एक आलतू-फालतू CONFESSION

◇एक आलतू-फालतू CONFESSION◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
□रामदास स्वामी यांनी "दासबोधा"त मुर्खांची काही लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी "स्वतःची तारीफ स्वतः करतो, तो एक मुर्ख" या आशयाचेही एक लक्षण आहेच. मी तसाच काही एक मुर्खपणा करू इच्छितो. त्याबद्दल क्षमस्व.
>> मी 1981 मध्ये तत्कालीन नागपूर विद्यापीठातून LL.B. ची परीक्षा विद्यापीठात Merit THIRD राहून उत्तीर्ण केली. त्यावेळी नागपूर विद्यापीठाचे LL.B. चे पेपर्स तपासण्यासाठी तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश अशा परप्रांतात पाठविण्यात येत असत, हे महत्त्वाचे(!). मी Merit THIRD असल्याने मला LL.M. करिता UGC ची स्काॅलरशीप ऑफर झाली होती. पण मला LL.M. करण्याची इच्छाच नसल्याने मी ती नाकारली व B.Ed. केलं. परंतु 1979 पासून मी Mh.L.J. चा नियमित वर्गणीदार व वाचक मात्र राहिलो. शिवाय Service Cases Today, C.T.J., APS LABOUR DIGEST, विधी समाचार, न्यायबोध, Consumer Cases Today, VOICE, आदि विधीविषयक नियतकालिकांचाही वर्गणीदार व वाचक राहिलोय. त्यामुळे मला माझ्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या Quasi-Judicial कामकाजात व निर्णय/आदेश पारित करण्यात खूप खूप मदत झाली. (माझे काही Quasi-Judicial आदेश/निर्णय मा.उच्च/सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आव्हानित झाले. पण माझ्या (सुदैवाने?) ते सारेच आदेश/निर्णय कायम राहू शकले.) पर्यायाने विचार करण्याच्या तथा विचार पेलण्या/झेलण्याच्या नानाविध प्रकार, युक्तिवाद आणि पद्धतींचाही अभ्यास अनायासेच झाला. तसेच या सर्व विचारपद्धती व विचारधनाचा माझ्यावरील प्रभावही प्रभावी ठरू लागला. त्यातच D.B.M.च्या अभ्यासाने व्यवस्थापन (व प्रशासन) शास्त्राचे 'विचार-संक्रमण' झेलावे लागले. H.D.C.M. आणि G.D.C.A. द्वारे वाणिज्यशास्र/अंकेक्षण/बॅकिंग आदिंनी केलेले विचारातिक्रमणही पेलावे लागून एक वर्ष हा (वाणिज्य/अकौंटन्सी/अंकेक्षण/बॅकिंग) विषय एका पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना  शिकवावाही लागला.
>> त्यातच मी मुख्यतः व मुलतः विज्ञान व गणिताचा (B.Sc./PCM) विद्यार्थी असून आईच्या संस्कारामुळे तुटपुंजे(?) अध्यात्म, माझे (आंगठा न मागणारे) द्रोणाचार्य श्री.विठ्ठलराव जीभकाटे यांच्या दूरस्थ प्रेरणेने वयाच्या सतराव्या वर्षापासून योगशिक्षण, योगाचार व प्राणायाम यांचा सातत्यपूर्वक अवलंब, काॅलेज जीवनातील तीन वर्षे अभ्यासक्रमाबाहेरील मानसशास्त्र व तत्त्वज्ञानावरील भरपूर इंग्रजी ग्रंथांचे (अल्पबुद्धीचे?) वाचन, दि.य.देशपांडे या विवेकवादी तत्त्वज्ञ, विद्वानाच्या विचारांचे वाचन, ब.स.येरकुंटवार या अद्भुत विद्वानाच्या विचारांचे अवगाहन, MPSC/UPSC च्या परीक्षांसाठी इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी साहित्य यांचा आलटून पालटून अभ्यास(!), इतिहासादि विषयात M.A., अशा साहित्य-बाह्य विषयांशी जवळीक असल्याने/झाल्याने माझ्या कविता, कथा, लेख या साहित्यविषयक लिखाणात या सर्वांचे व्यामिश्र मिश्रण तथा संयुग अनायासेच घुसखोरी करू लागले. माझ्या जन्मगत/जन्मस्थळाची नाळ-संस्कृती, अस्पर्श अरण्याची नैसर्गिक नवलाई, बोनसाय संस्कृतीच्या फोलपणाची जाणीव, निसर्ग व मानव यांच्यातील अंतर्संबंधाची अनाकलनीय उकल(समज), शेतक-याच्या घरी जन्म घेतल्याने शासन, व्यापारी, अन्य वर्गांकडून झेलावी लागलेली असूया, लूट, अन्याय व क्रूरता, अभ्यासाने वरचढ ठरू लागल्यावर अपरिहार्य ठरत गेलेली/झालेली अवहेलना, आदि बाबींच्या परिणामस्वरूप मााझी गूढ, अनाकलनीय(!), असंपृक्त(?), नानुकरणीय, चाकोरीबाह्य अनुभवाभिव्यक्ति; बहुतांश (नावाजलेल्या?) प्रकाशन/संपादन समूहाकडून असूया, अज्ञान, अहंगंड, तथाकथित अभिजनी वृत्त्ती, तोकडा/बोनसाय अनुभव व तज्जन्य द्वेषा(?)पोटी वारंवार  नाकारली जाण्याचे अनुभव येऊ लागले आणि  पर्यायाने(!!!) मी मराठी साहित्य क्षेत्राच्या काही तथाकथित मोठमोठ्या, स्वनामधन्य समूहांसाठी "अस्पृश्य" ठरलो/ठरवला गेलो. (त्यांच्या अकारण(!) नाराजीचा बळी ठरलो/ठरत आहे.) 

>> याची आता वयाच्या या सहासष्ठ-सदुसष्ठाव्या वर्षी कोणतीही खंत नसली तरी कधीकधी अदृष्ट स्वार्थ मात्र अल्पज्ञांकडून मिळालेली नकाराची घंटा पुन्हा पुन्हा ऐकून/ऐकवून मला काहीक्षण/क्षणैक कां असेना, परेशान अवश्य करून जाते. (मानवी स्वभाव???)😃😃😃 
.........
..........
...........
        तर अशी ही असंख्य प्रश्नांच्या उत्तरातील क्षुल्लक अभिकथनाची क्षुल्लक, अंशात्मक, द्वेषशून्य व साभार (असंबंद्ध/अकुशल) कर्मकहाणी!!!
जय हो!
आणि क्षमस्व सुद्धा!!
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया.
(13 जून 2019/20) 
●ता.क. :-    हे रडगाणे वा तक्रार नव्हे! गुलज़ार च्या शब्दात सांगायचे तर "नाराज नही हैरान हूँ", असेच समजावे ही विनंती. म्हणूनच CONFESSION म्हटले आहे. असो. असोच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन