Posts

MSEDCL -- COMPLAINT

REMINDER no. 03 //dt. 30.09.2019 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Borkanhar-441902, Tq.Amgaon, Dt.Gondia. Consumer no. 431610003894 ANIKET Singh Katre  To,  मा.अधीक्षक अभियंता, सं.व सु.प्रविभाग, मराविविकंमर्या. जुने पाॅवर हाऊस, रामनगर, गोंदिया-441601 ~~~~~~~~~~~~~~ प्रेषक:- लखनसिंह कटरे (दिव्यांग व ज्येष्ठ भारतीय नाग...

एक कन्फेशन (न्यूनगंडाचे चक्रव्यूह)

*एक कन्फेशन (न्यूनगंडाचे चक्रव्यूह)*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~        1965 मध्ये मी दहा वर्षाचा असतानापासूूनच मला ग.त्र्यं.माडखोलकरांच्या संपादकत्वाखालील नागपूर "तरुण भारत" नियमित वाचण्याची सवय लागली होती. रविवारची पुरवणी व दिवाळी विशेषांक वाचून मला मराठी वाचनाचा नादच लागला. त्यापूर्वी आईच्या पुढाकाराने मी हिंदी धार्मिक ग्रंथ (रामायण, महाभारत, स्त्री-सुबोधिनी, ... आदि) वाचले होते. पण मराठी वाचनाची सवय मात्र "तरुण भारत" ने च लावली. रविवारच्या तरुण भारतात विविध नियतकालिकांच्या जाहिराती प्रकाशित व्हायच्या. अशाच एका जाहिरातीनुसार मी 1968 मध्ये "ललित" मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो. 1969 मध्ये पुण्याच्या गीता धर्म मंडळाच्या "गीतादर्शन" मासिकाचा आणि 1970 मध्ये मुंबईच्या अवधूत शास्त्री यांच्या "धर्मभास्कर" मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो. त्यानंतर 1980 पर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे द्वारे प्रकाशित "महाराष्ट्र साहित्य पत्रिका", मराठी संशोधन मंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित "भाषा संशोधन पत्रिका", नागपूरच्या डाॅ.ब.स.येरकुंटवार यांचे ...

"अर्थपूर्ण" (मासिक/पुणे) च्या ऑगस्ट-19 च्या अंकात प्रकाशित माझा एक पत्र-लेख...

□''अर्थपूर्ण" (मासिक/पुणे) च्या ऑगस्ट-2019 च्या अंकात प्रकाशित माझा एक पत्र-लेख. (□संपादक श्री.यमाजी मालकर यांचा आभारी आहे.) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ श्री.यमाजी मालकर संपादक, "अर्थपूर्ण" अर्थपूर्ण पब...

एक पत्र

बोरकन्हार-441902/जि.गोंदिया/महाराष्ट्र  दि. 12.07.2019   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रबंधक, राजकमल प्रकाशन प्रा. लि. 1-बी, नेताजी सुभाष मार्ग, दरियागंज नई दिल्ली-110 002. सादर नमस्ते.     मेरी मातृभाषा भलेही हिंदी की उपभाषा पोवारी है, लेकिन महाराष्ट्र का रहिवासी होने के नाते कभी-कभी मेरी हिंदी मराठीकरण का शिकार हो जाती है। अतः सर्वप्रथम क्षमस्व।       अरुंधति राॅय द्वारा लिखित, अनिल यादव तथा रतन लाल द्वारा अनुवादित और आपके द्वारा प्रकाशित "एक था डाॅक्टर एक था संत" अभी अभी पढ़कर समाप्त की है। यह पुस्तक पढ़ने के पश्चात मेरी अल्पबुद्धि की प्रतिक्रिया से आपको अवगत कराना चाहता हूँ। 1)संशोधन की विश्वमान्य प्रक्रिया मे सर्वप्रथम उपलब्ध, अनुपलब्ध सामग्री जमा की जाती है। उसके बाद उन सामग्री मे सम्मिलित (या यूँ कहे, उनसे प्राप्त) कथ्य और तथ्यों की/का तटस्थ, निरपेक्ष, भेदभावरहित, प्रामाणिकता और नैतिकता के प्रकाश मे छानबीन, समीक्षा, परिशीलन करने के बाद किसी निष्कर्ष पर पहुँचा जाता है। तभी वह निष्कर्ष वैज्ञानिक पद्धति से परिष्कृत निष्कर्ष कहलाने को ...

एक स्मरणगाथा आणखी ......

□मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       तसे पाहिले असता माझ्या आईने माझ्यावर केलेले वाचन-संस्कार व हायस्कूल मधील शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांनी केलेले लेखन संस्कार यामुळे 1970-71 पासूनच मी ओबडधोबड लिहू लागतो होतो. 1971च्या शालेय स्नेहसंमेलनाच्या हस्तलिखित वार्षिकांकाचा मी विद्यार्थी-संपादक होतो. आणि त्या अंकासाठी मी लिहिलेला एक लेख "अपघातग्रस्त बस ची आत्मकथा" वाचून हा लेख मी स्वतः लिहिला नसून कुठून तरी चोरलाय अशी रोखठोक तंबी सुद्धा मला "प्राप्त" झाली होती. अखेर सगदेव मॅडम नी माझ्यावर विश्वास दाखवला व तो लेख अंकात समाविष्ट करण्यात आला. पण बांगला मुक्ती संग्रामाच्या धामधुमीत त्यावर्षीचे स्नेह संमेलन स्थगित करण्यात आल्याने त्या अंकाचे प्रकाशन त्यावर्षी होऊ शकले नव्हते. 1972 मध्ये मी धोटे बंधू सायंस काॅलेज गोंदिया चा बी.एस्सी. फर्स्ट ईयर चा विद्यार्थी असताना आदर्श विद्यालय आमगांव च्या त्यावर्षीच्या स्नेह संमेलनाचे मुख्य अतिथी गो.नी.दांडेकर यांच्या हस्ते त्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.       बी.एस...

एक स्मरणगाथा आणखी ...... मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.

□मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       तसे पाहिले असता माझ्या आईने माझ्यावर बालपणी केलेले वाचन-संस्कार व हायस्कूल मधील शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांनी केलेले लेखन संस्कार यामुळे 1970-71 पासूनच मी ओबडधोबड लिहू लागतो होतो. 1971च्या शालेय स्नेहसंमेलनाच्या हस्तलिखित वार्षिकांकाचा मी विद्यार्थी-संपादक होतो. आणि त्या अंकासाठी मी लिहिलेला एक लेख "अपघातग्रस्त बस ची आत्मकथा" वाचून हा लेख मी स्वतः लिहिला नसून कुठून तरी चोरलाय अशी रोखठोक तंबी सुद्धा मला "प्राप्त" झाली होती. अखेर सगदेव मॅडम नी माझ्यावर विश्वास दाखवला व तो लेख अंकात समाविष्ट करण्यात आला. पण बांगला मुक्ती संग्रामाच्या धामधुमीत त्यावर्षीचे स्नेह संमेलन स्थगित करण्यात आल्याने त्या अंकाचे प्रकाशन त्यावर्षी होऊ शकले नव्हते. 1972 मध्ये मी धोटे बंधू सायंस काॅलेज गोंदिया चा बी.एस्सी. फर्स्ट ईयर चा विद्यार्थी असताना आदर्श विद्यालय आमगांव च्या त्यावर्षीच्या स्नेह संमेलनाचे मुख्य अतिथी गो.नी.दांडेकर यांच्या हस्ते त्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.      ...

न्यायाधीश (?) : एक न-कथा.

◇◇◇न्यायाधीश(?)/एक न-कथा◇◇◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ □न्यायाधीश : माझ्या समोर बसलेल्या तुम्हा दोघा तरुणांना आणि तिन्ही तरुणींना या कथे(?)च्या लेखकाने सांगितलेच असावे की, मी या कथेतील अ-वास्तव न्यायाधीश आहे, वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नव्हे! मी या कथेच्या प्रयोजनापुरता या कथेच्या मर्यादेतच वावरणारा न्यायाधीश आहे. त्यामुळे लेखकाचे म्हणणे मला ऐकावेच लागेल. तरी लेखकाचे म्हणणे जर का अगदीच न पटणारे असेल तेव्हा मी माझे dissent विचारही प्रकट करणार आहे. हे मी लेखकाला आधीच सांगून ठेवले असून लेखकाने ते, सशर्त का असेना, मान्यही केले आहे. आमच्यातील त्या अलिखीत करारामुळे मला त्या शर्तींचा उल्लेख येथे करता येणार नाही. तर एकंदरीत मी वास्तवातला खराखुरा न्यायाधीश नसून या कथालेखकाने 'विचार'लेला (चितारलेला नव्हे!) एक पात्र --- न्यायाधीश आहे, याचे तुम्ही सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने क्रमशः आपापली कैफियत माझ्यासमोर उभे राहून मांडायची आहे. एक बोलत असताना दुस-या कोणाहीने बोलायचे नाही. एखाद्याने आपली कैफियत सादर करताना दुस-यावर काही आरोप केले तर त्या दुस-याने त्याची कैफि...