एक शोकांतिकाच (!) ------------------------------ (निसर्ग-शरण)आनंद यादव यांच्या संपादकत्वाखाली पुण्याहून एकेकाळी प्रकाशित होत असलेल्या तत्कालीन मराठी मासिक, "विचार भारती" च्या मार्च/एप्रिल 1988 च्या "ग्रामीण साहित्य विशेषांका"त माझा एक लेख "नवोदित ग्रामीण साहित्यिक आणि अभिव्यक्ती : काही विचार" प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यात मी ग्रामीण साहित्यिकांच्या अभिव्यक्ती आणि लिखाणाची तुलना अस्पर्शीत, अनिर्बंध अशा अरण्यात नैसर्गिक वाढ होणा-या वृक्षाशी केली होती, तर बहुतेक "शहरी(?) साहित्य" हे बोनसाय वृक्षासारखे असते असेही सोदाहरण स्पष्ट केले होते. मी आजही आपल्या या मतावर कायम आहे, आणि म्हणूनच मला माझ्या ग्रामीण-स्तर(?)-अभिव्यक्तीची बिलकुल लाज(!) वाटत नाही. मला माझ्या अभिव्यक्ती बद्दल कोणताही न्यूनगंड वा भयगंड नाही. माझ्या गावापासून अगदी दोन किमी वर महाकवी भवभूतीचे गाव, पदमपूर, आहे आणि हा भवभूती आमचा, झाडीपट्टीचा, साहित्यिक-पूर्वज आहे. ज्याने आपल्या अस्सल अभिव्यक्तीशी कोणतीही तडजोड न करता भविष्य-काळावर त्याच्या योग्यतेचे मोजमाप सोपवले. आणि आज आपण भ...
*सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, ------------------------------------------------------ >> जगात आज सर्वसाधारणपणे प्रामुख्याने तीन अर्थरचना मानल्या/अभ्यासल्या/आचरल्या जात असल्याचे सर्वसाधारणपणे आढळून येते. त्या तीन अर्थरचना म्हणजे -- ¤ साम्यवादी (समाजवादी?) अर्थरचना, ¤ भांडवलशाही/वादी अर्थरचना आणि ¤ सहकारी अर्थरचना. >> यापैकी साम्यवादी व भांडवलशाही या दोन्ही अर्थरचना व हे दोन्ही विचार(!) 'निसर्गाला अंकित करून विकास' घडवणे, या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गृहीतकावर आधारित आहेत. आणि 'निसर्गाला अंकित करून' किंवा 'निसर्गावर मात करून' किंवा 'निसर्गविरोधी' असा कोणताही विकास हा शाश्वत, सम्यक, टिकाऊ व सर्वसमावेशक विकास होऊच शकत नाही, हे आज पर्यावरणाच्या संदर्भातील वैज्ञानिक स्पष्टीकरणाद्वारे विज्ञानानेच सिद्ध/मान्य केलेले आहे. या दोन्ही अर्थरचना आणि विचारपद्धतींमध्ये विकासाची तथाकथित संकल्पना राबवताना युद्धसज्जतेसाठी अवकाश-संशोधन, संगणक, आयटी, एआय, श्रमशून्याधारित ऐषोआराम, साम्राज्यवृत्ती, व्यक्ती...
🌿 *ॲड. लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम* : (साहित्यिक अभिमत : by- ChatGPT) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *प्रस्तावना* साहित्य हे अनेकदा माणसाच्या अंतर्मनातील प्रवासाचे रूप असते. काही लेखक हा प्रवास केवळ विचारांमधून करतात, काही अनुभवांमधून; परंतु ॲड. लखनसिंह कटरे हे अशा लेखकांपैकी आहेत, जे हा प्रवास “अनुभव आणि विचार” दोन्हींतून करतात. त्यांचा प्रवास हा द्वैती आहे — एका बाजूला प्रशासकीय जबाबदाऱ्या, कायद्याची भाषिक शिस्त आणि सार्वजनिक सेवकाचे कर्तव्य; तर दुसऱ्या बाजूला संवेदनशील लेखक, लोकभाषेचा संरक्षक आणि करुणामय कवी. हे दोन प्रवाह एकत्र मिसळले की तयार होतो कटरे विचारविश्व — ज्यात शिस्त आणि शहाणपणा यांसोबतच करुणा, आत्मपरीक्षण आणि लोकजीवनाची प्रखर जाणीव आहे. *अनुभवाधिष्ठित लेखन : प्रशासनातून आलेला विचार* ॲड. कटरे यांचे लेखन हे “वास्तवाशी संघर्ष करताना उमटलेले विचार” आहे. “प्रशासन की सुशासन : एक पॅरेडाइम”, “मी सुद्धा एक अधिकारी”, “एक अनुभव : एक आकलन” अशा लेखांत ते शासनव्यवस्थेच्या अंगभूत गुंतागुंतीकडे अत्यंत थेट, परंतु संत...
Comments
Post a Comment