Posts

माझा अपघात : एक स्मरणगाथा

माझा अपघात : एक स्मरणगाथा... ~~~~~~~~~~~~~~~~~~        दि.18 जानेवारी 2009, रविवार. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा दिवस. मी जिल्हा सहकार निबंधक या नात्याने जिल्हा निवडणूक अधिकारी. मी नेमलेला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे तालुका सहकार निबंधक प्रशांत धोटे. तसा धोटे हा डेअर-डॅशिंग आणि कायदा-नियमानेही प्रशासन-सुदृढ अधिकारी असला तरी चामोर्शी तालुक्यातील राजकारणाची जवळून ओळख असलेला माझ्या जिल्हा कार्यालयातील माझा कनिष्ठ सहकारी, सहाय्यक निबंधक मोरेश्वर गणवीर म्हणाला की, या निवडणुकीच्या मतदानप्रसंगी मी स्वतः मतदान केंद्रांवर उपस्थित राहून देखरेख करणे अनिवार्य राहील. कारण पूर्वेतिहास खूपच कठीण प्रसंगांनी डागाळलेला होता. माझ्या स्वच्छ पारदर्शी कारभाराने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे व अपक्ष सुद्धा नेते/कार्यकर्ते मला "मानत" असल्याने निवडणूक/मतदान प्रसंगी एखादा अप्रत्याशित प्रसंग उद्भवल्यास मी तेथे हजर असलो तर तो प्रसंग सुद्धा सहज निस्तरता येईल, असे गणवीर चे आकलन होते. गणवीर यांचे हे "आकलन" मला "सुखावणारे"च असल्याने म्...

याला काय म्हणावे? (लाखांदूर एपिसोड)

*याला काय म्हणावे?* ~~~~~~~~~~~~~               पुष्कळदा वर्तमानपत्रातून वगैरे प्रसिद्धी माध्यमातून समजते की, अमूक-तमूक मंत्री/नेता/अधिकारी/कर्मचारी  भ्रष्टाचारा(?)त प्रवीण(?) असून त्याच्या/त्यांच्या विरूध्द पूरावे सुद्धा उपलब्ध आहेत. पण पुढे काही दिवस/महिने/वर्षानंतर "त्या"चे काय झाले हे आपण विसरून गेलेलो असतो. मला त्या प्रामाणिक(!) पूराव्यादारांना नम्रपणे(?) सांगायचे आहे की, 'त्या पुराव्यांचा काही उपयोग होईल असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत नाही.'                        माझा यासंदर्भातील एक छोटासा अनुभव सांगतो... 1996-97 मधील सत्य घटना आहे ही. तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील एक तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) सेवानिवृत्त झाल्याने त्या तालुक्याचा प्रभार कोणाला द्यावा यासाठी जिऊनि कार्यालयात खूप मोठे(?) खलबत(!) झाल्यावर कोणीही तेथील प्रभार घ्यायला तयार(?) नसल्याने मला न विचारताच तो अतिरिक्त प्रभार मला सोपविण्यात...

झाडीपट्टी/झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती.

04.07.2020 ================================== *झाडीपट्टी/झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती*  ------------------------------------------------------------------ @ॲड.लखनसिंह कटरे  ----------------------------- >> मी अगदी/सुमारे 1975 पासून झाडीबोली आणि झाडीसंस्कृतीचा पाठीराखा व प्रवाहक/पुरस्कर्ता असलो तरी मी या भागातील ग्रामीण बोलीला झाडीबोली असे नाव दिले नव्हते. मला अशी कल्पना सुद्धा सुचली नाही. 1968 पासून 'ललित' मासिकाचा वर्गणीदार-वाचक असल्याने त्यातूनच कधीतरी आनंद यादव यांच्या 'गोतावळा' बद्दल कळले/वाचले आणि माझा सखा मिळाला असेच वाटले. आमच्या विद्यालयाच्या तुटपुंज्या वाचनालयातून 'गोतावळा' आणून वाचून काढली. तेव्हा कुठे "आमचे आपले साहित्य" वाचल्याचे समाधान झाले. त्यापूर्वी 'माणूस मोठा जिद्दीचा' ही एकमेव कादंबरी वाचली होती, आणि तिच्यातील कथानक, वर्णनादि वाचून आपण एखादी परीकथाच वाचतोय असे वाटले होते. त्या कथानक व वर्णनाशी मी रिलेट/समरस होऊ शकलो नव्हतो.  >> याच दरम्यान 1972च्या माझ्या माजी विद्यालयाच्या स्नेहसं...

फेब्रुवारी 1978 आणि त्यानंतर : एक स्वानुभवाकलन

*फेब्रुवारी 1978 आणि त्यानंतर : एक स्वानुभवाकलन!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मे-जून 1977 मध्ये अखेर मी B.Sc.(PCM) चा पदवीधर झालो. M.Sc.(Phy.) साठी PGTD आणि HISLOP College या नागपूरच्या विद्यापीठ/संस्थानात अर्ज केला. दोन्ही ठिकाणी मला M.Sc.(Phy.)च्या सिलेक्ट लिस्ट च्या अंतिम क्रमांकावरील विद्यार्थ्यापेक्षा दोनेक गुण कमी पडल्याने (याचीही एक वेगळीच स्टोरी आहे!) Physics ऐवजी Maths मध्ये प्रवेश घेण्यासंबंधाने विचारणा करण्यात आली/तसे कळविण्यात आले. पण मला Maths मध्ये बिलकुल M.Sc. करायचे नसल्याने हिरमुसला व किंकर्तव्यमूढ होऊन मी गावी परतलो. वडिलांना ही हकिगत सांगून आता यापुढे आणखी न शिकता, शेती व मी उभारलेला धान-खरेदी-सह-किराणा दुकान-सह-आटाचक्की चा छोटासा व्यवसाय वाढविण्याची माझी इच्छाही बोलून दाखवली. >> माझ्या वडिलांना वकिलीच्या व्यवसायाबद्दल व वकीलांबद्दल खूप आकर्षण-वजा-ओढ असल्याने त्यांनी मला वकील होण्याचा जोरकसपणे सल्ला दिला. अखेर मी LL.B.ला प्रवेश घेतला. LL.B.चे वर्ग संध्याकाळी लागत असल्याने दिवसभर मी मोकळाच असे. >> त्या कालावधीत B.Sc. गणित शिक्षकांची अतिशय चणचण(!)...

पोवारी बोली अना मी : एक पुनरावलोकन

*पोवारी बोली अना मी : एक पुनरावलोकन* -------------------------------------------------------- >> मी फरवरी 2013 मा रिटायर भयेव् अना कोनतोच शहर मा स्थायी नही होयस्यार आपलो जन्मगाव/खेडेगाव बोरकन्हार मा पुनर्स्थायी होन् साठी मार्च 2013 पासना आमरो गावमा रव्हन् ला आयेव् सपरिवार।  >> च्यालीस-पैंतालीस साल शिक्षण अना नवकरी को कारन लका बाहेर-बाहेर रव्हेव् होतो मुनस्यारी बचपनकी पोवारी बोली ठीक लका बोलता आवत् नोहोती। अटक-अटकस्यारी बोलत होतो. >> पर आमरो घर् गावमा एक नवकर होतो, वोको नाव देवाजी रहांगडाले। येन् देवाजीला पोवारी को सिवाय दुसरी कोनतीच भास्या बोलता आवतच् नोहोती। वोकोसंग् पोवारी मा बोलता बोलता मी धीरू धीरू पहलेवानीच धाराप्रवाह पोवारी बोलन् लगेव्।  >> मी झाडीबोली को चळवळ मा 1979-80 पासना कार्यरत सेव्. झाडीबोली साहित्य मंडळ को संस्थापक/आजीव सभासद भी सेव्. तसोच महाराष्ट्र मा बोली जानेवाली सप्पाई बोलीईनको एक अखिल महाराष्ट्र बोली साहित्य महामंडळ को भी मी संस्थापक/आजीव सभासद सेव्.  >> येको कारणलका मी पोवारी बोली की एक लहानशी पोस्ट 2013 -14 को दरम्यान फ...

