विविध रामायणे...!
*विविध रामायणे...!*
~~~~~~~~~~~
1)श्रीरामविजय कथासार (श्रीधर पंडित)
2)वाल्मिकीय रामायण (गीताप्रेस गोरखपूर)
3)वाल्मिकी रामायण (आर्य साहित्य भवन/गोहा)
4)रामचरित मानस (गीताप्रेस गोरखपूर)
5)वाल्मिकी रामायण (रामवेद प्रकाशन)
6)श्रीरामायण (राजगोपालाचारी/वि.रा.जोगळेकर)
7)अध्यात्म रामायण (गीताप्रेस)
8)राम इतिहास के अपरिचित अध्याय (श्रीराम मेहरोत्रा)
9)रामायण विषवृक्षं (रंगनायकम्मा)
10)सच्ची रामायण (पेरियार)
11)रामायण-महाभारतातील आत्महत्या (श्री.र.भिडे)
12)तीन सौ रामायण (ए.के.रामानुजन)
13)सीता के पाँच निर्णय (देवदत्त पटनायक)
14)वाल्मिकी रामायण (आनन्द कुमार)
15)उत्तर रामचरित (भवभूति)
16)सीता बनाम राम (नारायण सिंह)
17)सीताजोस्यम्/सीतेचे भाकित (दक्षिण भारतीय लेखक/अनु.नलिनी साधले))
18)रामकथा (फादर कामिल बुल्के)
19)ऐतिहासिक राम (नीलेश ओक, अनु.अलका गोडबोले, राम जन्म : स.का.पूर्व 12240, राम-रावण युद्ध : स.का.पूर्व 12209. सर्वमान्य कालखंड पूर्व - स.का.पूर्व =BCE, Before Comman Era) (3/2023, परम मित्र पब्लिकेशन्स)
~~~~~~~~~~~~
उपरोल्लेखित एकोणीसही ग्रंथ/पुस्तके माझ्या संग्रही आहेत. त्यातील काही संपूर्ण तर काही अपूर्ण (वाचन-प्रतीक्षेत) वाचण्याचे भाग्य(!) मला लाभले आहे. शिवाय आमच्या झाडीपट्टीतील रामायणात श्रीराम हे शेत नांगरणारे/शेती करणारे शेतकरी असून सीता त्यांच्यासाठी शेतात शिदोरी घेऊन जाते अशी आख्यायिका आहे. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार रावणाचे घरी रामाचा पाहुणचार अशी कथा सुद्धा सांगितली जाते.
आणि अशाप्रकारे आपापल्या कल्पनेला प्रतिभेचे पंख पेहरवून विविध आख्यायिका रचणे हा तर आदिकालापासूनच प्रतिभाशाली लेखकांचा स्वभावधर्म(!)च राहिला आहे.
अशा परिस्थितीत मी यातील कोणता राम खरा असा प्रश्न विचारू लागलो तर मला गहन मानसोपचाराची परमावश्यक गरज असल्याचेच सिद्ध होईल, असे माझे आकलन आहे.
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी), जि.गोंदिया.
(रामनवमी/17.04.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment