माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील काही-बाही परिणाम

*माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील काही-बाही परिणाम* 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
1.बहुतेक हिंदूंनी त्यांचे धर्मग्रंथ वाचलेलेच नाहीत. भटजी किंवा  चार्वाक किंवा हिंदूधर्म-विरोधक जे काही सांगतील तेच ते सत्य मानतात.
2.बहुतेक मुस्लिमांनी पवित्र कुराण वाचलेलेच
नाही, फक्त शब्दोच्चारण तेवढे कदाचित केले असेल पण मूळ भाषाच येत नसल्याने अर्थ कळलेला नाही. मुल्ला-मौलवी, कट्टरवादी जे सांगतील तेच ते सत्य मानतात.
3.बहुतेक ख्रिश्चनांनी बायबल मधील जून्या करारातील उत्पत्ती हे प्रकरण वाचलेलेच नाही. फ्रेडरिक नित्शे बायबलबद्दल काय म्हणालाय हे सुद्धा बहूतेकांना ठाऊकच नाही.  
4.दास कॅपिटल न वाचताच त्यावर भाष्य करावे ही बहूतेक भारतीय कम्युनिस्टांची खासियत आहे. (मी दास कॅपिटल वाचून भयंकररित्या confuse झालो होतो. )
5.सुरेश द्वादशीवार नावाचे एक original विचार करणारे तत्वचिंतक भारतात आहेत व त्यांनी त्यांचे तत्वचिंतन ग्रंथांतून मांडले आहे, हे आम्हा बहूतेक भारतीयांना (विशेषतः महाराष्ट्रीयनांना) माहीतच नाही.
6.योगी अरविंदांनी केलेल्या thinkophobia च्या मांडणीचे आम्ही बहुतेक भारतीय अजूनही तंतोतंत पालन करतोय.
7.अजून काही बाही. .....
       हे माझ्या अल्पबुद्धीचे माझ्यावरील परिणाम आहेत, निष्कर्ष नव्हेत. यावर जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. भूल चूक देणे घेणे व क्षमस्व.
@ॲड.लखनसिंह कटरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन