विदर्भ - 1 (प्रेरणा : स्व.श्री.रत्नाकर महाजन)
विदर्भ - 1 (प्रेरणा: स्व.श्री.रत्नाकर महाजन)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मी महाराष्ट्राच्या (विदर्भातील) अगदी पूर्वटोकावरचा रहिवासी. माझ्या गावापासून 8-10 कि.मी.नंतर M.P.वC.G. ची सीमा सुरू होते. मी 1977 साली B.Sc.(PCM) केल्यावर माझ्या Physics च्या गूरूवर्या(?)च्या कुत्सित अवकृपेने M.Sc.(Physics) ला प्रवेश न मिळू शकल्याने LL.B. ला प्रवेश घेतला व UPSC,MPSC च्या तयारीला सुरूवात केली. पहिल्याच प्रयत्नात MPSC (Written 60% & Oral फक्त 35%) पार करून B.D.O. म्हणून select झालो. (Oral 35% अनुभवण्यासाठी वैदर्भीय असणे अनिवार्य आहे.) पण माझे वडील राजकारणात असल्याने BDO ची द्रौपदीपेक्षाही अधिक नवरे (ते ही बहुतेक दा अल्पशिक्षित, ... क्षमस्व.) सांभाळण्याच्या कसरतीची कल्पना असल्याने व माझी तेवढी हिंमत न झाल्याने मी रुजू झालो नाही. ती निवड नाकारली मी.
पुन्हा दुस-यांदा MPSC उत्तीर्ण झालो. यावेळी Rural Advantage ला मा.उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने असा claim केलेल्या सर्व उमेदवारांना (त्यांचे written मधील marks लक्षात न घेता) सरसकट तात्पुरते वगळून बहूसंख्य पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. न्यायालयाने Rural Advantage अवैध ठरविल्यानंतर merit नुसार पात्र असलेल्या उमेदवारांमधून उरलेल्या थोड्याशा posts भरण्यासाठी पुढील प्रक्रियेचे सोपस्कार पार पाड्ण्यात आले. त्यात मी सुद्धा एक होतो. मला Mark sheet मिळाल्यावर लक्षात आले की मला written मध्ये 64% तर oral मध्ये फक्त 15% marks मिळाले(?) आहेत व मी अपात्र ठरलो आहे. यावेळेस Oral मध्ये विचारलेले प्रश्न मी, माझे कुटुंबीय, माझे गाव, माझी शेती विषयकच असल्याने व त्यांची उत्तरे मलाच देता येत असल्याने अनुत्तरीत प्रश्न राहण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तेव्हाच मला Viva Farce ची कल्पनाही आली होती, ती Mark Sheet मिळाल्यावर खरीच ठरली. असो. असोच.
आता थोडीशी चीड निर्माण झाली होती. तिस-यांदा पुन्हा परीक्षा दिली. MPSC written पुन्हा उत्तीर्ण झालो. oral साठी बोलावणे आले. यावेळी पूर्ण विचार करूनच गेलो की oral मधील "त्यांची" चालबाजी उघड करावीच. Oral चे वेळी Barrister P.G.Patil sir होते. मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. Oral दरम्यान मी त्यांना बोललो की हा farce कशासाठी? तुम्ही माझी निवड न करण्याचे पहिलेच ठरवून टाकले आहे, मग हे नाटक कशासाठी? पाटील सर भयंकर रागावले. मी त्यांना सोबत नेलेल्या माझ्या marks sheets दाखवल्या. ते अवाकच झाले. थोडावेळ एकदम शांतता पसरली. त्यानंतर त्यांनी माझा detail interview घेतला व सरतेशेवटी मी पात्र ठरलो.(पाटील सरांच्या श्रेष्ठत्वाबद्दल नंतर कळले व मी त्यांचा fanच झालो. असे लोक आता कुठे गेलेत.)
कहाणी इथेच संपत नाही. सगळे सोपस्कार पार पडल्यावर माझी posting order मंत्रालयातून मार्च 1984 च्या शेवटच्या आठवड्यात Regd.Post ने माझ्या गावाच्या पत्त्यावर पाठविण्यात (?) आली. ती Regd.Post ने पाठविण्यात (?) आलेली प्रत वा ते Regd.Post. सुद्धा मला अजूनही मिळालेले नाही. पोस्टात खूप पत्रव्यवहार केला, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या नागपूरच्या batchmate ने मला पत्राने कळविल्यावर मला कळले होते व त्याच्याच प्रतीवरून मला रूजू व्हावे लागले होते.
तरी विदर्भावर (विशेषतः पूर्वटोकावरील जनते(?) वर) मुंबई/मंत्रालय/एमपीएससी वगैरे पैकी कोणीही अन्याय करीत नाहीत असेच म्हणणे अनिवार्य आहे.
मी सुद्धा तसेच म्हणू इच्छितो. जय हो!!!
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment