वाङ्मयीन अस्पृश्यता...!

□वाङ्मयीन अस्पृश्यता...!□
~~~~~~~~~~~~~~~
(18.11.2017)
~~~~~~~~~~~~
------>>> तथाकथित कम्युनिस्ट विचारसरणीच्या मुंबईस्थित एका प्रकाशन मठा(?)च्या मुखपत्राच्या सु(?)प्रसिद्ध संपादकांचा मला आलेला अनुभव...
     त्या संपादकांशी झालेल्या +ve चलभाष "मैत्रीचा" गैर(?)फायदा घेऊन दि.09.02.2016 ला माझ्या दोन कविता या संपादकांकडे (अनाहूत पणे) प्रकाशनार्थ पाठविल्या असता दि.09.05.2016 ला चलभाष द्वारे (संपादकांनी स्वतः) कविता "नापसंती" कळविली. मी हसून म्हणालो, "मला तशी थोडीशी खात्री होतीच." असो. तरी पुन्हा (बेशरमपणे) दि.23.05.2016 ला पोस्टाने आणखी एक कविता प्रकाशनार्थ पाठविली. दि.16.12.2016 पर्यंत काहीच न कळल्याने पुन्हा दि.16.12 ला च आणखी एक कविता (पुन्हा बेशरमपणे) इमेल ने प्रकाशनार्थ पाठविली. दि.23.04.2017 पर्यंत या दोन्ही कवितांबद्दल काहीच "न" कळल्याने पुन्हा दि.23.04 ला च इमेल द्वारे याबाबत थोड्याशा "नाराजी"च्या सुरात (नकार/होकार) निर्णयाची विनंती केली. तेव्हा संपादकांचा इमेल आला की या दोन्ही कविता (पोस्टाने पाठविलेली व इमेल ने पाठविलेली सुद्धा) त्यांच्या पाहण्यातच आलेल्या नाहीत व त्या आता त्यांच्या "कार्यालया"त उपलब्धही नाहीत, त्यामुळे त्या पुन्हा पाठवाव्यात. 23.04 ला च दोन्ही कविता पुन्हा पाठविल्या व निर्णय कळविण्याची विनंती केली. अखेर दि.06.06.2017 च्या इमेल द्वारे (कोणत्याही कारणमीमांसेशिवाय) कळविण्यात आले की, कविता "नापसंत" आहेत, प्रकाशित करता येणार नाहीत.  
     हा माझा एकुलता/एकमेव "अनुभव" नाही. मुंबईतील आणि काही पुण्यातीलही प्रकाशन व्यवसाय(?) व व्यवस्थेतील तथाकथित मठाधिपतींचा असाच अनुभव मी गेल्या 40-45 वर्षापासून साठवत(?) आलो आहे. माझ्या कविता "प्रकाशनयोग्य "कां" नाहीत वा नापसंत "कां" आहेत" हे सकारण कळविण्याचे मात्र सावधानी(?)पूर्वक टाळले(?) जाते. आवडल्या नाहीत/भावल्या नाहीत/पसंत नाहीत, एवढेच तद्दन व्यक्तीसापेक्ष "मत"(निर्णय?) कळविले जाते. एवढेच नव्हे तर काही अंकातून प्रकाशित करण्यात आलेल्या तथाकथित स्वनामधन्य मान्यवरां(?)च्या कवितांपैकी काही कविता ह्या वर्तमानपत्रीय अग्रलेख व/वा बातम्यांतील शब्दांची मोडतोड करून एका खाली एक ओळीत रचलेल्यासारख्या असतात. त्याबद्दल/अशा स्वनामधन्य कवितांबद्दल माझा साधार प्रतिसाद(!) त्या मठाधिपतींना कळवल्यावरही त्यावर गूढतम मौन बाळगून माझ्या तर्कशुद्ध युक्तिवादांना केराची टोपली दाखवण्यातच धन्यता मानतात व मला त्यांच्या द्वेष-यादीत टाकून मोकळे होतात, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.
     म्हणजे हा "संविधान-संमत"(?) अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून अवलंबिलेला/अवलंबण्यात येणारा वाङ्मयीन अस्पृश्य(!)तेचा सुयोग्य(?) तथा वैधानिक(?) प्रकार असू शकेल काय, अशी मला शंका सतावते. ह्या शंकासूरानेच मला हे "रडगाणे-पुराण"(?) लिहायला(?) प्रवृत्त केले असावे काय? की हा माझा "दासबोध-प्रणित" आणखी एक मुर्खपणा म्हणावा? (चूक-भूल क्षमस्व.)
(शब्दसंख्या : सुमारे 365)
¤
@लखनसिंह कटरे 
(बोरकन्हार(झाडीपट्टी)/18.11.2017)
~~~~~~~☆☆☆☆☆☆☆~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन