अनुभव : एक भ्रम?.....की?
*अनुभव : एक भ्रम?....की?*
~~~~~~~~~~~~~~~
>> जीवनात सर्वांगीण व शाश्वत यशस्वीतेसाठी जे सहा सूत्र सांगितले जातात, त्यातील सहावे सूत्र "गणिती वृत्ती" हे आहे. या "गणिती वृत्ती" ची व्याख्या मात्र प्रत्येकाने आपापल्या मगदूराप्रमाणे करावयाची असते. मी त्यासाठी मला सुचलेला कच्चा माल येथे पुरवत/टाकत आहे. कोणी जाणकाराने त्यावर मार्गदर्शन करून "व्याख्ये"कडे जाण्याचा रस्ता दाखवला तर त्यांचे आभार होतील!
2 व 3 "मिळून" किती होतात वा होतील?
2+3, 2-3, 2×3, 2÷3, 3-2, 3÷2, 2 चा वर्ग, 3 व/वा 2 चा वर्गमुळ, 2 चा घनमुळ , 3 चा वर्ग, 2 व/वा 3 चा वर्गमुळ, 3 चा घनमुळ, 23, 32,..... इत्यादी...!
म्हणजे मी गोंधळलो की कोणाला तरी गोंधळवतो?
एखादी घटना, एखादा प्रसंग घडल्यावर त्यावरील प्रत्येकाची/चा प्रतिक्रिया व अभिप्राय सारखी/खा च रहावी/वा, असा अट्टाहास धरता/करता येईल काय? "होय" असेल तरी आणि "होय" नसेल तरी......योग्य, सत्य, सर्वमान्य कोणते? कां?
मी मूलतः विज्ञान आणि गणिताचा विद्यार्थी असून विधीशास्त्र, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र, अध्यात्म शास्त्र(?), अर्थशास्त्र, अकाऊण्टन्सी व अंकेक्षण शास्त्र(?), इतिहास, यांचाही थोडा-थोडा(???) विद्यार्थी(?) राहिलो असल्याने व शासन सेवेत असताना न्यायनिवाडा करतेवेळी संबंधित सर्व पक्षांचे मत व आग्रह (दुराग्रह) ऐकून निरपेक्ष पद्धतीने हजारो निर्णय पारित केले असल्याने मला एकरेषीय विचारपद्धती अपूरी वाटते(?). म्हणजे माझे "हे" आकलन चुकीचे म्हणावे काय? "गणिती वृत्ती" ला माझी ही "विचारधारा" पूरक म्हणावी की मारक/भ्रामक म्हणावी?
जाणकारांनी "गणिती वृत्ती" बद्दल मार्गदर्शन करावे अशी जाहीर सविनय विनंती करीत आहे. चूक-भूल क्षमस्व.
@लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902
(13.02.2018)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment