मला सांगायचंय्! : संपादक - माधव कानिटकर

*मला सांगायचंय्! : संपादक - माधव कानिटकर*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> जगातील कोणत्याही भाषेत न झालेला एक प्रयोग(!) आपल्या मराठी भाषेत मात्र करण्यात आलेला असून तो अजूनही एकमेवच आहे/असावा, अशी माझी माहिती आहे. (मी चुकत असल्यास जाणकारांनी यथावश्यक दुरुस्ती करावी अशी विनंती आहे.) 
>> जगातील कोणत्याही भाषेत केवळ वाचकांच्या पत्रव्यवहाराला वाहिलेले पाक्षिक/नियतकालिक होण्याचा प्रथम मान प्रपंच प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे जानेवारी 1981 पासून प्रकाशित व माधव कानिटकर द्वारा संपादित 'मला सांगायचंय्!' या मराठी भाषेतील पाक्षिकालाच जातो/जावा असे मला वाटते. 
>> परंतु वाचकांचा अपेक्षित/पुरेसा प्रतिसाद मिळू न शकल्याने सुमारे दीड-दोन वर्षातच हे पाक्षिक/नियतकालिक बंद करावे लागले असले तरी जागतिक नियतकालिकांच्या इतिहासात या पाक्षिकाचे नाव अजरामर झाले असेच म्हणावे लागेल. 
>> अशा या नाविण्यपूर्ण व अद्वितीय ठरलेल्या तथा अजरामर झालेल्या पाक्षिकाचा प्रथमांकापासून/जानेवारी 1981 पासून शेवटच्या अंकापर्यंत मी वर्गणीदार-वाचक होतो, याचा मला स्वाभाविकच अभिमान आहे. असे नाविण्यपूर्ण प्रयोग मराठी भाषेतच होऊ शकतात, याचाही एक मराठी भाषिक म्हणून मला अभिमान वाटतो. 
>> आजच्या या संपृक्त समाजमाध्यमीय युगात मात्र असा प्रयोग सहज सफल होऊ शकेल असे माझे आकलन आहे. पाहू या कोणी मराठी भाषिक प्रकाशक/संपादक अशी हिंमत(?) करतो की कसे ते! 
>> जय मराठी!
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(10.07.2022//आषाढी एकादशी)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन