Posts

कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव

*कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >>   दोनेक वर्षांपूर्वीची घटना असावी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भवभूती महाविद्यालय आमगांव येथे मला बोलावे लागले. बोललो सुद्धा काही बाही. प्राचार्य श्री भुस्कुटे यांनी कुसूमाग्रजांच्या कवितांचं सुंदर असं "प्रदर्शन" सुद्धा भिंती भिंतीवर "लावलं" होतं. एका कवितेसमोर मी थोडासा थबकलो. मला 2009 मधील एक अप्रिय प्रसंग आठवला. ती कविता म्हणजे "- ...पाठीवर हात ठेवा....."! (कणा) >>  झालं असं की, जानेवारी-2009 मधील माझ्या अपघातानंतर डावा हात पूर्णतः आणि डावाच पाय अंशतः दिव्यांग होऊन मी सहा महिने उपचार घेऊन नुकताच रूजू झालो होतो. या दरम्यान जुने जिल्हाधिकारी बदलून नवीन जिल्हाधिकारी सुद्धा रुजू झाले होते. त्यामुळे प्रोटोकॉलच्या दृष्टीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी काठीच्या साहाय्याने लंगडत लंगडत (डावा हात बॅन्डेज मध्येच लटकवलेला) त्यांना भेटायला गेलो. साहेबांना आल्याचा निरोप धाडला. 1/1.5 तासा(?)नंतर साहेबांनी चेम्बरमध्ये बोलावलं. गेलो. माझ्या प्रोटोकॉल पाळण्याच्या सवयीप्...

शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality

◇*शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality*◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~              'दासबोध' मध्ये रामदासांनी वर्णिलेल्या एका मुर्खपणाच्या लक्षणाचे अनुसरण करून सांगू इच्छितो की, शासकीय सेवेत ''कार्यक्षमता, कामाचे सर्वोत्कृष्ट, सकारात्मक, टिकाऊ परिणाम'' यांची कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसली तरी अशा अधिकारी/कर्मचा-यांना गधा बनवून त्याच्यावर जास्तीत जास्त भार मात्र हमखास टाकला जातो, अशांपैकीच मी एक होतो. मी TARCS असताना माझ्याकडे एका बिमार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकल प्रशासकीय प्रभार सोपविण्यात आला होता. आठ-नऊ महिन्याच्या कालावधीतच मी ती बाजार समिती कायम आर्थिक व प्रशासनिक स्थिरतेमध्ये आणू शकलो. शिवाय माझ्याकडे चार तालुक्यांचा अतिरिक्त प्रभार असतानाही मला अविभाजित भंडारा जिमस बँक,भंडारा या समस्याग्रस्त जिल्हा बँकेचा एकल प्रशासक व त्याच अविभाजित भंडारा जिल्ह्याचा DDR असे आणखी दोन महत्वाचे प्रभार सोपविण्यात आले होते व मी ते कायमस्वरूपी अशा यशस्वीपणे "पार"ही पाडले. तसेच मी चंद्रपूर जिल्ह्यात DDR म्हणून काम करताना तिथे 80% कर्मचारी/अधिकारी पदे रिक्त असता...

पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य आणि पोवारी संस्कृती : एक आकलन

*पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य अना पोवारी संस्कृती : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया  ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आम्ही पोवार आजन् अना पोवार समाज की उत्पत्ती अग्निकुण्ड मालका भयेव् को कारनलका आम्ही अग्निवंशी क्षत्रिय कहलाव् सेजन्. पर धीरू धीरू, भिन्न भिन्न कारनलका सारो पोवार समाज अखंड भारतभर फैलेव् को कारनलका आमरो समाज को संस्कृती मा एकसाथ साम्य, समन्वय अना एकसारखोपणाको साथसाथमाच् विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता भी दिस् से. अना मुनस्यारीच् आमला "आपली संस्कृती टिकावनको संगसंगच् विभिन्न इलाका मा बस्या आमरो पोवार समाज को संस्कृती को भी आदर करे पाह्यजे." एकमेकको मत अना बिचार ला सहानुभूती अना समंजसपणालका समज् लेये पाह्यजे. भिन्न भिन्न इलाका का बस्या आमरो पोवार समाज को जीवनपद्धतीमा आयेव् काही-बाही, थोडोबहुत फरक आम्ही समज् लेये पाह्यजे. असी समन्वयवादी, समजदारीकी अना आदरयुक्त बिचारधाराच् आमरो समाज, आमरी बोली अना आमरो संस्कृती ला संपूरक अना तारक ठह्यरे असो मोला विश्वास से.  >> 1910 को दशक मा, शायद सब समाज मा पह्यलोच् बेरा, आमरो पोवार सम...

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारी बोली

*झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारीबोली* *(कला, साहित्य, संस्कृती व परंपरा)* : *एक आकलन* ------------------------------------------------------------------- @ॲड.लखनसिंह कटरे  ----------------------------------------------- (1) झाडीपट्टी/झाडीमंडळ : ही एक ऐतिहासिक, भौगोलिक तथा सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे संपूर्ण चार जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, भिवापूर, कुही, उमरेड हे तालुके असा हा झाडीपट्टीचा विस्तार आहे. या भागात सर्रास बोलली जाणारी ग्रामीण बोली ही झाडीबोली म्हणून संबोधिली/ओळखली जाते. झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी या भागातील दुसरी प्रमुख बोली म्हणजे पोवारीबोली होय. या भागातील वनाचे प्रमाण एकूण भूभागाच्या सरासरीने 60 ते 80% असून येथील वनात मौल्यवान सागवानापासून जवळपास सर्वच प्रजातीचे वृक्ष आहेत. येथील वृक्षराजी अत्यंत समृद्ध आहे.  सुप्रसिद्ध संस्कृत कवी/नाटककार भवभूति हे आमच्या झाडीपट्टीतील आमगांवजवळील पदमपूर येथील असल्याचे पुरातत्त्ववेत्ते महामहोपाध्याय डाॅ.वा.वि.मिराशी यांनी सप्रमाण मांडले आहे. पदमपू...

एक स्मरणयात्रा : फ्रेडरिक नित्शे आणि विचार-स्वातंत्र्य

◇Friedrich Nietzsche आणि विचार-स्वातंत्र्य◇ ++++++++++++++++++++++++++++++++++ ◇विज्ञान युग, जिज्ञासा आणि गजानन क्षीरसागर◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~         1971-72 मधील घटना असावी. मी सीताबर्डी नागपूर येेेथील हनुमान गल्लीतील मोठ्या न्यूज पेपर व्हेेंडरला विनंती करून रविवारचा "मटा" त्यांच्याकडून पोस्टाने मागवत असे. "मटा"तील एका छोट्याशा जाहिरातीनुसार मी पुण्याच्या (अनिरुद्ध प्रकाशन, 1493 क, सदाशिव पेठ) श्री.गजानन क्षीरसागर यांच्या "विज्ञान युग" मासिकाचा वर्गणीदार झालो. लवकरच त्यांनी "जिज्ञासा" हे दुसरे सामान्य ज्ञान विषयक नियतकालिक सुरू केले व मी त्याचाही वर्गणीदार झालो. या अल्पजीवी "जिज्ञासा"चे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. UPSC/MPSC बद्दलची साद्यंत माहिती मला सर्वप्रथम याच नियतकालिकाने पुरविली/दिली होती.         या "जिज्ञासा" मध्ये प्रकाशित एका लेखाने माझ्या विचार-विश्वात आमूलाग्र बदल घडवून आणला. तो लेख म्हणजे जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नित्शे (Friedrich Nietzsche/1844-1900) यांच्यावरील परीचय-लेख. (या लेखाच्या लेखकाचे नाव ...

काही मूर्खपणाच्या शंका/कुशंका......!!

□काही मुर्खपणाच्या शंका/कुशंका!!□ -------------------------------------------------- 1)मी एलएल.बी.(1981) करत असताना आम्हाला "नैसर्गिक न्याय तत्व" (Principle of Natural Justice) शिकवताना आमचे प्रोफेसर न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देऊन सांगायचे की, हे तत्त्व कोणत्याही कायद्यात "व्याख्यायित" केले नसले तरी हे तत्त्व कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचा मूलभूत पायाच असते. केलेली कार्यवाही कितीही योग्य(?) असली तरी नैसर्गिक न्याय तत्त्वाचे अनुपालन करणारी नसेल तर ती कार्यवाही या तत्त्वाचे अनुपालन न केल्याच्या तांत्रिक कारणावरून सुद्धा न्यायालय निरस्त/रद्द करू शकतात/करतात.  आताही हे "नैसर्गिक न्याय तत्त्व" न्यायालयीन निर्णयात पाळले जात असावे काय? 2)मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत असताना (30 वर्षांत) हजारो न्यायिकवत (Quasi Judicial) निर्णय पारित केले होते. आणि त्यातील एकसुद्धा निर्णय कोणत्याही न्यायालयात निरस्त वा रद्द झाल्याचे "मला आढळून आले" नाही. (अपवाद : मंत्री स्तरावरील व विभागा...

माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील काही-बाही परिणाम

*माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील काही-बाही परिणाम*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 1.बहुतेक हिंदूंनी त्यांचे धर्मग्रंथ वाचलेलेच नाहीत. भटजी किंवा  चार्वाक किंवा हिंदूधर्म-विरोधक जे काही सांगतील तेच ते सत्य मानतात. 2.बहुतेक मुस्लिमांनी पवित्र कुराण वाचलेलेच नाही, फक्त शब्दोच्चारण तेवढे कदाचित केले असेल पण मूळ भाषाच येत नसल्याने अर्थ कळलेला नाही. मुल्ला-मौलवी, कट्टरवादी जे सांगतील तेच ते सत्य मानतात. 3.बहुतेक ख्रिश्चनांनी बायबल मधील जून्या करारातील उत्पत्ती हे प्रकरण वाचलेलेच नाही. फ्रेडरिक नित्शे बायबलबद्दल काय म्हणालाय हे सुद्धा बहूतेकांना ठाऊकच नाही.   4.दास कॅपिटल न वाचताच त्यावर भाष्य करावे ही बहूतेक भारतीय कम्युनिस्टांची खासियत आहे. (मी दास कॅपिटल वाचून भयंकररित्या confuse झालो होतो. ) 5.सुरेश द्वादशीवार नावाचे एक original विचार करणारे तत्वचिंतक भारतात आहेत व त्यांनी त्यांचे तत्वचिंतन ग्रंथांतून मांडले आहे, हे आम्हा बहूतेक भारतीयांना (विशेषतः महाराष्ट्रीयनांना) माहीतच नाही. 6.योगी अरविंदांनी केलेल्या thinkophobia च्या मांडणीचे आम्ही बहुतेक भारतीय अजूनही तंतोतंत पालन...