंडातील/ग्रंथातील झाडीबोली, कोहळी बोली आणि पोवारी बोली मधील भ्रामकादि* नोंदी दुरूस्त करण्यासाठी प्रार्थना-वजा-नोटीस....... (स्मरण-विनंती) 

प्रेषक :-
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया 
(झाडीपट्टी-विदर्भ-महाराष्ट्र)
दि.22.05.2020
(चलभाष :- +91 7066968350)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रति,
आदरणीय डाॅ.श्री.गणेश देवी, 
सविनय सादर प्रणाम. 

>> माझ्या काल दि.21.05.2020 च्या ईमेल पत्राच्या प्राप्तीनंतर आपण तात्काळ त्याची दखल घेतली याबद्दल मी आपला आभारी आहे. 

>> आपण कालच मोबाईल फोन करून माझ्या चिंतेबद्दल व आक्षेप-वजा-विनंतीबद्दल सुमारे पंधरा मिनीटे सकारात्मक चर्चा केली आणि लवकरच माझ्या विनंतीनुसार सुधारात्मक कार्यवाही करण्याची व तशी सुधारित आवृत्ती (भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र या ग्रंथाची) काढण्याबाबत मला आश्वस्त केलात. त्याबद्दल मी पुनश्च आपल्या प्रति आभार व्यक्त करतो. धन्यवाद! 

>> कृपया आपल्यातील वरीलप्रमाणे झालेल्या चर्चेचा तपशील; त्या ग्रंथाचे संपादक व प्रकाशक श्री.अरुण जाखडे यांना अवश्य कळवून त्यासाठी त्यांना यथाशीघ्र कार्यप्रवृत्त होण्यासाठी यथावश्यक निर्देश सुद्धा द्यावेत, अशी आपल्याला प्रार्थना आहे. 

>> तसदी बद्दल क्षमस्व. 
🙏🙏🙏
¤आपला नम्र (आपला एक प्रशंसक)
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, 
(दि.22.05.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सोबत :- सुलभ संदर्भासाठी माझ्या आजवरच्या पत्रव्यवहाराच्या सत्यप्रती
~~~~~~~~~~~~
👇
-----------

प्रेषक:- 
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया,
(झाडीपट्टी-विदर्भ-महाराष्ट्र),
दि.21 मे 2020,
चलभाष :- +91 7066968350.
-----------------------------------------------
प्रति,
आदरणीय डाॅ.श्री.गणेश देवी सर 
सविनय सादर प्रणाम. 

विषय :- "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या खंडातील झाडीबोली, कोहळी बोली व पोवारी बोली यांच्या नोंदीतील काही भ्रामकादि* नोंदींबद्दल साधार आक्षेप-वजा-विनंती चे तात्काळ निराकरण करण्यासाठी शेवटचे स्मरण-विनंती/प्रार्थना पत्र.....

संदर्भ :- माझा या विषयावरील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला सततचा सविनय पाठपुरावा.....

आदरणीय महोदय 

>> विषयाचे व संदर्भीय आक्षेप-वजा-विनंती/प्रार्थना पत्रांचे अवलोकन करावे ही विनंती.

>> सुलभ संदर्भासाठी आजवरचा (माझा व आपला या विषयावरील) पत्रव्यवहार यासोबत जोडत/जोडला आहे.

>> माझ्या विषयांकित आक्षेप-वजा-विनंती/प्रार्थने संबंधाने आपण कबूल करूनही त्यावर कोणतीच सकारात्मक कार्यवाही झाल्याचे दिसत नाही किंवा आपल्याकडून तसे काहीच अजूनही कळविण्यात आलेले नाही. 

>> सबब या शेवटच्या विनंती/प्रार्थना/नोटीस द्वारे आपणास अत्यंत नम्रपणे सविनय कळविण्यात येत आहे की, कृपया एकतर माझे विषयांकित संदर्भीय पत्रांतील आक्षेप साधार फेटाळून/खोडून लावावेत किंवा माझ्या आक्षेपानुसार "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या ग्रंथातील झाडीबोली, कोहळी बोली व पोवारी बोलींच्या भ्रामकादि* नोंदी सुधारून यथायोग्य व तथ्यपूरक नोंद/नोंदी घेण्याबाबत तात्काळ सुधारात्मक कार्यवाही करण्याची कृपा करावी ही विनंती. 

>> वरील परिच्छेदात विनंती केल्यानुसार संबंधितांना यथावश्यक पूर्ततेसाठी निर्देश द्यावेत अशी प्रार्थना आहे. 

>> माझ्या या शेवटच्या विनंती/प्रार्थना पत्राला आपल्याकडून सकारात्मक किंवा कोणतेही उत्तर/प्रतिसाद कमाल 30 दिवसात न मिळाल्यास मला नाईलाजाने व आपल्यावरील माझ्या आदरपूर्वक श्रद्धेला मोठ्या हिंमतीने बाजूला ठेवून यथावश्यक व यथाविहीत फौजदारी व तदनुषंगाने यथावश्यक न्यायालयीन कार्यवाही/करणे भाग पडेल, करिता मोठे धाडस करून व लहान तोंडी मोठा घेण्याची धृष्टता करून सविनय कळवीत आहे. क्षमस्व. 🙏🙏🙏

>> माझ्या या धृष्टतेबद्दल कृपया मला क्षमा करावी अशी सविनय प्रार्थना आहे. 

🙏🙏🙏

¤आपला नम्र (आपला एक प्रशंसक)
@ॲड.लखनसिंह कटरे. 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(21 मे 2020)
(*भ्रामकादि =  माझ्या मूळ पत्रातील सारे आक्षेप(?) पहावेत ही विनंती. 🙏🙏🙏)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सोबत :- सुलभ संदर्भासाठी, वरीलप्रमाणे संपूर्ण पत्रव्यवहार 
👇👇

बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया, दि.14.01.2020
~~~~~~~~~~~~~~~~ 
आदरणीय डाॅ.श्री.गणेश देवी जी
सविनय सादर प्रणाम. 

     मी मागेच आपल्याला सविनय कळविले आहे की "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र खंड" या आपल्या मुख्य संपादकत्वाखाली प्रकाशित झालेल्या महाग्रंथात कोहळी बोली, झाडीबोली आणि पोवारी बोली च्या नोंदी घेताना त्यात काही भयंकर चूका/त्रूट्या झाल्या/राहिल्या आहेत. त्यावर आपण सुधारात्मक कार्यवाही संबंधाने मला संक्षिप्तपणे कळविले सुद्धा होते/आहे.

     तथापि मी परवा दि.11, 12... जानेवारी 2020 ला उस्मानाबाद येथे भरलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथविक्री दालनात पाहिले की, पद्मगंधा प्रकाशनाच्या स्टाॅलवर हा महाग्रंथ कोणत्याही दुरूस्ती/सुधाराशिवाय त्या पूर्वनिर्देशित चुका/त्रूट्यांसह विकला जातोय. यावरून वर नमूद तिन्ही बोली/भाषांची चूकीची/भ्रामक माहिती जाणीवपूर्वक प्रसृत करणे सुरूच असून संबंधित अभ्यासकांना त्याद्वारे भ्रमित केले जात आहे, असे स्पष्ट होते.

आणि हे सर्व आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या नावाखाली सर्रास सुरू असल्याने आपली बदनामी केली जात आहे, असेही माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे.

    तरी यासंदर्भात आपण स्वतः जातीने व तातडीने लक्ष घालावे व यथावश्यक ती सुधारणा यथाशीघ्र करण्यासाठी यथाविहित कार्यवाही हाती घ्यावी किंवा संबंधितांना सुचना-वजा-आदेश प्रसृत करावेत, आणि वर नमूद केल्याप्रमाणे झालेला/होत असलेला भाषिक-अन्याय निरस्त करावा, अशी आपल्याला सविनय प्रार्थना करीत आहे. 🙏🙏🙏 

□तसदीबद्दल शतवार क्षमाप्रार्थी आहे. 🙏🙏🙏
□आपला एक प्रशंसक वाचक 
@लखनसिंह कटरे 
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~~~~~~~~~~~  
ता.क.
□आजवर आपल्यासोबत व अन्य संबंधितांसोबत झालेल्या मुख्य पत्रव्यवहाराचे संकलन यासोबत पुनश्च पाठवीत आहे. कृपया फुरसतीने साद्यंत वाचावे ही सविनय प्रार्थना आहे. 🙏🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~

  
सोबत :- वरीलप्रमाणे. 
👇👇

दि.12.01.2020
~~~~~~~~~~~
आदरणीय डाॅ.श्री.गणेश देवी 
सविनय सादर प्रणाम. 🙏🙏🙏

Forwarded 
For INFORMATION &
Necessary Action, if any.
YOURS faithfully, 🙏🙏🙏
@Lakhansingh Katre 
Borkanhar-441902, Tq.AMGAON, Dt.Gondia. 
(VIDARBHA-Maharashtra)
//+91 7066968350//
(lskatre55@gmail.com)
~~~~~~~~~~~~~~~~~~


हल्ली मुक्काम-वाकड, पुणे-411057, दि.12.01.2020
~~~~~~~~~~~~~~~~~  ~~~~~~ 

आदरणीय श्री.गिरीशजी कुबेर 
संपादक, लोकसत्ता 
मुंबई. 
सविनय सादर प्रणाम. 

     काल दि.11.01.2020 च्या अंकातील डाॅ.श्री.गणेश देवी यांच्या औरंगाबाद येथील व्याख्यानाचे वृत्त (जगातील चार हजार भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर) व त्याच्याच खाली आपल्या मताचे वृत्त (व्यवस्थेला प्रश्न विचारण्याऐवजी माध्यमांचे मनोरंजनीकरण) वाचून मी हे पत्र लिहिण्याचे धाडस (अव्यापारेषु व्यापार किंवा लहान तोंडी मोठा घास घेणारे धाडस) करीत आहे. तथा आपण व्यक्त केलेल्या मतानुसार (माध्यमांना सत्य मांडायचे असेल, तर 'निःपक्ष' हा 'गुण' बाजूला ठेवावा लागणार आहे. दोन्ही बाजू देणे ही पत्रकारिता नव्हे. तर पत्रकारानेही स्वतः पाहून नोंदवलेले मत देणे ही पत्रकारिता आहे. अध्यात ना मध्यात, यापुढील विचार माध्यमांना करावा लागेल. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील ढवळलेपणाचे उद्योग माध्यमांनी करायला हवेत, ....) मोठ्या हिंमतीने हे पत्र लिहिण्याचे धाडस करीत असल्याने, यात काही अन्यथा आढळून आल्यास मी प्रारंभीच क्षमा मागतोय. 🙏🙏🙏

       डाॅ.श्री.गणेश देवी यांच्या मार्गदर्शन व मुख्य संपादकत्वाखाली व पद्मगंधा प्रकाशनाचे श्री.अरुण जाखडे यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेल्या "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण" या महाग्रंथात (कदाचित अनवधानाने) झालेल्या काही भयंकर चूका (झाडीबोली, पोवारी बोली व कोहळी बोली च्या संदर्भात) मी डाॅ.देवींच्या निदर्शनास आणून देऊन व त्यांनी त्यानुसार सुधारणा करण्याचे लेखी कबूल करूनही अजूनही तो महाग्रंथ त्याच चूकांसहित विक्री केला जात असल्याचे कालच्या उस्मानाबाद येथील पद्मगंधा प्रकाशनाच्या स्टाॅलवर पाहून मला डाॅ.देवींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या वृत्ती/मानसावरच शंका येऊ लागली आहे. (या धृष्टतेबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे!🙏🙏🙏)

    वस्तुतः "कोहळी बोली" नावाची कोणतीही वेगळी बोली अस्तित्वातच नसून झाडीपट्टीतील कोहळी या जातीतील व्यक्ती जी झाडीबोली बोलतात, तीच ती बोली आहे. आणि याचा पुरावा त्या महाग्रंथातच उपलब्ध आहे. तो म्हणजे, त्या महाग्रंथात झाडीबोली आणि ती तथाकथित कोहळी बोली यांच्या उदाहरणार्थ दिलेली कथा "एक"च/तीच आहे. असे असूनही त्या महाग्रंथात कोहळी बोली नावाच्या काल्पनिक बोलीचा अंतर्भाव करून नष्ट होणा-या बोलींची संख्या (Quantity) कृत्रिमरीत्या कमी करण्याचा व काल्पनिक बोली दाखवून अस्तित्वातील बोलींची संख्या (Quantity) कृत्रिमरीत्या वाढविण्याचा हा आदरणीय डाॅ.देवी आणि श्री.जाखडेजी यांचा अयशस्वी प्रयत्न असावा की काय, अशी मला शंका घ्यावीशी वाटते. (पुनश्च क्षमस्व.🙏🙏🙏)

    त्याचप्रमाणे त्याच महाग्रंथातील झाडीबोली आणि पोवारी बोलीतील बहुतेक नोंदी या फसव्या/भ्रामक, आभासी, त्रूटीपूर्ण, इतिहासाच्या एकांगी नोंद असलेल्या, इतिहासाचे विकृतीकरण असलेल्या, महत्वाच्या व्यक्ती व घटनांची जाणीवपूर्वक अवहेलना करणा-या, नोंदकर्त्याची स्वस्तुतीजनक, अशा असल्याचे मी डाॅ.देवी व श्री.जाखडेजी यांना वारंवार साधार कळविले असूनही त्यात अजूनही कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने बोली-अभ्यास, बोली नष्ट न होण्यासाठीची कृतीशीलता, या संदर्भात डाॅ.देवी हे खरोखरच गंभीर आहेत किंवा कसे, अशी भलतीच शंका मला भेडसावू लागते. (पुनश्च क्षमस्व.🙏🙏🙏)

    हे सर्व आपल्याला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे आपले वर नमूद वक्तव्यच ठरले आहे. आपले ते वक्तव्य आपण खरोखरच गांभीर्यपूर्वक केले आहे, अशी माझी खात्री असल्यानेच भी हे लेखन-धाडस करू धजलो आहे. एक दोन दिवसातच मला सत्य व वस्तुस्थितीची जाणीव होणारच व माझ्या या धाडसाचे सु/दुष्परिणामांचे भवितव्यही कळणारच, तोवर सविनय सादर प्रणाम! 
पुनश्च, 
या धाडसाबद्दल शतवार क्षमाप्रार्थी आहे. 🙏🙏🙏

□आपला एक प्रशंसक वाचक 
@लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र) //
+91 7066968350//
~~~~~~~~~~~~~~~~~  
सोबत :- 
वरीलप्रमाणे पत्रव्यवहाराचे संकलन.
~~~~~~~~~~~~~~~~~~ 
ता.क.
काहीही झाले/असले तरी आदरणीय डाॅ.श्री.गणेश देवी हे माझ्यासाठी आदरणीय, महनीय व्यक्तीच असतील/राहतील, याची कृपया खात्री बाळगावी ही सविनय प्रार्थना आहे. 🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~

  

From: lskatre55 <lskatre55@gmail.com>
Date: Fri, 21 Jun 2019, 10:33
Subject: पद्मश्री डाॅ.गणेश देवी आणि त्यांच्या महत्वपूर्ण नावाचा गैरवापर आणि दुरुपयोग...
To: <weeklysadhana@gmail.com>

बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,     दि.21.06.2019
~~~~~~~~~~~~~~~~~~ 
श्री.विनोद शिरसाठ 
संपादक, "साधना" साप्ताहिक 
पुणे-411030
सप्रेम सादर नमस्कार. 

