Posts

वीर सावरकर : एका भाषिक क्लृप्तीचे बळी

*वीर सावरकर : एका भाषिक क्लृप्तीचे बळी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~         सावरकरांनी त्यांच्या जन्मठेपेच्या कैदेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांना माफीपत्र पाठवले होते, ह्या तथाकथित व सध्याच्या संकल्पनेत सांगायचे तर सत्योत्तर स्वरूपाच्या टीकेचे विश्लेषण करावयाचे तर पॅलेस्टिनी कवी व लेखक मौरिद बार्गोटी यांच्या एका सुप्रसिद्ध कथन/विधानाचा अर्थ जाणून घ्यावा लागेल. मौरिद बार्गोटी लिहितो की, "सत्यस्थिती धूसर करणे हे केवळ एका साध्याशा भाषिक क्लृप्तीच्या आधारे शक्य असते. 'दुसरे म्हणजे' या शब्दांनी कहाणी सुरू केली की झालं." अगदी याच धर्तीवर सावरकरांच्या तथाकथित माफीपत्रावर 'भाषिक क्लृप्ती'चा जाणीवपूर्वक वापर करून वस्तुस्थितीला/सत्यस्थितीला धूसर करून या धूसर शब्दांकित, सत्योत्तर वस्तुस्थितीची/सत्यस्थितीची कहाणी गढण्यात येत असल्याचे दिसून येते. आणि अशा या आरोपित कहाणीद्वारे वीर सावरकरांची मृत्यूपश्चात बदनामी करण्याची मोहीमच उघडली जाते.         वस्तूतः वीर सावरकर हे महाभारतकालीन श्रीकृष्ण यांच्या कृष्णनीतीचा (तत्वहीन शत्रूच्या आक्रमकतेसमोर सद्गुणांची विकृती ...

मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर

*मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी, यवतमाळ येथे दि.15 मे 2006 ते 01जून 2008, त्यानंतर गडचिरोली येथे दि.02 जून 2008 ते 24 जून 2010 आणि तदनंतर पुन्हा दि.25 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत यवतमाळ येथेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हाप्रमुख म्हणून डीडीआर या पदावर कार्यरत होतो. 28 फेब्रुवारी 2013 ला मी यवतमाळ येथूनच निवृत्त झालो व माझे जन्मगाव असलेल्या बोरकन्हार (ता.आमगांव, जि.गोंदिया, झाडीपट्टी) येथे पुनर्स्थायी झालो. म्हणजेच मी एकंदरीत सुमारे पाच वर्षे (दोन कार्यकाल) यवतमाळ येथील सपरिवार रहिवासी होतो.  >> माझ्या या यवतमाळ येथील दोन्ही कार्यकाळाची तुलना करता माझ्या एकूणच व्यक्तिमत्त्वात व प्रकृतीस्वास्थ्यात जमीन-आसमानाचा फरक पडलेला(?) होता, हे मला दोन्ही कालावधीत जाणणाऱ्या/पाहणाऱ्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. याचे कारण म्हणजे मी गडचिरोली येथे बदलून गेल्यावर 26 सप्टेंबर 2008 ला माझा एक अपघात होऊन त्यात माझा डावा गुडघा तुटल्याने मला चालताना काठीचा आधार घ्यावा लागत असे. लगेचच 18 जानेवारी 200...

काही स्वप्नवत(?) आठवणी-2

*काही स्वप्नवत(?) आठवणी-2* ~~~~~~~~~~~~~~~~~~        जूलै 1966 मधील घटना आहे. मी माझ्या गावच्याच जि.प. शाळेत सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. अचानक एके दिवशी गुरूजींनी सांगितले की दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या शाळेतील वर्ग 5 व 6 बंद होत असून सर्वांनी आपापली सोय पहावयाची आहे. माझे वडील काॅन्ग्रेसचे एक वरीष्ठ कार्यकर्ते(?) असल्याने त्यांची पंचायत समितीच्या सभापतीशी आणि जि.प. च्या अध्यक्षाशी चांगली ओळख व मैत्री सुद्धा होती. त्यांनी हा निर्णय बदलविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. पण सर्व व्यर्थ.          अखेर आमच्या गावाजवळील 3 किमी अंतरावरील जि.प. शाळा अंजोरा येथे आमची रवानगी झाली, काही विद्यार्थी 6 किमी वरील आमगांव या तत्कालीन ब्लाॅकस्तरीय मोठ्या गावातील शाळेत गेले. म्हणजे तत्कालीन तुकडी, वर्ग एक ते वर्ग साडेपाच पर्यंतचे माझे शिक्षण माझ्या गावातील जि.प.च्या शाळेतच झाले. इंग्रजी भाषेची व विषयाची पहिली ओळख पाचव्या वर्गात माझ्या गावातच झाली.              मी गावापासून 3 किमी वर असलेल्या अंजोरा येथील शाळेत रोज पायी ये-जा...

अमर, अकबर, ॲन्थोनी आणि आम्ही तिघे...

