मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांना पत्र

बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,        दि.17.06.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मा.श्री.देवेंद्र जी फडणवीस 

मुख्यमंत्री, महाराष्ट्र 

मंत्रालय, मुंबई-400032

सविनय सादर प्रणाम 

      2003-2006दरम्यान रामटेक चे तत्कालीन आमदार माझे मित्र श्री.आशिष जायस्वाल यांनी आपल्यासोबत माझी ओळख करून दिली होती. आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा.विलासराव देशमुख व मा.सुशीलकुमार शिंदे यांच्या खरीप आढावा सभेला नागपूर येथे मी तुम्हा दोघांसोबत असायचो. आता आपल्याला हे आठवण्याचे काही कारणच नाही, मी सुद्धा सध्या 2013 पासून "समाधानी-निवृत्त-जीवन" माझ्या स्वगावी खेड्यात स्थायिक होऊन जगत असून माझी कोणत्याही प्रकारची राजकीय/आर्थिक इच्छा किंवा महत्वाकांक्षा नाही. 

    हे पत्र मुख्यत्वे दोन कारणांसाठी लिहित आहे, शक्य असल्यास यावर अवश्य विचार करावा ही सविनय विनंती. 

□1)डाॅ.परिणय फुके यांना भंडारा-गोंदिया चे MLC करून व आता त्यांना मंत्रीपद देऊन आपण अतिशय अतिशय सुन्दर कार्य केले आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील अ-मराठी व स्थानिकांची अवहेलना करणारी नेते-परंपरा आपण श्री.फुके-अस्त्राने नमवली, त्याबद्दल आपले धन्यवाद, अभिनंदन आणि आभार. 

□2)मी 1984 ते 2013 पर्यंत 30 वर्षे शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख म्हणून राजपत्रित पदांवर यशस्वीपणे कार्य केले आहे. (या बाबीचा पुरावा पुण्याच्या सहकार आयुक्त कार्यालयात आजही उपलब्ध असावा.) या 30 वर्षातील प्रत्यक्ष "स्वानुभवा"वरून नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की, जेव्हा जेव्हा सहकार व पणन हे विभाग वेगवेगळे करून दोन मंत्र्यांना सोपविण्यात आले तेव्हा तेव्हा या दोन्ही विभागांची ऐशीतैशी होत आलेली आहे. आपण स्वतः याची पडताळणी करू शकाल. म्हणूनच कालच्या खातेवाटपातील ही विभागणी दोन्ही विभागांच्या प्रगती व विकासाला बाधक ठरणार हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो. 

      याउपरही आपला निर्णय ठाम राहणार असल्यास मी काय बोलू? "आप खुद समझदार हो!" असेच म्हणेल मी!

□आपला एक प्रशंसक,

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार,

ता.आमगांव, जि.गोंदिया (पिन-441902)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन