VidLitFest Nagpur 8/9 February 2020

VLF : 8/9 FEBRUARY 2020 (नागपूर)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    "INDIA's First Literature FESTIVAL dedicated Solely to NON-FICTION Books & Literature" या यथोचित शीर्षकाखाली आयोजित दोन दिवसीय VidLitFest मध्ये उपस्थित राहून त्याची "चव चाखता" आली, याचा खरोखरीच आनंद आहे. या FESTIVAL चे एकूण स्वरूप पाहता याच्या नावात VIDARBHA ऐवजी NAGPUR असायला पाहिजे होते, असे वाटून गेले. पण एकंदरीत हे FESTIVAL सफल झाले व उपस्थित वाचकांना खूप समृद्ध करून गेले, हे मात्र खास.
त्यासाठी या FESTIVAL च्या सर्व आयोजकांना धन्यवाद व त्यांचे आभार सुद्धा. 
माझ्या जुन्या ओळखीच्या डाॅ.नीलिमा कोटा (विख्यात इंग्रजी लेखिका, संशोधक, चित्रकार) यांच्या सुचनेनुसार मी या FESTIVAL ला उपस्थित राहू शकलो, नीलिमा मॅम यांची भेट होऊ शकली, हे सुद्धा महत्त्वाचे.
09.02 चे बोरिया मजूमदार यांचे INAUGURAL SPEECH म्हणजे उत्कृष्ट व्याख्यानाचे जणू प्रात्यक्षिकच! 
शर्मिष्ठा गुप्तु या मुळच्या HISTORIAN आता FICTION WRITING कडे सुद्धा वळल्या असून त्यांचे यासंदर्भातील अनुभव-बोल खूप खूप महत्त्वपूर्ण ठरलेत. त्यांना बोलते करण्याची मुग्धा खानझोडे यांची शैली सुद्धा अप्रतिम. 
नंतरच्या सेशन मध्ये डाॅ.उदय कुलकर्णी यांनी तर पेंटींग आणि इतिहास यातील सुवर्ण-संबंध कसा असतो व त्यातून इतिहास कसा बोलतो, हे अगदी सुगम भाषेत उलगडून दाखवले. 
एकंदरीत हे SOLELY NAGPUR LITERATURE FESTIVAL असले(?) तरी या FESTIVAL ने वाचकांना दिलेले समृद्ध आकलन खरंच मला तरी खूप खूप आवडले, महत्त्वाचे वाटले.
 पुनश्च आयोजकांना धन्यवाद व त्यांचे आभार सुद्धा. 
@लखनसिंह कटरे. 
बोरकन्हार, जि.गोंदिया (झाडीपट्टी)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन