Posts

माझी आई : कमलाबाई.

माझी आई : कमलाबाई      --------------------------        १६ मार्च १९३१ ते ३० जानेवारी २०१४ हा माझ्या आईचा, पूर्वाश्रमीच्या कमलाबाई रूपराम/रामरूप रहांंगडाले व लग्नानंतरच्या सौ.कमलाबाई मोहनलाल कटरे यांचा दीर्घ जीवनपट! माझ्या आईचे शिक्षण तत्कालीन वर्ग चार पर्यंतचेच. पण मराठी भाषा आणि गणित (विशेषतः अंकगणित व बीजगणित) या विषयातील तिचे प्रावीण्य अद्भूतच म्हणावे असे होते. मी आणि माझे तत्कालीन वर्गमित्र यांना आमच्या आठव्या वर्गापर्यंतचे कोणतेही अडलेले गणित समजावून, सोडवून देणे हा तिचा जणू हातचा खेळ. पुढे नवव्या वर्गापासून आम्हाला इंग्रजी माध्यमातील New Maths सुरू(?) झाले आणि माझ्या आईमागे लागलेला "गणित समजावून दे" हा आमचा लकडा थांबला.       मी माझ्या आईवडिलांची दुसरी संतान. माझा एक मोठा भाऊ, शुकदेव हा तीन वर्षाचा होऊन लिव्हरच्या तत्कालीन असाध्य बिमारीने गेला. तो गेल्यानंतर दोनेक वर्षे मुलबाळ न झाल्याने माझ्या आजीने माझ्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा प्रयत्नही केलेला. पण वडील माझ्या आई सोबत ठामपणे उभे राहिले. माझ्या आईने...

गुड बोला, गोड बोला.

 *गुड बोला :: गोड बोला*   ---------------------------------       खूप जूनी एक कथा आहे. एक ज्योतिषी राजाला सांगता झाला की, "तू तीन दिवसात मरणार आहेस." राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्या ज्योतिषाच्या मित...

छू लेने दो.....!

       १९६९-७० मधील एक घटना आठवते तशी सांगण्याचा प्रयत्न करतोय.        तर झाले काय की, आमच्या गावातील जि.प.पूर्व माध्यमिक शाळेत एक शिक्षक बदलून आले. त्यावेळी शिक्षक मंडळी श...

एक शंका अशीही...!

1)मी एलएल.बी.(1981) करत असताना आम्हाला "नैसर्गिक न्याय तत्व" (Principle of Natural Justice) शिकवताना आमचे प्रोफेसर न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देऊन सांगायचे की, हे तत्त्व कोणत्याही कायद्यात "व्याख्यायित" केले नसले तरी हे तत्त्व कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचा मूलभूत पायाच असते. केलेली कार्यवाही कितीही योग्य(?) असली तरी नैसर्गिक न्याय तत्त्वाचे अनुपालन करणारी नसेल तर ती कार्यवाही या तत्त्वाचे अनुपालन न केल्याच्या तांत्रिक कारणावरून सुद्धा न्यायालय निरस्त/रद्द करू शकतात/करतात. आताही हे "नैसर्गिक न्याय तत्त्व" न्यायालयीन निर्णयात पाळले जात असावे काय? 2)मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत असताना (30 वर्षांत) हजारो न्यायिकवत (Quasi Judicial) निर्णय पारित केले होते. आणि त्यातील एकसुद्धा निर्णय कोणत्याही न्यायालयात निरस्त वा रद्द झाल्याचे "मला आढळून आले" नाही. (अपवाद : मंत्री स्तरावरील व विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांच्या स्तरावरील अपीले मात्र याला अपवाद आहेत.) मी प्रत्येक निर्णय ...

हलके फुलके पण गंभीर सुद्धा...!

हलके फुलके पण गंभीर सुद्धा...! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~      गेल्या नोव्हेंबर (2018) मध्ये मी राजन खान प्रणित अक्षर मानव द्वारा आयोजित "चित्रपट कार्यशाळा" करिता मुर्टी (ता.बारामती, जि.सातारा) येथे गेलो होतो. पण तब्येतीच्या कारणांमुळे मला ती कार्यशाळा अर्ध्यावर सोडावी लागली. पण पुण्याला परत येऊन दोन आठवडे पुण्यातच थांबलो. दरम्यान मी "साधना" साप्ताहिकाचे संपादक श्री.विनोद शिरसाठ यांची भेट घेतली असता त्यांनी मला प्रभाकर पाध्ये यांचे 'असेही विद्वान' व शिरसाठ यांचे 'सम्यक सकारात्मक' ही पुस्तके भेट दिली. पैकी 'असेही विद्वान' हे मजेदार व गंभीर असे पुस्तक मी पुण्यात असतानाच वाचून काढले.        त्याच पुुुुस्त्तकातील काही उतारे "साधना" साप्ताहिकाच्या दि.15 डिसेंबर 2018 च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहेत. (हे पुस्तक प्रत्येक विचारी मराठी वाचकाने अवश्य अवश्य वाचावेच असे माझे मत आहे.) त्या उता-यांतील अनंत काणेकर यांच्या संबंधीची आठवण वाचतांना मला माझ्या जीवनातील एक समांतर घटना आठवते.       त्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक रा...

एक शोकांतिकाच (?)

   एक शोकांतिकाच (!) ------------------------------    (निसर्ग-शरण)आनंद यादव यांच्या संपादकत्वाखाली पुण्याहून एकेकाळी प्रकाशित होत असलेल्या तत्कालीन मराठी मासिक, "विचार भारती" च्या मार्च/एप्रिल 1988 च्या "ग्रामीण साहित्य विशेषांका"त माझा एक लेख "नवोदित ग्रामीण साहित्यिक आणि अभिव्यक्ती : काही विचार" प्रकाशित करण्यात आलेला होता.  त्यात मी ग्रामीण साहित्यिकांच्या अभिव्यक्ती आणि लिखाणाची तुलना अस्पर्शीत, अनिर्बंध अशा अरण्यात नैसर्गिक वाढ होणा-या वृक्षाशी केली होती, तर बहुतेक "शहरी(?) साहित्य" हे बोनसाय वृक्षासारखे असते असेही सोदाहरण स्पष्ट केले होते. मी आजही आपल्या या मतावर कायम आहे, आणि म्हणूनच मला माझ्या ग्रामीण-स्तर(?)-अभिव्यक्तीची बिलकुल लाज(!) वाटत नाही. मला माझ्या अभिव्यक्ती बद्दल कोणताही न्यूनगंड वा भयगंड नाही. माझ्या गावापासून अगदी दोन किमी वर महाकवी भवभूतीचे गाव, पदमपूर, आहे आणि हा भवभूती आमचा, झाडीपट्टीचा, साहित्यिक-पूर्वज आहे. ज्याने आपल्या अस्सल अभिव्यक्तीशी कोणतीही तडजोड न करता भविष्य-काळावर त्याच्या योग्यतेचे मोजमाप सोपवले. आणि आज आपण भ...

जय राजाभोज

राजाभोज का वंशज होनेका हमे गर्व हैं! @लखनसिंह कटरे.