*अमर, अकबर, ॲन्थोनी आणि आम्ही तिघे...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       मी 1977 मध्ये बी.एससी.(पीसीएम) उत्तीर्ण होऊन एलएल.बी. ला प्रवेश घेतला. त्यावेळेस बहुतेक हायस्कूलमध्ये गणित शिक्षकांची भयंकर(?) टंचाई(?) होती. म्हणून माझ्याकडे काही खाजगी शाळेचे संस्थाचालक व त्यांचे मुख्याध्यापक वारंवार येऊन मला गणित शिक्षकाची ऑफर द्यायचे. पण मी "नोकरी करणार नाही" असा, नंतर तकलादू ठरलेला, प्रण केल्याने मी त्यावर्षी काही त्यांना बधलो नाही. (आजच्या घडीला हे दिवास्वप्न वाटेल, पण ही त्यावेळची वस्तुस्थितीच होती.)       परंतू ग्रॅज्युएट होऊनही वडिलांनाच पैसे मागावे लागतात, हे कुठेतरी खटकल्याने मी जिल्हा परिषद भंडारा अंतर्गतच्या शहीद जान्या तिम्या ज्युनियर कॉलेज, गोरेगांव येथे तत्कालीन 3-बी-1 अंतर्गत जीवशास्त्राचे शिक्षक असलेल्या सी.आय.पटले या माझ्या मित्राच्या व तेथील मुख्याध्यापक श्री.जी.डी.ठाकूर यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद कडे शिक्षक पदासाठी अर्ज केला. जिल्हा परिषद भंडाराचे तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी/सीईओ श्री.अनिलकुमार लखीना यांनी माझी मुलाखत घेतली व मला गोरेगां...

विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन

*विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        वाद (इझम) व/वा विचारसरणी या विचारपद्धतीच्या विविध विधा/तऱ्हा आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या विचार करण्याच्या विचारपद्धतींचे मी तीन मुख्य प्रकार मानतो. ते तीन प्रकार म्हणजे --  (1)विचारवाद (इझम),  (2)विचारसरणी आणि  (3)विचारधारा.         (1) *विचारवाद* :- यापैकी विचारवाद(इझम) हा कोणत्यातरी विचारकाच्या विचारांचा संग्रह व/वा संगम असतो. यात मुख्य प्रवर्तकाचे विचारच प्रामुख्याने आचरले व अभ्यासले(?) जातात. मुख्य प्रवर्तकाने मांडलेल्या विचारांचा प्रतिवाद करण्याची प्रथा या प्रकारात कटाक्षाने टाळली जाते. मुख्य प्रवर्तकाने त्याच्या जीवनकालात/जीवनप्रवासात मांडलेले विचार हेच अंतिम विचार असा एक समज/कल/आग्रह असणे, हे या प्रकाराचे एक वैशिष्ट्यच म्हणता येईल. परंतू निसर्गचक्र हे सतत प्रवाही व बदलानुकूल असल्याने कोणताच कालसापेक्ष विचार/विचारवाद/विचारपद्धती शाश्वत/कायम/सार्वकालिक असूच शकत नाही. त्यामुळेच अर्थातच अशा विचारवाद/विचारपद्धतीचे कालसुसंगत असणे क...

शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality

◇*शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality*◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 'दासबोध' मध्ये रामदासांनी वर्णिलेल्या एका मुर्खपणाच्या लक्षणाचे अनुसरण करून सांगू इच्छितो की, शासकीय सेवेत ''कार्यक्षमता, कामाचे सर्वोत्कृष्ट, सकारात्मक, टिकाऊ परिणाम'' यांची कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसली तरी अशा अधिकारी/कर्मचा-यांना गधा बनवून त्याच्यावर जास्तीत जास्त भार मात्र हमखास टाकला जातो, अशांपैकीच मी एक होतो. मी TARCS असताना माझ्याकडे एका बिमार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकल प्रशासकीय प्रभार सोपविण्यात आला होता. आठ-नऊ महिन्याच्या कालावधीतच मी ती बाजार समिती कायम आर्थिक व प्रशासनिक स्थिरतेमध्ये आणू शकलो व माझा अल्पकालिक प्रशासकीय कालावधी संपतांना त्या बाजार समितीच्या खळखळाटी बँक खात्यात लाखो रुपये जमा झालेले होते.  >> शिवाय मी ज्यावेळी तालुकाप्रमुख अधिकारी होतो तेव्हा माझ्याकडे चार तालुक्यांचा अतिरिक्त प्रभार असतानाही मला अविभाजित भंडारा जिमस बँक,भंडारा या समस्याग्रस्त जिल्हा बँकेचा एकल प्रशासक व त्याच अविभाजित भंडारा जिल्ह्याचा DDR असे आणखी दोन महत्वाचे प्रभार सोपवि...

करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे

*करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे  (निवृत्त डीडीआर/जिल्हा सहकार निबंधक) B.Sc.(PCM), M.A., LL.B., B.Ed., H.D.C.M., G.D.C.&A., D.B.M., D.I.T. ----------------------------------------------- *प्रकाशित साहित्य*  ------------------------------ 1)प्रमेय (कवितासंग्रह/1996) 2)जाणिवेतले कर्कदंश (कवितासंग्रह/2000) (या संग्रहातील एक कविता 'जागर' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.काॅम.च्या प्रथम वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट) 3)एकोणिसावा अध्याय (कथासंग्रह/2001) 4)शाश्वत मौनाचे स्वगत (अभंगसंग्रह/2002) 5)आदिम प्रकाशचित्रे (चित्र-काव्यसंग्रह/2004) (सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व पत्रकार श्री.सुरेश द्वादशीवार यांची विवेचक प्रस्तावना, 'लोकमत'च्या तत्कालीन साहित्य पुरवणीतून विशेष दखल, 'भाषा आणि जीवन' मधून समीक्षण प्रकाशित तथा या संग्रहाला जानेवारी 2006 मध्ये बुलडाणा येथील प्रतिष्ठेचा 'तुका म्हणे' पुरस्कार प्राप्त) 6)शब्दार्थांचे आधार निष्फळ (कवितासंग्रह/2005) (झाडीबोल...