     "साधना" चा 22 जून चा अंक नेहमीपेक्षा दोन दिवस विलंबाने मिळाला. (पोस्ट/टपाल खात्याची कृपा !) त्या अंकात प्रकाशित "विशेष वार्ता'' माझ्या सारख्या गणेश देवी यांच्या प्रशंसकांसाठी खूप खूप अभिमानाची व आनंदाची वार्ता घेऊन आली. तशी ही वार्ता फेसबुक वर सुद्धा झळकली होतीच. 

     या वार्ता मधील एका वाक्यावर मला माझा आक्षेप नोंदवावयाचा आहे. ते वाक्य म्हणजे, "देशातील ७५० भाषांची नोंद करण्याचे संशोधना चे ऐतिहासिक काम त्यांनी ३००० सहकारी अभ्यासकांच्या साथीने तीन वर्षात पूर्ण केले." या वाक्यातील "संशोधन " या शब्द-संकल्पनेवर माझा आक्षेप आहे. कारण "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" ह्या 

डाॅ.गणेश देवी हे मुख्य संपादक व खंड संपादक अरुण जाखडे असलेल्या खंडात अगदी स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, "ब्रिटिश काळात ग्रिअर्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणाची ही नक्कल नाही. त्याचे पुनरसादरीकरण नाही किंवा ग्रिअर्सन ह्यांच्या सर्वेक्षणाला हा नवा पर्याय नाही. तो आजच्या स्थितीतील भारताच्या भाषिक वास्तवाची व सामाजिक, सांस्कृतिक बदलाची नोंद घेणारा आहे. तो त्या-त्या भाषांचा अतिशय संशोधनात्मक अभ्यास वा सर्वेक्षण नाही."  

     शिवाय "अभिनव मराठी-मराठी शब्दकोश" या व्हीनस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व द.ह.अग्निहोत्री यांनी संपादित केलेल्या शब्दकोशाच्या भाग पाचवा, पृष्ठ 149 वर नमूद "संशोधन  = 1.नवीन शोध लावण्याची क्रिया, 2.शुद्धी; तपासणी;चौकशी , 3.दुरुस्तीची सूचना " या शब्दार्थानुसार सुद्धा संशोधन ही संकल्पना अर्थसूचित होते. म्हणजेच सारांशाने असे स्पष्ट होते की, "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण" हे प्रचंड मेहनतीचे काम सर्वेक्षणाचे असले तरी संशोधना चे मात्र नाही. 

      अशा या ऐतिहासिक दस्तावेज असलेल्या महाग्रंथाच्या प्रस्तावनेत आदरणीय डाॅ. गणेश देवी यांनी शेवटच्या परिच्छेदात असे म्हटले आहे की, "...पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या कामात भारतातल्या अत्युत्तम भाषातज्ज्ञांनीही सहभाग घेतला असला, मार्गदर्शन केलेलं असलं तरी, हा सर्व्हे हा फक्त भाषातज्ज्ञांचा नाही हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या सर्व्हेच्या ग्रंथमालिकेचा मुख्य संपादक म्हणून मला असं वाटतं की २०११--१२ या वर्षातले भारतीय भाषांचे यथार्थ छायाचित्र म्हणून देश या सर्व्हेचं प्रेमाने स्वागत करेल; आणि ही छबी दाखविण्यासाठी काम केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांबद्दल ऋण व्यक्त करेल. ..." असे असूनही या महाराष्ट्र खंडातील 

माझ्या अभ्यासाच्या व ओळखीच्या असलेल्या कोहळी, झाडी आणि पोवारी  (या अनुक्रमे क्रमांक ४, ७, व ९ वरील) 

बोलींच्या नोंदी घेताना त्यात भ्रामक, त्रूटीपूर्ण, खोट्या/फसव्या, महत्त्वाच्या व्यक्तींच्या अनुल्लेखाने संपृक्त, इतिहासाच्या एकांगी नोंदीचा भरणा असलेल्या, इतिहासाचे विकृत/भ्रमित आकलन सांगणा-या, यथार्थ छायाचित्र नसलेल्या बाबींचा भरणा करून पद्मश्री डाॅ. गणेश देवी ह्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या आदरणीय व ऋषीतुल्य व्यक्तीच्या नावाचा भयंकर चूकीचा गैरवापर व दुुुुरुपयोग करून त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेच्या भूमिकेत नमूद केलेल्या विश्वासाचा भयंकर विश्वासघात करण्यात आलेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. 

     या संदर्भात मी आदरणीय डाॅ. गणेश देवी यांना गेल्या एप्रिल-2018 मध्ये व त्यानंतर सप्टेंबर-2018 तथा जानेवारी-2019 मध्ये इमेल द्वारे कळविले असून आदरणीय डाॅ. गणेश देवी यांनी पुढच्या आवृत्तीमध्ये "हे दोष" दूर करण्यात येणार असल्याचे कळविलेले आहे. तथापि सदरील आवृत्ती व तिचा इंग्रजी अनुवाद जगभर गेल्याने या तीन बोलींबद्दल अभ्यासकांची भयंकर दिशाभूल होण्याची व पर्यायाने चूकीचे निष्कर्ष काढले जाण्याची शक्यता लक्षात घेता या आवृत्तीसोबतच एक ADDENDUM प्रकाशित करण्याची मी त्यांना विनंती केली असून माझी ती विनंती त्यांच्याकडे प्रलंबित आहे. (कारण पुढील आवृत्ती केव्हा निघेल याची कोणतीच शाश्वती नाही.)

□आपला एक वर्गणीदार वाचक
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902.
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
चलभाष:-7066968350/ 
WA no.9665041483
~~~~~~~~~~~~~~~~~
      □या संदर्भात आदरणीय डाॅ.गणेश देवी यांच्या सोबत झालेल्या इमेलवरील पत्रव्यवहाराचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
👇

 ■ 01) //05.04.2018//
Subject: आपण मुख्य संपादक असलेल्या "भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण" या सर्वेक्षण मालिकेतील "महाराष्ट्र" या खंडासंबंधाने काही आक्षेप...

बोरकन्हार-441902,        दि.05.04.2018
~~~~~~~~~~~~~~~~~~~
मान्यवर आदरणीय श्री.गणेश देवी जी
सविनय सादर प्रणाम.

       आपणास मराठी चे ज्ञान आहे, या समजूतीने हे पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे, त्याबद्दल क्षमस्व.

        श्री.अरुण जाखडे यांच्या संपादकत्वाखालील (आपल्या मुख्य संपादकत्वाखालील) विषयांकित "महाराष्ट्र" या खंडात आमचे खास मित्र डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी लिहिलेल्या 4)कोहळी(पृष्ठ क्र.91), 

7)झाडी(पृष्ठ क्र.130),
9)पोवारी(पृष्ठ क्र.157) या बोलींच्या नोंदी ह्या - खोट्या, फसव्या, आभासी, भ्रामक, त्रूटीपूर्ण, महत्वाच्या व्यक्तींचा अनुल्लेख, स्वस्तुतीसंपृक्त, अशा दोषांनी परिपूर्ण आहेत.

        "कोहळी" या नावाची कोणतीही स्वतंत्र बोलीच अस्तित्वात नसूनही या बोलीचा समावेश, फक्त डाॅ.बोरकर त्या समाजाचे असल्यामुळेच कदाचित, करून या जागतिक महत्वाच्या संदर्भ ग्रंथात भयंकर चूक करण्यात आली आहे. ही बाब "कोहळी" व "झाडी" या दोन्ही बोलींसाठी दिलेल्या 'वद्राचा देव खाल्या आला' या एकाच कथेच्या उदाहरणावरून व दिलेल्या शब्दांच्या वरवरच्याही अवलोकनावरून स्वयंस्पष्ट होते. तरी आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या प्रसिद्ध व मान्यवर नावाचा गैरफायदा घेऊन ही महाभयंकर चूक आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

