माझी एक छोटीशी(?)/ठेंगणीशी(?) मानसकन्या !

माझी एक छोटीशी(?)/ठेंगणीशी(?) मानसकन्या !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

>> जयश्री हजारे तिचे नाव! 

>> मी 28 फेब्रुवारी 2013 ला डीडीआर यवतमाळ या पदावरून निवृत्त झालो. त्यापूर्वी सप्टेंबर-2008, जानेवारी-2009, ऑगस्ट-2010, सप्टेंबर-2012 ला अशा काही भयंकर "घटना" (दुर्घटना?) माझ्या जीवनात लागोपाठ घडल्या की, निवृत्ती-पूर्व करावयाच्या, काही आवश्यक/वैधानिकरित्या अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता व कार्यवाही करण्यात, मी थोडासा अव्यवस्थित झालो होतो.

>> माझ्या अशा परिस्थितीत माझ्या त्या आवश्यक व वैधानिक रित्या अनिवार्य कागदपत्रे व कार्यवाहीची पूर्तता करून त्या कागदपत्रांवर माझी यथावश्यक स्वाक्षरी घेऊन पूर्ण पूर्वतयारी या छोट्याशा(?) कन्येने माझ्याकडून केव्हा करून घेतली होती, हे मला कळलेच नव्हते व आठवतही नव्हते. 

>> निवृत्तीनंतर काही काळ मला पेन्शन मिळण्यास काही अनावश्यक लादलेल्या समस्येमुळे विलंब झालेला होता. ही समस्या निवळल्यानंतर पेन्शन-प्रकरण तयार करण्यासाठी मी जेव्हा यवतमाळला गेलो व प्रकरण तयार करण्यासंबंधाने डीडीआर कार्यालयात चर्चा केली असता, या छोट्याशा(?) कन्येने यापूर्वीच मी स्वाक्षरित केलेले संपूर्ण प्रकरण तयार असल्याचे दाखवले.आणि अखेर ते प्रकरण योग्य मार्गे प्रस्थानित होऊन लवकरच माझी पेन्शन नियमितपणे सुरू झाली.

>> या सर्व एपिसोड मध्ये त्या माझ्या ठेंगण्या(!) मानसकन्येची भूमिका मी कदापि विसरू शकणार नाही. या मुलीने आणि त्यावेळी माझ्या कार्यालयात काम करणा-या अन्य मुलींनी सुद्धा मला नेहमीसाठीच उपकृतच करून ठेवले आहे. त्या सगळ्यांनीच मला त्यांच्या पित्याचे स्थान दिले होते. धन्य आहेत, त्यांचे नैसर्गिक माता-पिता!

>> यासोबतच डीडीआर कार्यालयातील सहायक निबंधक, उमेशचंद्र हुशे, अर्चना माळवे, तथा अन्य कर्मचारी वर्गात कुळमेथे, डेहणकर, देशपांडे, वडेकर, वघारे, टेकाम, सुमेध, मनोज, आणि आता विस्मरणाने नाव आठवत नसलेले इतर कर्मचारी सुद्धा मला आपल्या पित्यासारखा दर्जा व सन्मान देऊन आपापली जबाबदारी ओळखून काम करायचे. हे सर्व आज मला स्वप्नवतच वाटते. या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो मी!
🙏🙏🙏
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
निवृत्त डीडीआर. 
(03.04.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन