Posts

काही स्वप्नवत(?) आठवणी-2

*काही स्वप्नवत(?) आठवणी-2* ~~~~~~~~~~~~~~~~~~        जूलै 1966 मधील घटना आहे. मी माझ्या गावच्याच जि.प. शाळेत सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. अचानक एके दिवशी गुरूजींनी सांगितले की दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या शाळेतील वर्ग 5 व 6 बंद होत असून सर्वांनी आपापली सोय पहावयाची आहे. माझे वडील काॅन्ग्रेसचे एक वरीष्ठ कार्यकर्ते(?) असल्याने त्यांची पंचायत समितीच्या सभापतीशी आणि जि.प. च्या अध्यक्षाशी चांगली ओळख व मैत्री सुद्धा होती. त्यांनी हा निर्णय बदलविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. पण सर्व व्यर्थ.          अखेर आमच्या गावाजवळील 3 किमी अंतरावरील जि.प. शाळा अंजोरा येथे आमची रवानगी झाली, काही विद्यार्थी 6 किमी वरील आमगांव या तत्कालीन ब्लाॅकस्तरीय मोठ्या गावातील शाळेत गेले. म्हणजे तत्कालीन तुकडी, वर्ग एक ते वर्ग साडेपाच पर्यंतचे माझे शिक्षण माझ्या गावातील जि.प.च्या शाळेतच झाले. इंग्रजी भाषेची व विषयाची पहिली ओळख पाचव्या वर्गात माझ्या गावातच झाली.              मी गावापासून 3 किमी वर असलेल्या अंजोरा येथील शाळेत रोज पायी ये-जा...

अमर, अकबर, ॲन्थोनी आणि आम्ही तिघे...

*अमर, अकबर, ॲन्थोनी आणि आम्ही तिघे...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       मी 1977 मध्ये बी.एससी.(पीसीएम) उत्तीर्ण होऊन एलएल.बी. ला प्रवेश घेतला. त्यावेळेस बहुतेक हायस्कूलमध्ये गणित शिक्षकांची भयंकर(?) टंचाई(?) होती. म्हणून माझ्याकडे काही खाजगी शाळेचे संस्थाचालक व त्यांचे मुख्याध्यापक वारंवार येऊन मला गणित शिक्षकाची ऑफर द्यायचे. पण मी "नोकरी करणार नाही" असा, नंतर तकलादू ठरलेला, प्रण केल्याने मी त्यावर्षी काही त्यांना बधलो नाही. (आजच्या घडीला हे दिवास्वप्न वाटेल, पण ही त्यावेळची वस्तुस्थितीच होती.)       परंतू ग्रॅज्युएट होऊनही वडिलांनाच पैसे मागावे लागतात, हे कुठेतरी खटकल्याने मी जिल्हा परिषद भंडारा अंतर्गतच्या शहीद जान्या तिम्या ज्युनियर कॉलेज, गोरेगांव येथे तत्कालीन 3-बी-1 अंतर्गत जीवशास्त्राचे शिक्षक असलेल्या सी.आय.पटले या माझ्या मित्राच्या व तेथील मुख्याध्यापक श्री.जी.डी.ठाकूर यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद कडे शिक्षक पदासाठी अर्ज केला. जिल्हा परिषद भंडाराचे तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी/सीईओ श्री.अनिलकुमार लखीना यांनी माझी मुलाखत घेतली व मला गोरेगां...

विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन

*विचारपद्धती व तिचे प्रकार : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        वाद (इझम) व/वा विचारसरणी या विचारपद्धतीच्या विविध विधा/तऱ्हा आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या विचार करण्याच्या विचारपद्धतींचे मी तीन मुख्य प्रकार मानतो. ते तीन प्रकार म्हणजे --  (1)विचारवाद (इझम),  (2)विचारसरणी आणि  (3)विचारधारा.         (1) *विचारवाद* :- यापैकी विचारवाद(इझम) हा कोणत्यातरी विचारकाच्या विचारांचा संग्रह व/वा संगम असतो. यात मुख्य प्रवर्तकाचे विचारच प्रामुख्याने आचरले व अभ्यासले(?) जातात. मुख्य प्रवर्तकाने मांडलेल्या विचारांचा प्रतिवाद करण्याची प्रथा या प्रकारात कटाक्षाने टाळली जाते. मुख्य प्रवर्तकाने त्याच्या जीवनकालात/जीवनप्रवासात मांडलेले विचार हेच अंतिम विचार असा एक समज/कल/आग्रह असणे, हे या प्रकाराचे एक वैशिष्ट्यच म्हणता येईल. परंतू निसर्गचक्र हे सतत प्रवाही व बदलानुकूल असल्याने कोणताच कालसापेक्ष विचार/विचारवाद/विचारपद्धती शाश्वत/कायम/सार्वकालिक असूच शकत नाही. त्यामुळेच अर्थातच अशा विचारवाद/विचारपद्धतीचे कालसुसंगत असणे क...

शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality

◇*शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality*◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 'दासबोध' मध्ये रामदासांनी वर्णिलेल्या एका मुर्खपणाच्या लक्षणाचे अनुसरण करून सांगू इच्छितो की, शासकीय सेवेत ''कार्यक्षमता, कामाचे सर्वोत्कृष्ट, सकारात्मक, टिकाऊ परिणाम'' यांची कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसली तरी अशा अधिकारी/कर्मचा-यांना गधा बनवून त्याच्यावर जास्तीत जास्त भार मात्र हमखास टाकला जातो, अशांपैकीच मी एक होतो. मी TARCS असताना माझ्याकडे एका बिमार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकल प्रशासकीय प्रभार सोपविण्यात आला होता. आठ-नऊ महिन्याच्या कालावधीतच मी ती बाजार समिती कायम आर्थिक व प्रशासनिक स्थिरतेमध्ये आणू शकलो व माझा अल्पकालिक प्रशासकीय कालावधी संपतांना त्या बाजार समितीच्या खळखळाटी बँक खात्यात लाखो रुपये जमा झालेले होते.  >> शिवाय मी ज्यावेळी तालुकाप्रमुख अधिकारी होतो तेव्हा माझ्याकडे चार तालुक्यांचा अतिरिक्त प्रभार असतानाही मला अविभाजित भंडारा जिमस बँक,भंडारा या समस्याग्रस्त जिल्हा बँकेचा एकल प्रशासक व त्याच अविभाजित भंडारा जिल्ह्याचा DDR असे आणखी दोन महत्वाचे प्रभार सोपवि...

करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे

*करे आत्मस्तुती(?), तो एक मूर्ख >> लखनसिंह कटरे*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे  (निवृत्त डीडीआर/जिल्हा सहकार निबंधक) B.Sc.(PCM), M.A., LL.B., B.Ed., H.D.C.M., G.D.C.&A., D.B.M., D.I.T. ----------------------------------------------- *प्रकाशित साहित्य*  ------------------------------ 1)प्रमेय (कवितासंग्रह/1996) 2)जाणिवेतले कर्कदंश (कवितासंग्रह/2000) (या संग्रहातील एक कविता 'जागर' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.काॅम.च्या प्रथम वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट) 3)एकोणिसावा अध्याय (कथासंग्रह/2001) 4)शाश्वत मौनाचे स्वगत (अभंगसंग्रह/2002) 5)आदिम प्रकाशचित्रे (चित्र-काव्यसंग्रह/2004) (सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व पत्रकार श्री.सुरेश द्वादशीवार यांची विवेचक प्रस्तावना, 'लोकमत'च्या तत्कालीन साहित्य पुरवणीतून विशेष दखल, 'भाषा आणि जीवन' मधून समीक्षण प्रकाशित तथा या संग्रहाला जानेवारी 2006 मध्ये बुलडाणा येथील प्रतिष्ठेचा 'तुका म्हणे' पुरस्कार प्राप्त) 6)शब्दार्थांचे आधार निष्फळ (कवितासंग्रह/2005) (झाडीबोल...

माझी कविता : एक अप्रासंगिक टिपणी

*माझी कविता : एक अप्रासंगिक टिपणी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> तसे पाहिले असता माझ्या आईच्या प्रेरणेने माझ्या वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासूनच मी सटरफटर कविता/कथा करू/लिहू लागलो होतो. माझ्या या वृत्तीला 1969-70 पासून अजून काही धुमारे फुटू लागून मी आणखी काही सटरफटर कविता/कथा (हिंदी आणि मराठीत) करू लागलो होतो. माझ्या वर्ग दहा (1970-71) च्या शिक्षिका सौ.मंदाकिनी प्रभाकरराव सगदेव यांनी मला खऱ्या अर्थाने काव्यलेखनाला प्रवृत्त व दिक्षित करताना काव्यालंकार, वृत्त-छंदादि काव्य-व्याकरणाचे सफल व यशस्वी धडे दिले. मी आपल्या अल्पमतीप्रमाणे यथाशक्य तसा या काव्य-व्याकरणाला शरण जाऊन माझी सटरफटर कविता लिहित असे. >> परंतु मी बी.एससी.(पीसीएम) च्या अभ्यासक्रमात आधुनिक भौतिकशास्त्राचा अभ्यास करू लागलो तेव्हा प्रा.आगलावे सरांच्या प्रभावी व सुहृद्, सुस्पष्ट शिकवण्यामुळे खूप प्रभावित होऊन भौतिकशास्त्रावरील विविध पुस्तके वाचू/अभ्यासू लागलो. बी.एससी. च्या अंतिम वर्षात आइनस्टाइन यांचा सापेक्षवादाचा सिद्धांत, वर्नर हायसेनबर्ग यांचा अनिश्चततेचा सिद्धांत आणि रिचर्ड फाइनमन यांची वेगवेगळे विश्वेतिहास अस...

कुत्सित(विकृत) बौद्धिकता(प्रतिभा) और... (प्रकाशित)

*कुत्सित(विकृत) बौद्धिकता(प्रतिभा) और...* (प्रकाशित) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (दिवान मेरा : हिंदी द्वैमासिक : फर-मार्च 2024) ------------------------------------------------------------- @ॲड.लखनपाल सिंह कटरे "अपराधी" ------------------------------------------ >> मानव की आकलन क्षमता का पूरा पूरा ज्ञान अभी भी विज्ञान खोज ही रहा है। मानव मस्तिष्क अभी भी वैज्ञानिकों के लिए एक अनबुझ पहेली ही साबित हो रहा है। इस मानवी आकलन क्षमता और मानवी बौद्धिकता/प्रतिभा के विभिन्न पहलुओं पर संबंधित वैज्ञानिकों द्वारा प्रकट/प्रस्तुत भिन्न भिन्न अनुभव तथा आकलन हम आये दिन पढ़ते रहते है। अभीतक मानवी बौद्धिकता/प्रतिभा के जो विभिन्न आयाम वैज्ञानिकों ने खोज लिए है, उनका एक सर्वसाधारण ब्योरा अमेरिकन मनोवैज्ञानिक हावर्ड गार्डनर द्वारा प्रस्तुत किया गया है। जिसके अनुसार मानवी बौद्धिकता/प्रतिभा के आठ प्रकार माने गए है। वे है --- 1) दृश्य स्थानिक या आकाशीय बौद्धिकता/प्रतिभा (Visuals - Spatial)-  जो लोग Visuals - Spatial में मजबूत होते हैं, वे चीजों को देखने में बाकि लोगों से अच्छे होते है। यह व्यक्ति...