         तसेच "झाडी" बोलीच्या नोंदीत डाॅ.बोरकर यांनी स्वतःच्याच नावाची अकरा वेळा नोंद घेऊन आपलीच कविता व कथा सुद्धा नोंदविली आहे. आणि इतर "झाडी" बोली साहित्यिकांची व आद्य-प्रवर्तकांची नांवे जाणीवपूर्वक (कदाचित द्वेषबुद्धीने वा न्यूनगंडाने ग्रसित होऊन) वगळली आहेत. शिवाय घेतलेल्या बहुतेक नोंदी भ्रामक असल्याने असत्यालाच सत्य समजण्याची चूक होऊ शकते. त्यामुळे या जागतिक महत्वाच्या संदर्भ ग्रंथातून आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या नावाने चुकीचा संदेश पोचत आहे, असे मला नम्रपणे कळवावेसे वाटते.

          त्याचप्रमाणे "पोवारी" बोलीवर लिहिण्यासाठी पोवार समाजातील एकसे बढ़कर एक विद्वान उपलब्ध असूनही डाॅ.बोरकर यांनी बळजबरीनेच "पोवारी" बोलीवर स्वतःच लिहिण्याची पूर्णतः अनधिकार व अनधिकृत कृती केली आहे. त्यामुळे "पोवारी" बोलीच्या खरीखुरी व संपूर्ण माहितीची व इतिहासाची नोंद न होता काही ऐकीव, भ्रामक, चूकीच्या, फसव्या नोंदी घेण्यात आल्याचे दिसून येते/स्पष्ट होते. अशा जागतिक महत्वाच्या संदर्भ ग्रंथातून आपल्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या नावाखाली "या अशा"(?) नोंदी खपविण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. 

          कृपया सबब सविनय प्रार्थना आहे की, आपण स्वतः किंवा अन्य सक्षम, पूर्वग्रहमुक्त, निष्पक्ष, साक्षेपी विद्वान व्यक्तींद्वारे माझ्या या विनंती पत्रातील सर्व आक्षेपांची, अविवेकी नोंदींची तपासणी करून त्यात यथाशीघ्र यथावश्यक दुरूस्ती करण्याची व्यवस्था करावी ही सविनय विनंती.

      आपल्या शीघ्र प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,

आपला एक नम्र वाचक,
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
इमेल:- lskatre55@gmail.com

टीप:- मला हा ग्रंथ बडोदा येथील अ.भा.साहित्य संमेलनात खरेदीची संधी मिळाल्याने मला या ग्रंथातील आक्षेपार्ह नोंदीबाबत कळविण्यात विलंब होत आहे, त्याबद्दल क्षमस्व.
~~~~~~~~~~~~~~~~~~ 
👇

Dear Shri Katre,

I appreciate your writing to me. Your suggestions and observations will be fully taken into consideration when we reprint the volume.

You may have noticed that we have made an appeal to readers for pointing out any errors they find in the volume. 

All of those suggestions will be under our active consideration.

If you ever visit Pune, do please personally meet Shri Arun Jakhade to discuss the suggestions.

Regards,
G N Devy

~~~~~~~~~~~~~~
👇

Hounarable Shri.Ganesh Devy Sir

 Sadar Pranam!

        Very very thanks sir, for your early kind reply. 

        But sir, my objections regarding KOHALI, ZADI & POWARI Bolies are not only about any erroneous नोंदी, my objections are regarding wilful misdeeds, wrong & द्वेषमुलक/असत्यमूलक नोंदी & also very casual approach in this valuable & historical work associated with your prestigious name! I firmly objected regarding obvious mischievous नोंदी by our good friend Dr.Harishchandra Borkar, under your esteemed name. 

          So I request you plz rectify it by an early addendum to this Maharashtra खंड & then include the correct नोंदी in reprint खंड, if/when time comes.
With respect & regards,
@Lakhansingh Katre
BORKANHAR-441902,
Dt.06th Apr. 2018
~~~~~~~~~~~~~~~~~  

■02) //26.09.2018//  
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,     दि.26.09.2018
~~~~~~~~~~~~~~~~~~ 
आदरणीय श्री.गणेश देवी जी
सविनय सादर प्रणाम.

       आपल्या विविधतेने नटलेल्या भारतात पहिल्यांदाच PEN INTERNATIONAL चे अधिवेशन भरविण्यात आपली महत्वाची भूमिका आम्हा आपल्या सर्व प्रशंसकांना खूप खूप सुखावून गेली. आपले शतशः आभार.