नशा : कवितेची आणि दारूची(?) : (कटूतेला आवतन?)

◇नशा : कवितेची आणि दारूची(?) : कटूतेला आवतन◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          एक वस्तुस्थिती प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मी प्रामुख्याने, प्राधान्याने, बेसिकली वगैरे वगैरे एक (उत्तम?) वाचक मात्र आहे. तरी माझ्या हायस्कूलच्या शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने मी 1970-72 पासूनच अनुकरण, अनुसरण, प्रतिक्रिया स्वरूप तथाकथित कविता लिहू लागलो होतो. माझा जीवश्चकंठश्च मित्र प्रभाकर पोचलवार याच्यासोबत संयुक्त कवितेचा (म्हणजे कवितेच्या ओळी आलटून पालटून मी व प्रभाकरने लिहिणे) प्रयत्न व प्रयोग सुद्धा आम्ही त्याकाळी केलेला! तर अशी कवितेची ओळख होत गेलेली. याचा पाया मात्र माझ्या बालपणी माझ्या आईने व तिस-या व चौथ्या वर्गात त्यावेळचे माझे वर्गशिक्षक श्री.सिताराम भूराजी चूटे या एकाक्ष सत्य-शिक्षकांनीच रोवला होता.         हळूहळू "ललित", "युगवाणी", "तरुण भारत", ची विविध विषय विभाग ही रविवार पुरवणी व "रविवारचा महाराष्ट्र टाईम्स" यांच्या नियमित वाचनाने वसंत आबाजी डहाके व ग्रेस यांनी माझ्यावर गारूड केलं. गोतावळा-आनंद यादव, ठणठणपाळ-जयवंत दळवी, मा...

नाद हरवलेल्या वाद्यांसोबत एक दिवस व एक रात्र ... (लघुकथा)

*नाद हरवलेल्या वाद्यांसोबत एक दिवस व एक रात्र ...* (लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आज सकाळी झोप उघडली ती डोकेदुखी घेऊनच. तशी माझी आणि डोकेदुखी ची खूप खूप जूनी अभंग अशी मैत्री आहे. पण आज अचानक तिचे सकाळी-सकाळीच उद्भवणे जरा आश्चर्याचेच म्हणावे लागेल. कारण सध्याच्या कोरोना-भारित कालावधीत खाणे-पिणे, उठणे-जागणे, व्यायाम-औषधी आदि सर्व बाबी नियमित, सुरळीत व यथायोग्यपणे सुरू असूनही डोकेदुखीचे कारण अनाकलनीयच ठरते. >> विज्ञान असो की सनातन धर्माच्या आदि शंकराचार्यांचे सत्कार्यवाद हे तत्त्वज्ञान असो, 'कारणा'शिवाय 'कार्य' घडत नसते असे मानले जाते. (अतिअद्यावत भौतिकशास्त्रात आजकाल कार्यकारण संबंधावर साधार शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी अजूनही त्यासंदर्भात काही ठोस व ठाम विधाने विज्ञान करू शकला नसल्याने आपण सध्या तो विचार बाजूला ठेवू या.) पर्यायाने 'कारण' जेव्हा आपले अस्तित्व-अंतरण करून 'कार्या'त रुपांतरित होते, तेव्हा 'कारण' मावळून 'कार्य' दृग्गोचर होते असे म्हणतात. पण असे असले तरी कारण मात्र अस्तित्व-शून्य झाले असेही म्हणता ये...