     या अधिवेशनाचे ब्रीदवाक्य "सत्य, स्वातंत्र्य, विविधता" (TRUTH, FREEDOM, DIVERSITY) हे इतके चपखल आहे की, माझ्यासारख्या गांधी-विचार अभ्यासकाला ते अभिमानास्पदच वाटते. शिवाय पुणे, आगाखान पॅलेस, कस्तुरबा, गांधीजी, वारी, यांचे एक अभिनव समन्वय, आपणच प्रत्यक्षात आणू शकलात. खूप खूप धन्यवाद, सर.

    माझ्या प्रकृतीच्या काही अडचणींमुळे मी या अधिवेशनाचा प्रेक्षक होऊ शकलो नाही, याचे दुःख आहे. पेनच्या 87 केंद्रातील आणि 60 हून अधिक देशातील लेखक पुण्यात एकत्र येत/आले आहेत, ही एक ऐतिहासिक घटना आहे. आणि या घटनेचे शिल्पकार आपण आहात, हे आम्हाला भूषणावह वाटते.  

      याच अनुषंगाने माझ्या परवा दि.23.09.2018 च्या पत्राकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. त्यानुसार लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या आपल्या ऐतिहासिक महत्वाच्या प्रकल्पांतर्गत प्रकाशित "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या ग्रंथातील, मी यापूर्वीच आपल्या नजरेस आणून दिलेल्या, झाडीबोली, कोहळीबोली आणि पोवारीबोलींच्या प्रकरणातील फसव्या, भ्रामक, आभासी, त्रूटीपूर्ण, सत्यापलाप जनक, अनुल्लेखात्मक, इतिहासाच्या एकांगी नोंदींच्या दुरूस्तीसंबंधाने आपण जातीने लक्ष घालावे अशी नम्र प्रार्थना करीत आहे. 

      पुनश्च आपणाला खूप खूप धन्यवाद आणि या पेन इंटरनॅशनल च्या ऐतिहासिक भारतीय अधिवेशनासंबंधाने शतशः प्रणाम.
आपला नम्र (आपला एक प्रशंसक, वाचक)
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र) 
~~~~~~~~~~~~~~~~~~

■ 03)   //27.01.2019//
From: Ganesh_devy <ganesh_devy@yahoo.com>

Date: Sun, 27 Jan 2019, 15:46
Subject: Re: "झाडीबोली" संदर्भात सुधारित टिपण-लेख (सुमारे 15-16 पृष्ठे) लिहिण्यासाठी व "पोवारी बोली"विषयक टिपण-लेख मागे घेण्यासाठी विनंती...
To: <arunjakhade@padmagandha.com>, lakhansingh katre <lskatre55@gmail.com>


Dear Lakhansinh ji,

Thanks for your mail.
I have noted the contents.

Regards,
G N Devy

On Sunday, 27 January, 2019, 3:03:53 PM IST, lakhansingh katre <lskatre55@gmail.com> wrote: 

~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

👇  
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,       दि.27.01.2019
~~~~~~~~~~~~~~~~~  
प्रति,
आदरणीय डाॅ.श्री.गणेश देवी जी
तथा
श्री.अरुण जाखडे जी
सविनय सप्रेम सादर नमस्कार.

     "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र" या आपल्या द्वारे संपादित व प्रकाशित महाग्रंथातील झाडीबोली व पोवारी बोलीच्या टिपण-लेखात डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी जाणीवपूर्वक केलेल्या गंभीर व इतिहासाची तोडफोड करणा-या चुका व दोष दुरूस्ती बद्दल मी मागेच आपल्याला सविनय कळविले आहे.

      त्यावर आपण दोघाही मान्यवरांनी या ग्रंथाच्या पुढील आवृत्तीत हे दोष व ह्या चुका दुरूस्त करण्याबद्दल कळविलेले आहे. त्या अनुषंगाने मी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांना "झाडीबोली" वरील बिनचुक, योग्य व न्याय्य असा सुधारित टिपण-लेख लिहून पुढील आवृत्तीसाठी आपल्याकडे पाठविण्याची विनंती केली आहे. (सोबतच्या इमेल चे अवलोकन/वाचन करावे ही विनंती.)

      तसेच पोवारी बोलीच्या टिपण-लेखातही डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी गंभीर चुका तर केल्यातच त्यात अतिगंभीर दोष ही आहेत. शिवाय तो इतिहास-दुष्ट टिपण-लेख पोवारी बोली व पोवार समाजाचे criminal defamation करणारा सुद्धा ठरत असल्याने तो टिपण-लेख मागे घेण्यासाठी मी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांना विनंती केली आहे.

       पोवारी बोलीवर पूर्ण अधिकार, योग्यता व क्षमतेने टिपण-लेख लिहिण्यासाठी पोवारी बोली या विषयावरील विषय-तज्ज्ञ डाॅ.श्री.ज्ञानेश्वर टेंभरे (निवृत्त अधिष्ठाता) <dbtembhare@gmail.com> यांचे नाव मी सूचवीत आहे. आपण त्यांना त्यासाठी विचारणा/विनंती करू शकाल. आणि त्यांचा पोवारी बोलीवरील न्याय्य, योग्य व इतिहास-शुद्ध टिपण-लेख या महाग्रंथाच्या पुढील आवृत्तीत समाविष्ट करू शकाल.

       तरी यथावश्यक, यथाशीघ्र, यथोचित कार्यवाही साठी सविनय विनंतीपूर्वक कळवीत आहे. आपण निराश करणार नाही व या ऐतिहासिक स्वरूपाच्या महाग्रंथात झालेल्या गंभीर, भयंकर व अनैतिहासिक/इतिहास-दुष्ट चुका व दोष दूर करण्यासाठी पुढील सुधारित आवृत्ती लवकरच प्रकाशित कराल, अशी खात्री-वजा-अपेक्षा बाळगून येथेच थांबतो.
कळावे, लोभ असावा ही विनंती.
आपला नम्र
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~~~~~~~~~~~
सोबत:- वरीलप्रमाणे इमेल ची प्रत.
~~~~~~~~~~~~~~~~~~  
👇
बोरकन्हार(आमगांव)-441902,      दि.27.01.2019
~~~~~~~~~~~~~~~~~  
मित्रवर्य डाॅ.हरिश्चंद्र बोरकर
सप्रेम सादर नमस्कार.
        "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण" या ग्रंथात तुम्ही लिहिलेल्या झाडीबोली वरील टिपण-लेखात खालील दोष/चुका आढळून येतात, हे तुम्ही सुद्धा मान्य केलेले आहे.
    □इतिहासाच्या एकांगी/एकतर्फी नोंदी, खोट्या/भ्रामक/          फसव्या/आभासी/त्रूटीपूर्ण नोंदी, महत्वाच्या व प्रमुख          व्यक्तींचा जाणीवपूर्वक अनुल्लेख, पूर्वग्रहयुक्त नोंदी,              स्वस्तुतिजनक नोंदी........
◇यासंदर्भात मी अरुण जाखडे व डाॅ.गणेश देवी यांच्याशी पत्रव्यवहार करून माझा तीव्र निषेध व हैरानी नोंदवल्यावर त्यांनी पुढील आवृत्ती मध्ये वर नमूद दोष/चुका दुरुस्त करण्याचे लेखी कबूल केले आहे.
◇सबब तुम्हाला विनंती की "झाडीबोली"च्या संदर्भात कोणताही दोष/चुका नसलेले व न्याय्य ठरणारे सुधारित टिपण-लेख लिहून ते/तो टिपण-लेख अरुण जाखडे व डाॅ.गणेश देवी यांच्याकडे पुढील आवृत्तीसाठी अतीशीघ्र पाठविण्याची कृपा करावी. तथा तुम्हाला योग्य वाटल्यास/शक्य झाल्यास त्याची प्रत मला सुद्धा <lskatre55@gmail.com> या इमेल वर पाठविल्यास मला त्यासंदर्भात सतत पाठपुरावा करणे शक्य होईल.
----------------
2)तसेच सदरील ग्रंथातील आपला "पोवारी बोली" विषयक टिपण-लेख सुद्धा वर नमूद काही अतिगंभीर दोष/चुकांनी ग्रस्त असून पोवारी बोली व पोवार समाजाचे criminal defamation करणाराही असल्याने तुम्ही तो टिपण-लेख यथाशीघ्र मागे घ्यावा ही सविनय विनंती. या संदर्भात डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे हे या विषयाचे विषय-तज्ज्ञ हा टिपण-लेख योग्य पद्धतीने लिहू शकतात व म्हणून त्यांना त्यासंदर्भात विचारणा/विनंती करण्यासाठी अरुण जाखडे व डाॅ.गणेश देवी यांना विनंती-पत्र पाठवीत आहे.
-------------
3)या इमेल ची प्रत अरुण जाखडे व डाॅ.गणेश देवी यांना सुद्धा पुढील यथावश्यक, यथाशीघ्र कार्यवाहीसाठी सविनय विनंतीपूर्वक पाठवीत आहे.
----------------
4)या कामाला प्राधान्य द्यावे व तुमच्या अतिव्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून सुधारित टिपण-लेख यथाशीघ्र पाठवावा, ही पुनश्च विनंती.
-----------------
◇कळावे, ही सविनय विनंती.
तुमचा एक मित्र,
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार.
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

                                ||ॐ||

Comments

  1. अजूनही दुर्लक्षितच! अभिव्यक्तीस्वातंत्र्य विषयक संवैधानिक अधिकार सुद्धा विलंबितच म्हणावे की काय?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन